महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना अर्ज कुठे करावा? | Vidhwa Pension Yojana Maharashtra 2023

By Shubham Pawar

Updated on:

Vidhwa Pension Yojana Maharashtra 2023 :- आज आपण महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना 2023 ची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये या योजनेचे उद्दिष्ट्य काय, लाभ कोणते, पात्रता, आवश्यक कागदपत्रे कोणती, अर्ज कुठे व कसा करायचा या सर्व प्रश्नाची उत्तरे आज आपण पाहणार आहोत.

महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना राज्यातील आर्थिक दुर्बल विधवा महिलांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केली आहे. या महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील गरीब कुटुंबातील विधवा महिलांना दरमहा 600 रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

या योजनेंतर्गत महिलांना सशक्तीकरण व स्वावलंबी केले जाईल, ज्या अंतर्गत महिलांना आर्थिक मदत दिली जाईल. जेणेकरून या गरीब विधवा महिलांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागू नये, आणि त्यांचे वृद्धकाळातील जीवन सोईचे होईल. महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने 23 लाखांचे बजेट तयार केले आहे.

महिलांच्या पतीच्या मृत्यूनंतर योजनेतून मिळालेल्या पेन्शनमुळे ती स्वत:चे आयुष्य जगू शकेल, तीला कोणावरही अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. राज्यातील इच्छुक विधवा महिलांना ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, तर त्यांनी या योजनेंतर्गत अर्ज करावा लागेल. या योजनेंतर्गत राज्यातील विधवा महिलांना शासनाने दरमहा दिलेली रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेचे उद्दिष्ट्य कोणते?

● महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना राज्यातील आर्थिक दुर्बल विधवा महिलांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केली आहे. पतीच्या निधनानंतर महिलेला कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नाही आणि तिची आर्थिक परिस्थिती देखील कमकुवत होते. ती आपल्या दैनंदिन जीवनात आर्थिक गरजा भागवू शकत नाही. हे पाहता राज्य सरकार महाराष्ट्र 2023 या विधवा निवृत्तीवेतनाची योजना सुरू केली आहे.

● या महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील गरीब कुटुंबातील विधवा महिलांना दरमहा 600 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या योजनेंतर्गत महिलांना सशक्तीकरण व स्वावलंबी केले जाईल, ज्या अंतर्गत महिलांना आर्थिक मदत दिली जाईल.

जेणेकरून या गरीब विधवा महिलांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागू नये. आणि त्यांचे वृद्धकाळातील जीवन सोईचे होईल.

● या योजनेद्वारे महाराष्ट्र राज्यातील विधवा महिलांच्या आर्थिक गरजा भागविणे तसेच त्यांना स्वावलंबी बनविणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट्य आहे. या योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील ज्या विधवा महिलांना आधार नाही त्यांना आर्थिक आधार देऊन स्वावलंबी बनवण्यात येईल.

महाराष्ट्र विधवा निवृत्तीवेतन योजनेसाठी पात्रता काय?

● अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायम रहिवासी असावा.

● योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेचे वय 65 वर्षांपेक्षा कमी असावे.

● अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु. 21,000 पेक्षा जास्त नसावे.

● अर्जदाराचे बँक खाते असले पाहिजे आणि बँक खाते आधार कार्डाशी संलग्न असणे गर्जेचे आहे.

● दारिद्र्यरेषेखालील सर्व विधवा महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना 2023 चे लाभ कोणते?

● या योजनेंतर्गत दरमहा राज्यातील विधवा महिलांना 600 रुपये पेन्शन रक्कम देण्यात येतील.

● जर एखाद्या कुटुंबात लाभार्थी महिलेला एकापेक्षा जास्त मुले असतील, तर त्या कुटुंबातील महिलेला दरमहा 900/- रुपये पेन्शन म्हणून दिले जातील.

● जर त्या महिलेला फक्त मुली असतील तर, तिची मुलगी 25 वर्षांची किंवा तिचे लग्न झाल्यापासूनही हा फायदा कायम राहील.

● विधवा महिलेला सरकारने दिलेली रक्कम थेट लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.

विधवा पेन्शन योजना नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

● अर्जदार महिलेचे आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र
● उत्पन्न प्रमाणपत्र
● बँक खाते पासबुक
● पासपोर्ट आकाराचा फोटो
● मोबाइल नंबर
● वय प्रमाणपत्र
● जातीचे प्रमाणपत्र (अनुसूचित जाती जमातीची असल्यास )
● पती मृत्यू प्रमाणपत्र

विधवा निवृत्तीवेतन योजनेसाठी अर्ज कसा व कुठे करावा?

● अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळावर जावे त्याची लिंक दिलेली आहे.

● अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर मुख्यपृष्ठ आपल्यासमोर उघडेल, या मुख्य पृष्ठावर आपल्याला महाराष्ट्र विधवा निवृत्तीवेतन योजनेच्या अर्जाचा पीडीएफ डाऊनलोड करावा लागेल. हा डाउनलोड लिंकही याच लेखात आपल्याला खाली दिली गेलेली आहे.

● अर्ज डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला अर्जामध्ये विचारलेल्या सर्व माहिती भरावी लागेल.

● सर्व माहिती भरुन झाल्यानंतर तुमची सर्व कागदपत्रे आणि तो भरलेला अर्ज जोडून तुम्हाला ती जमा करावी लागेल.

● यानंतर तुम्हाला तो जोडलेला अर्ज आणि कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालय / तहसीलदार / तलाठी कार्यालय याठिकाणी जाऊन जमा करावा लागेल.

या योजनेसाठी कोणत्या महिला अर्ज करू शकतात?

दारिद्र्यरेषेखालील सर्व विधवा महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील गरीब कुटुंबातील विधवा महिलांना दरमहा किती रुपयांची आर्थिक मदत केली जाते?

महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील गरीब कुटुंबातील विधवा महिलांना दरमहा 600 रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

This article has been written by Shubham Pawar from Pune Maharashtra. Shubham Pawar is a famous Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Developer and Owner/founder of Marathi Corner. 5 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment