लाडक्या बहिणींना 30-40 हजार रू कर्ज योजना 🤑 ladki bahin karj yojana | ladki bahin loan scheme

By Shubham Pawar

Published on:

ladki bahin karj yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आता महाराष्ट्र सरकार एक नवीन योजना सुरू करणार आहे. यामध्ये महिलांना 40 ते 50 हजार रुपये कर्ज मिळणार आहे. त्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांनी स्पष्ट माहिती दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लाडकी बहिण कर्ज योजना

आजच्या परिस्थितीमध्ये एक हजार पाचशे रुपये दर महिन्याला महिलांना मिळतात त्यामुळे ज्या कोणी पात्र महिला आहेत त्यांच्यासाठी हा सन्मान निधी तर आहे पण त्यांचं मंथली इन्कम मासिक उत्पन्न आहे असे बोलले तर चुकीचे ठरणार नाही. परंतु या मिळणाऱ्या उत्पन्नाचा जर व्यवसाय करण्यासाठी वापर करता आला तर या गरीब गरजू महिलांचा आणखी आर्थिक फायदा होऊ शकतो त्यामुळेच महाराष्ट्र सरकार आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक लाडकी बहीण कर्ज योजना योजना सुरू करण्याच्या विचारात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले? ladki bahin karj yojana

लाडक्या बहिणी बसल्यात मला त्यांना सांगायचंय कधी कधी आमच्याबद्दल गैरसमज विरोधक पसरवतात लाडकी बहीण आणि दर महिन्याला तुम्हाला दीड हजार रुपये देतो त्याच्यामध्ये मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगतो तुमचे जे लाभार्थी माझ्या लाडक्या बहिणी त्या योजनेमध्ये बसतात त्यांना ही योजना कदापि आम्ही बंद करणार नाही की आमच्या लाडक्या बहिणींच्या करताय तुम्हाला त्याच्यातून मदत होते आम्ही त्याच्यात नवीन प्रस्ताव आणलेला आहे काही बँका पुढे आणलेले आहेत नांदेड जिल्हा बँकेची पण मी बोलनार आहे.

काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगले आहेत तिथं आमचे दर महिन्याला दीड हजार रुपये त्या भगिनीला जातात त्याच्या ऐवजी त्या बहिणीला त्यांनी तीस ते चाळीस हजार रुपये द्यायचे आणि हफ्ता त्यांचा जाईल चाळीस-पन्नास हजार रुपयांचा भांडवल जर तिला झालं तर त्याच्यात पण ती माझी बहीण काहींना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल आणि त्याच्या स्वतःचा कुटुंब ती उभा करू शकेल हे होऊ शकतं महाराष्ट्रात काही बहिणीने केलंय मला माझ्या नांदेडच्या मला माझ्या चव्हाणवाडीच्या परिसरातल्या बहिणींना सांगायचं आहे तुम्ही पण त्या गोष्टीचा विचार करा.

लेक लाडकी योजनेसाठी हि कागदपत्रे लागतात ! lek ladki yojana documents

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.