Gai Mhashi Vatap Yojana 2024: राज्यात दुध उत्पादनास चालना देण्यासाठी सहा/ चार/ दोन दुधाळ संकरीत गाई/ म्हशींचे गट वाटप करणे या नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व जिल्हास्तरीय आदिवासी क्षेत्र उपयोजनांचे यापूर्वीचे शासन निर्णय अधिक्रमित करून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
सदर योजनेअंतर्गत वाटप करावयाच्या दुधाळ जनावरांमध्ये देशी जातीच्या दुधाळ गाईंचा समावेश करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
या लेखामध्ये \”गाय म्हशी गट वाटप योजना\” बद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ही महत्त्वपूर्ण माहिती इतरांना देखील नक्की शेअर करा
गाय म्हशी गट वाटप योजना 2024
राज्यात दुग्धोत्पादनास चालना देण्यासाठी राज्यस्तरीय सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व जिल्हास्तरीय आदिवासी क्षेत्र उपयोजने अंतर्गत वाटप करावयाच्या सहा/चार/ दोन संकरीत गाई/ म्हशींचे गट वाटप करणे या योजना मध्ये देशी दुधाळ गाईचा समावेश आहे.
खालील दिलेल्या गायीचा यामध्ये समावेश आहे:-
- गीर
- सहिवाल
- रेड सिंधी
- राठी
- थारपारकर देवणी
- लाल कंधारी
- गवळाऊ
- डांगी
इत्यादी दुधाळ जातीच्या गायीच्या समावेश आहे.
Gai Mhashi Vatap योजनेत समाविष्ट असलेल्या गाय
या योजनेअंतर्गत वाटप करावयाच्या दुधाळ संकरित गाई जसे की:-
- एचएफ (प्रतिदिन 10 ते 12 लि. दुध उत्पादन क्षमता)
- जर्सी (प्रतिदिन 10 ते 12 लि. दुध उत्पादन क्षमता)
- गीर (प्रतिदिन 8 ते 10 लि. दुध उत्पादन क्षमता)
- सहिवाल (प्रतिदिन 8 ते 10 लि. दुध उत्पादन क्षमता)
- रेड सिंधी (प्रतिदिन 8 ते 10 लि. दुध उत्पादन क्षमता)
- राठी (प्रतिदिन 8 ते 10 लि. दुध उत्पादन क्षमता)
- थारपारकर (प्रतिदिन 8 ते 10 लि. दुध उत्पादन क्षमता)
- देवणी (प्रतिदिन 8 ते 10 लि. दुध उत्पादन क्षमता)
- लाल कंधारी (प्रतिदिन 8 ते 10 लि. दुध उत्पादन क्षमता)
- गवळाऊ (प्रतिदिन 5 ते 7 लि. दूध उत्पादन क्षमता)
- डांगी (प्रतिदिन 5 ते 7 लि. दूध उत्पादन क्षमता)
- सुधारीत मुऱ्हा व जाफराबादी म्हशी (प्रतिदिन 8 ते 10 लि. दुध उत्पादन क्षमता)
दुसऱ्या/ तिसऱ्या वेतातील असाव्यात. दुधाळ गाई व म्हशी शक्यतो 1 ते 2 महिन्यापूर्वी व्यायलेल्या असाव्यात. Gai Mhashi Vatap Yojana
Gai Mhashi Vatap Yojana अनुदान
सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थीना 6/4/2 दुधाळ जनावरांचा एक गट वाटप करतांना 50 टक्के तर, अनुसूचित जाती/ जमातीच्या लाभार्थीना 75 टक्के शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील.
खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना अनुदानाव्यतिरिक्त उर्वरित 50 टक्के रक्कम तसेच, अनुसूचित जाती/ जमातीच्या लाभार्थ्यांना अनुदान व्यतिरिक्त उर्वरित 25 टक्के रक्कम स्वत: अथवा बँक/ वित्तीय संस्थेकडून कर्ज रुपाने उभारावी लागेल.
बँक/ वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणाऱ्या (खुल्या प्रवर्गासाठी 10 टक्के लाभार्थी हिस्सा व 40 टक्के बँकेचे कर्ज व अनुसूचित जाती/ जमातीसाठी 5 टक्के लाभार्थी हिस्सा व 20 टक्के बँकेचे कर्ज) लाभार्थ्यांना या योजने अंतर्गत प्राधान्य देण्यात यावे. Gai Mhashi Vatap Yojana in Marathi
लाभार्थी निवड व पात्रता
सर्वसाधारण प्रवर्गातील तसेच अनुसूचित जाती/ जमातीच्या लाभार्थ्यांची निवड खालील घटकांवरून उतरत्या प्राधान्य क्रमाने करण्यात यावी.
खालीलप्रमाणे लाभार्थी व पात्रता दिलेली आहे.
- महिला बचत गटातील लाभार्थी
- अल्प भूधारक शेतकरी (1 ते 2 हेक्टर पर्यंतचे भूधारक)
- सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले)
साधारणपणे गाय म्हशी गट वाटप योजनेची लाभार्थी निवड पात्रता दिलेली आहे. (Gai Mhashi Gat Vatap Yojana Maharashtra)
Gai Mhashi Vatap योजनेचा लाभ
या योजनेअंतर्गत सहा संकरित गाई/ म्हशींच्या एका गटाची किंमत रुपये 3,35,184 रुपये इतकी निश्चित करण्यात आली असून, त्यामध्ये खालील बाबींचा समावेश करण्यात आला आहे:-
अ.क्र. —- बाब —- किंमत रुपये
- —- सहा संकरित गाई/ म्हशींचा गट प्रति गाय/ म्हैस रु. 40,000/- प्रमाणे —- 2,40,000/-
- —- जनावरांसाठी गोठा —- 30,000/-
- —- स्वयंचलित चारा कटाई यंत्र —- 25,000/-
- —- खाद्य साठविण्यासाठी शेड —- 25,000/-
- —- 5.75 टक्के (+10.03% सेवाकर) दराने तीन वर्षांचा विमा —- 15,184/-
एकूण:- 3.35,184/- रुपये
वरीलप्रमाणे या योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थींना गटवाटप करताना 50 टक्के अनुदान म्हणजेच 1,67,592 रुपये, तर अनुसूचित जाती/ जमातींच्या लाभार्थींना ७५ टक्के अनुदान म्हणजेच 2,51,388 रुपये शासकीय अनुदान अनुज्ञेय आहे.
निवड प्रक्रिया व अर्ज
गाय/ म्हैस विमा 2024:-
गाय म्हैस अनुदान योजनेअंतर्गत 3 वर्षाचा विमा यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.
लाभार्थी निवड प्रकिया:-
लाभार्थी निवड प्रक्रिया ही लाभार्थी निवड समिती व पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत होईल
योजनेचा अर्ज सादर कुठे करावा?
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज पशुवैद्यकीय दवाखान्यात सादर करावयाचा आहे. \’Gai Mhashi Vatap Yojana Maharashtra2024\’
Yes
2गाय
I want to start new business for growing milk production..
Required a cow and beffow
2 HF Gai.
Form kasa bharaycha