लेक लाडकी योजनेसाठी हि कागदपत्रे लागतात ! lek ladki yojana documents

By Dipali Pawar

Published on:

Lek Ladki Yojana Documents – मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे यासाठी दिनांक 1 ऑगस्ट 2017 पासून माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) नविन योजना संदर्भाधीन दिनांक 1 ऑगस्ट, 2017 च्या शासन निर्णयान्वये लागू करण्यात आली आहे. सदर योजनेस मिळणारा अपुरा प्रतिसाद विचारात घेऊन, सदर योजना अधिक्रमित करुन मुलींच्या सक्षमीकरणाकरिता नवीन योजना लागू करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

त्यानुषंगाने सन 2023-24 च्या अर्थसंकल्पिय भाषणामध्ये “मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी (lek ladki yojana documents) ही नवीन योजना सुरु करण्यात येईल. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्यामध्ये अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलींचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये रोख देण्यात येतील.” अशी घोषणा करण्यात आलेली आहे. त्यास अनुसरून राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी “लेक लाडकी” ही योजना सुरू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

Lek Ladki Yojana

सदर योजनेची उद्दिष्टे खालीलप्रमाणे राहतील :-

  1. मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देवून मुलींचा जन्मदर वाढविणे.
  2. मुलींच्या शिक्षणास चालना देणे.
  3. मुलींचा मृत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखणे.
  4. कुपोषण कमी करणे.
  5. शाळाबाह्य मुलींचे प्रमाण 0 (शुन्य) वर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे.

लेक लाडकी योजना अटी व शर्ती

  • ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये दिनांक 1 एप्रिल, 2023 रोजी वा त्यानंतर जन्माला येणा-या एक अथवा दोन मुलींना लागू राहील. तसेच, एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील.
  • पहिल्या अपत्याच्या तिस-या हप्त्यासाठी व दुस-या अपत्याच्या दुस-या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता/पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
  • तसेच, दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. मात्र त्यानंतर माता / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
  • दिनांक 1 एप्रिल, 2023 पूर्वी एक मुलगी / मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना (स्वतंत्र) ही योजना अनुज्ञेय राहील. मात्र माता / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
  • लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक राहील.
  • लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु. 1 लक्ष पेक्षा जास्त नसावे.

CAA : नागरिकत्व दुरुस्ती कायदा नक्की काय आहे? जाणून घ्या | CAA act in Marathi

Lek Ladki Yojana Documents

लेक लाडकी योजना आवश्यक कागदपत्रे (lek ladki yojana documents)

  1.  लाभार्थीचा जन्माचा दाखला
  2. कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 1 लाखपेक्षा जास्त नसावे.) याबाबत तहसिलदार / सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील.
  3. लाभार्थीचे आधार कार्ड {lek ladki yojana documents} (प्रथम लाभावेळी ही अट शिथील राहील)
  4. पालकाचे आधार कार्ड
  5. बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
  6. रेशनकार्ड (पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत)
  7. मतदान ओळखपत्र (शेवटच्या लाभाकरिता 18 वर्ष पूर्ण झाल्यांनतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला)
  8. संबधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला (Bonafied)
  9. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र (“अ” येथील अटी शर्तीमधील क्रमांक 2 येथील अटीनुसार)
  10. अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील, (अविवाहीत असल्याबाबत लाभार्थीचे स्वयं घोषणापत्र).