महिला दिनानिमित्त, सोपे व सुंदर भाषण | Mahila Din Speech in Marathi

By Dipali Pawar

Published on:

Mahila Din Speech in Marathi – आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरूजनवर्ग, माझ्या मित्र – मैत्रिणींनो आणि महिला दिन साजरा करण्यासाठी जमलेल्या माझ्या तमाम महिला-भगिनींनो…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahila Din Speech in Marathi

स्त्री म्हणजे जन्मदाती,
स्त्री म्हणजे संस्कृती,
स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा,
स्त्री म्हणजे घराच घरपण,
स्त्री म्हणजे महान कार्य,
अशा या स्त्री शक्तीला मानाचा मुजरा..

आज आठ मार्च आज आपण येथे सर्वजण महिला दिन “Mahila Din Speech in Marathi” साजरा करण्यासाठी जमलो आहोत. सर्वप्रथम सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…. छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवून स्वतंत्र स्वराज्य निर्माण करून देण्यासाठी केलेल्या संघर्षाचे दर्शन देणाऱ्या राजमाता जिजाऊ, मै मेरी झाशी कभी नही दूंगी असे ठमकावून इंग्रजांशी संघर्ष करणारी राणी लक्ष्मीबाई आणि स्त्री शिक्षणाची महती ओळखून मुलींना स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करून देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्व स्त्रियांच्या कार्याला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते.

या दिनाची खरी सुरुवात कधी झाली. हे तुम्हाला माहिती आहे का? तर या दिवसाची खरी सुरुवात स्त्रियांच्या सामूहिक प्रयत्नांनी अमेरिकेत 1908 साली झाली ८ मार्च 1908 मध्ये न्यूयॉर्कमध्ये कपड्याच्या कारखान्यात काम करत असलेल्या महिलांनी काम जास्त पण मजुरी कमी या कारणामुळे लढा पुकारला. स्त्रियांनी संघटित होऊन स्वतःचा अधिकार मागण्यासाठी केलेला संघर्ष हा जगाच्या इतिहासातील पहिला संघर्ष मानला जातो. त्यानंतर 1910 साली सर्व महिला प्रतिनिधींसह कार्यकर्ती क्लारा जेठगी यांनी सुचवल्याप्रमाणे 8 मार्च या दिवसाला जागतिक महिला दिन(Mahila Din Speech in Marathi) म्हणून मान्यता मिळाली.

तुझ्या उत्तुंग भरारी पुढे
गगन ही ठेंगणे भासावे,
तुझ्या विशाल पंखाखाली
विश्व ते सारे वसावे….

आज सर्वत्र जगभर महिला दिन Mahila Din Speech in Marathi साजरा होत आहे सर्व महिला आज हा सन्मानाचा अभिमानाचा दिवस उत्साहाने साजरा करत आहे आज सर्वत्र कर्तृत्ववान महिलांचे समाजात मोलाचे काम करणाऱ्या महिलांचे गृह उद्योग चालवणाऱ्या महिलांचा सत्कार केला जातो त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले जाते. आज भारतातील स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगतीपथावर आहे शेतीतील मजुरापासून ते देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत तसेच शिक्षिका डॉक्टर पोलीस पोलीस निरीक्षक तलाठी ग्रामसेविका पायलट खेळाडू अशा अनेक क्षेत्रात महिलांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. आपल्या भारत देशामधील अनेक महिलांनी विविध क्षेत्रात आपले नाव कमावले आहे.

भारताच्या पहिला महिला Mahila Din Speech in Marathi पंतप्रधान इंदिरा गांधी, भारताच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेल्या महिला प्रतिभाताई पाटील, भारतीय पोलीस सेवेत अधिकार पदी असलेल्या किरण बेदी, भारतरत्न किताबाच्या मानकरी गाणं सम्राज्ञ लता मंगेशकर एक स्त्री म्हणून अशा या स्त्रियांचा गौरव सांगताना मला खूप अभिमान वाटत आहे. सलाम या नारी शक्तीला…. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असे म्हटले जाते, हे सिद्ध करणारी अनेक उदाहरणे आपल्या समाजात आहेत स्त्री शिक्षणाची महती ओळखून स्त्री शिक्षणाचा वारसा हाती घेतलेल्या महात्मा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी स्वतः शिकून वारसा चालवला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षण घेताना त्यांची परीक्षा फी भरण्यासाठी त्यांची पत्नी रमाबाई यांनी कष्ट करून पैसे कमावले अशी अनेक उदाहरणे पुरुषांच्या यशामागे स्त्रियांचा वाटा दर्शवतात.

आपल्या इतिहासात हिरकणी सारखी एक आई होऊन गेली जी स्वतःच्या बाळाच्या प्रेमापोटी रायगडाचा उभा करा उतरून आली झाशीची राणी होऊन गेली जी बाळ पाठीवर बांधून लढली त्यावरून स्त्री एक आघात शक्तीचे रूप आहे हे समजते. आज इथे सर्व स्त्रिया आनंदीत आहे पण खरच श्री स्वातंत्र झाली आहे का हा प्रश्न समाजाला विचारांची वेळ आली आहे आज ही समाजात स्त्री असुरक्षित आहे लैंगिक शोषण अत्याचार या गोष्टींमुळे स्त्रियांचे मुलींचे जीवन धोक्यात येत आहे.

२५ हजार रु. मिळणार! सामूहिक विवाह योजना : Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024

आज ही समाजात मुलींना जन्म देताना विचार केला जातो मुलींचा तिरस्कार केला जातो महिलांचा अपमान केला जातो असा अत्याचार करणाऱ्याने हे लक्षात ठेवले पाहिजे की ती महिला कोणाची तरी आई बहीण किंवा मुलगीच आहे स्त्री पुरुष समानता ही समाजात आचरणात आणायला हवी प्रत्येक स्त्री (Mahila Din Speech in Marathi) ही समाजात स्वतःची ओळख निर्माण करीत आहे त्यांचे कार्यक्षेत्र विस्तारले आहे आपण अशा स्त्रियांना प्रोत्साहन दिले पाहिजे कुटुंबातील केवळ निर्णय तिच्यावर थोपवणे ऐवजी निर्णय घेण्यात तिला सामील करून घ्यायला हवे, स्त्री सन्मानाची सुरुवात आपल्या घरापासूनच करायला हवी तरच आपल्या भारत देश सुरक्षित सक्षम आणि बलवान होईल शेवटी मी हेच म्हणू इच्छिते की….

तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार
लक्ष लक्ष दिव्यांनी उधळू दे, तुझा संसार
कर्तृत्व अनसामर्थ्याची ओढून घे, नवी झालर
स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर !