२५ हजार रु. मिळणार! सामूहिक विवाह योजना : Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024

By Shubham Pawar

Published on:

Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024 :- नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या/ शेतमजुरांच्या मुलींच्या सामुहिक विवाहासाठी शुभमंगल/ नोंदणीकृत विवाह योजनेसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते. महाराष्ट्र राज्याच्या निर्णयामध्ये आता प्रत्तेक जोडप्याला किती अनुदान देण्यात येणार आहे याविषयी आपण सर्व माहिती आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत. ही पोस्ट शेवटपर्यंत पाहा. आपल्या मित्रांना ही महत्वपूर्ण माहिती शेअर करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024

शासन निर्णय, महिला व बाल विकास विभाग, दि.07-05-2008 अन्वये, महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या मुलींच्या सामुहिक किंवा नोंदणीकृत विवाहासाठी “शुभमंगल सामूहिक/नोंदणीकृत विवाह योजना” (Samuhik Vivah Yojana) राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत शेतकरी/शेतमजुर कुटुंबातील मुलीच्या विवाहासाठी आवश्यक असलेल्या मंगळसुत्र व इतर वस्तुंची खरेदी करण्यासाठी प्रती जोडपे रु.10,000/- एवढे अनुदान शासनातर्फे देण्यात येते.

सदर अनुदान वधुच्या वडीलांच्या नावाने, वडील हयात नसल्यास आईच्या नावाने व आई-वडील दोन्हीही हयात नसल्यास वधुच्या नावाने धनादेशाद्वारे देण्यात येते. तसेच सामुहिक विवाह राबविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्रत्येक जोडप्यामागे रु.2,000/- एवढे प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यात येते.

उक्त नमूद शासन निर्णयातील तरतुदींमध्ये आवश्यकतेनुसार बदल करुन शासन निर्णय, महिला व बाल विकास विभाग, दि.30-09-2011 अन्वये, सदर सुधारीत “शुभमंगल सामुहिक/नोंदणीकृत विवाह योजना” संपुर्णपणे “जिल्हा नियोजन विकास समिती” (DPDC) मार्फत राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

२५ हजार रु. मिळणार! Samuhik Vivah Yojana

शासन निर्णय, महिला व बाल विकास विभाग, दि.30-09-2011 अन्वये कार्यान्वित “शुभमंगल सामुहिक/नोंदणीकृत विवाह योजनेची Samuhik Vivah Yojana व्याप्ती वाढवून, ती केवळ शेतकरी/शेतमजुर यांच्यासाठी न ठेवता, अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/विमुक्त जाती / भटक्या जमाती/विशेष मागास प्रवर्ग वगळता अन्य प्रवर्गातील रुपये एक लक्ष पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या निराधार/परित्यक्ता आणि विधवा महिलांच्या केवळ दोन मुलींच्या विवाहाकरीता शासन निर्णय, महिला व बाल विकास विभाग, दि.15-02-2014 अन्वये लागु करण्यात आली आहे.

Samuhik Vivah Yojana “शुभमंगल सामुहिक/नोंदणीकृत विवाह” योजनेच्या अंमलबजावणीस जवळपास 10 वर्षांचा कालावधी उलटून गेला असून, त्यानुसार महागाईच्या दरामध्ये वाढ झालेली आहे. तसेच, महाराष्ट्र राज्याचे “4 थे महिला धोरण-2024” दि. 07-03-2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आले असून, त्यामध्ये शुभमंगल सामुहिक विवाह योजनेंतर्गत प्रती जोडपे देण्यात येणाऱ्या रु.10,000/- या रक्कमेत उचित वाढ करण्याचा विचार केला जाईल, असे स्पष्ट केले आहे. त्यास अनुसरुन “शुभमंगल सामुहिक/नोंदणीकृत विवाह योजना अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

सामूहिक विवाह योजना 2024 बद्दल माहिती

योजनेचे नाव   सामूहिक विवाह योजना
सुरू केले होते   महाराष्ट्र सरकार
संबंधित विभाग   महिला व बाल विकास विभाग
लाभार्थी राज्यातील गरीब कुटुंबातील मुली
वस्तुनिष्ठ मुलीच्या लग्नासाठी आर्थिक मदत देणे
फायदा  25,000 रुपयांची आर्थिक मदत  
राज्य   महाराष्ट्र
अर्ज प्रक्रिया ऑफलाइन
अधिकृत संकेतस्थळ   womenchild.maharashtra.gov.in

 

 

Samuhik Vivah Yojana

शासन निर्णय 

  1. “शुभमंगल सामुहिक/नोंदणीकृत विवाह” योजनेंतर्गत मुलीच्या विवाहासाठी आवश्यक असलेल्या वस्तुंची खरेदी करण्यासाठी देण्यात येणाऱ्या प्रती जोडपे रु.10,000/- या अनुदानात वाढ करुन प्रती जोडपे रु.25,000/- इतके अनुदान देण्यास तसेच सामुहिक विवाह राबविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्रत्येक जोडप्यामागे देण्यात येणाऱ्या रु.2,000/- या अनुदानात वाढ करुन, प्रती जोडपे रु.2,500/- एवढे प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
  2. सदर योजनेच्या अटी व शर्ती तसेच कार्यपध्दती शासन निर्णय, महिला व बाल विकास विभाग, दि.07-05-2008, दि.30-09-2011 व दि.15-02-2014 अन्वये विहीत केल्यानुसारच राहतील.
  3. सदर योजनेतील लाभार्थीना शासनाच्या अन्य विभागांकडून राबविण्यात येणाऱ्या सामुहिक विवाह योजनेंतर्गत लाभ मंजुर करता येणार नाही.
  4. सदर योजनेंतर्गत शासन निर्णय, दि.30-09-2011 अन्वये, जिल्हा महिला व बाल अधिकारी कार्यालयामार्फत संबंधीत बँकेच्या शाखेमध्ये रक्कम जमा करावी व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात बँकींग Electronic Transfer Facility Samuhik Vivah Yojana ने किंवा इतर मार्गाने त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात यावी, अशी तरतूद आहे. आता, त्यात बदल करुन संबंधित जिल्हा महिला व बाल अधिकारी कार्यालयामार्फत अनुदानाची रक्कम थेट लाभार्थी हस्तांतरण (DBT) पध्दतीने संबंधीत लाभार्थ्यांच्या खाती जमा करण्यात यावी, अशी तरतूद या शासन निर्णयाद्वारे करण्यात येत आहे.
  5. सदर शासन निर्णयातील तरतूदी दि.01,04,2024 पासून लागू होतील.
  6. सदर शासन निर्णय नियोजन व वित्त विभागाने दिलेल्या सहमती व दि.13-03-2024 रोजीच्या मा. मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

Samuhik Vivah Yojana Documents List

आवश्यक कागदपत्रांची यादी
  1. वधू आणि वरचा फोटो (जोडपे)
  2. जोडप्याचे आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र (वधू आणि वर)
  3. वधू आणि वर यांचे जन्म प्रमाणपत्र (जोडपे)
  4. नवविवाहित मुलीचे बँक पासबुक
  5. पत्त्याचा पुरावा
  6. अर्ज करणाऱ्या कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र
  7. जात प्रमाणपत्र (केवळ अनुसूचित जाती (SC)/जमाती (ST) आणि इतर मागासवर्गीय (OBC) साठी)

शासन निर्णय GR डाऊनलोड 

Conclusion & FAQ

मित्रांनो , ह्या पोस्ट मध्ये आम्ही मुलींच्या सामुहिक विवाहासाठी शुभमंगल/ नोंदणीकृत विवाह योजनेसाठी शासनाकडून किती अनुदान देण्यात येणारआहे ही माहिती पाहिली आहे.  मला आशा आहे कि तुम्हांला हि पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत शेअर कराल.

धन्यवाद !

समुदायांबाबत काही निर्बंध आहेत का?

नाही, कोणतेही बंधन नाही. वधू कोणत्याही समुदायाची असू शकते.

इतर राज्यातील अर्जदार या योजनेसाठी अर्ज करू शकतात?

फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवासी.

अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न किती असावे?

तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1,00,000 रुपयांपेक्षा कमी किंवा समान असावे.

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.