{अर्ज डाउनलोड} शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 Form

शरद पवार ग्राम समृद्धी योजना (sharad pawar gram samridhi yojana form) – ग्रामपंचायत स्तरावर राबवण्यास सुरवात पहा नवीन अर्ज डाउनलोड करा.

⚡ इच्छुक व्यक्तींनी आपल्या ग्रामपंचायत/पंचायतसमितिच्या संपर्कात राहून या योजनेचा लाभ घ्यावा.

✅ चार वैयक्तिक लाभाच्या योजनांचा समावेश:

 

Sharad Pawar Gram Samridhi Yojana Form
Sharad Pawar Gram Samridhi Yojana Form

Sharad Pawar Gram Samridhi Yojana Arj

🎯 गाय व म्हैस याकरिता पक्का गोठा बांधणे:

📌 अकुशल खर्च – रु. 6,188/- (प्रमाण 8 टक्के )
📌 कुशल खर्च – रु.71,000/- (प्रमाण 92 टक्के )
📌 एकूण – रु.77,188/- (प्रमाण 100 टक्के )

🎯 शेळीपालन शेड बांधणे:

📌 अकुशल खर्च – रु. 4,284/- (प्रमाण 8 टक्के)
📌 कुशल खर्च – रु.45,000/- (प्रमाण 92 टक्के)
📌 एकूण – रु.49,284/- (प्रमाण 100 टक्के)

🎯 कुक्कुटपालन शेड बांधणे:

📌 अकुशल खर्च – रु. 4,760/- (प्रमाण 10 टक्के)
📌 कुशल खर्च – रु.45,000/- (प्रमाण 90 टक्के)
📌 एकूण – रु.49,760/- (प्रमाण 100 टक्के)

🎯 भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग:

📌 अकुशल खर्च – रु. 4,046/- (प्रमाण 38 टक्के)
📌 कुशल खर्च – रु. 6,491/- (प्रमाण 62 टक्के)
📌 एकूण – रु.10,537/- (प्रमाण 100 टक्के

 Yojana Form Download

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून  ‘शरद पवार ग्रामसमृद्धी योजना (Sharad Pawar Gram Samridhi) ‘ राबविण्याचा शासन निर्णय 3 फेब्रुवारी 2022 रोजी आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. कामांतून सामूहिक आणि वैयक्तिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून प्रत्येक ग्रामपंचायत व त्या ग्रामपंचायतीतील घटक गावे समृद्ध होतील हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही योजना राबविण्यात येणार आहे. ही योजना नेमकी कशी आहे ते जाणून घेऊया.

‘मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध’ या ध्येयासाठी चार वैयक्तिक लाभाच्या योजना शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेत राबविण्यात येतील.

त्यामध्ये प्रत्येक लाभार्थीला गाय व म्हैस याकरिता पक्का गोठा बांधणे, शेळीपालन शेड बांधणे, कुक्कुटपालन शेड बांधणे तसेच भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग या चार वैयक्तिक कामांच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्यात येणार आहे.

Sharad Pawar Gram Samridhi Yojana Form

ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्याला वैयक्तिक व सार्वजनिक कामे हाती घेऊन त्याद्वारे कायमस्वरुपी मत्ता निर्माण करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे व कामाअभावी होणारे स्थलांतर थांबविणे हा उद्देश आहे.

या कामांसाठी आवश्यक असणारे ६०:४० अकुशल-कुशल कामगारांचे प्रमाण संतुलित राहण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या विविध योजनांच्या जसे की, शेततळे, वृक्ष लागवड, शोषखड्डे, फळबाग लागवड, इत्यादी अकुशल खर्चाचे प्रमाण जास्त असलेल्या योजनांच्या संयोजनातून या बाबी दिल्याने प्रत्येक शेतकरी समृद्ध (लखपती) होतील, असा योजनेचा उद्देश आहे.

 

🔴 अर्ज डाऊनोड करा – Download

नवीन अर्ज डाऊनलोड – क्लिक करा

🔴  Sharad Pawar Gram Samridhi Yojana GR (शासन निर्णय) - Download

 

1 thought on “{अर्ज डाउनलोड} शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 Form”

Leave a Comment

close button