वस्त्रोद्योग विणकरांना 20,000 रु. बक्षीस योजना | Vastrodyog Vinkar Bakshish Yojana 2023

By Shubham Pawar

Updated on:

LVastrodyog Vinkar Bakshish Yojana :- नमस्कार मित्रांनो, पारंपारिक वस्त्रोद्योग विणकारांना बक्षीस योजना सुरू करण्यात आलेली आहे राज्याच्या वस्त्रोगाच्या वाढीस चालना देण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे, पहिल्या पुरस्काराचे बक्षीस अनुक्रमे 20,000 रुपये राहणार आहे तरी या योजनेचे निकष नियम अटी आणि कार्यपद्धती कशा पद्धतीने राहील? हे आपण आज पाहणार आहोत. पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना राज्याच्या वस्त्रोद्योगाच्या वाढीस चालना देण्यासाठी व वस्त्रोद्योगाला आवश्यक त्या उपाययोजनांना हातभार लावण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सन 2023 मध्ये पुढील 5 वर्षाच्या कालावधीसाठी एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023-2028 जाहिर केलेले आहे.

Vastrodyog Vinkar Bakshish Yojana Details :-

PlanVastrodyog Vinkar Bakshish Yojana
StartedMaharashtra Gov.
Year2023
beneficiaryScheme for textile weavers
Apply ProcessNA
Update2023-2028

 

Vinkar Bakshish Yojana 2023

धोरणातील मुद्दा क्र – 7.8 मध्ये पारंपारिक वस्त्रोद्योग, अतिरिक्त प्रोत्साहने हातमाग विणकर समुदयांचा योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि सामाजिक व आर्थिक विकासात या क्षेत्राच्या योगदानावर प्रकाश टाकण्यासाठी महाराष्ट्रातील पाच पारंपारीक क्षेत्रांमधील सर्वोत्कृष्ट डिझाईनचा राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त सत्कार केला जाईल. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या पुरस्कारासाठी अनुक्रमे रु. 20,000/-, रु.15,000/- आणि रू. 10,000/- बक्षिस दिले जाईल. यामुळे हातमागाच्या कलेच्या वाणांचे संरक्षण होईल आणि याक्षेत्रामध्ये मोठया संधी उपलब्ध होतील असे नमूद आहे.

महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योग क्षेत्राला प्राचीन काळापासून प्रदीर्घ इतिहास आहे. ही वस्त्रे कापूस, रेशीम, आणि लोकर यासह विविध प्रकारच्या सामुग्री पासून तयार केली जातात. उपजिवीकेचे संरक्षण सुनिश्चित करून पारंपारीक वस्त्रोद्योग विणकराना इतर रोजगारांकडे स्थलांतरीत होण्यापासून परावृत्त करण्याच्या दृष्टीने अतिरीक्त प्रोत्साहन देणे या धोरणाचे उदिष्ट आहे.

Traditional varieties of Vastrodyog Vinkar Bakshish Yojana :-

महाराष्ट्रातील खालील पाच वस्त्रांना पारंपारीक वाण म्हणून घोषीत करण्यात आलेले आहे.

  1. पैठणी साडी
  2. हिमरू शॉल
  3. करवत काटी
  4. घोंगडी
  5. खण फॅब्रीक

राज्यातील पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना प्रोत्साहन देण्याकरीता पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना तयार करण्यात आली आहे. राज्यातील पारंपारीक वस्त्रोद्योग विणकरांचा सन्मान करण्यासाठी आणि सामाजिक व आर्थिक विकासात या क्षेत्राच्या योगदानावर प्रकाश टाकण्यासाठी, पारंपारीक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजनेस या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे.

  • सदर योजनेअंतर्गत पाच पारंपारिक
  1.  पैठणी साडी
  2. हिमरू शाल
  3. करवत काटी साडी
  4. घोंगडी
  5. खण फॅब्रीक

हया वस्त्रोद्योग क्षेत्रामधील सर्वोत्कृष्ट डिझाईन्सचा राष्ट्रीय हातमाग दिनानिमित सत्कार केला जाईल. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाला अनुक्रमे रू.२०,०००/- रू.१५,०००/- आणि रू.१०,०००/- बक्षिस दिले जाईल. सदर बक्षिसाची रक्कम पारंपारीक वस्त्रोद्योग विणकरांच्या बैंक खात्यामध्ये DBT प्रणालीद्वारे अदा करण्यात येईल.

Vinkar Bakshish Yojana criteria:

  •  पारंपारिक वस्त्राचे विणकाम करणारे सर्व विणकर, खाजगी / सहकारी संस्था/ महामंडळ/महासंघाचे स्वयंसेवी संस्था/ गट सदर स्पर्धेत भाग घेवू शकतील.
  • अर्जासोबत विणकाम करतानाचा विणकराचा जिओ टॅगींग फोटो सादर करणे गरजेचे राहील.
  • महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

पुरस्कार निवड करण्याची कार्यपध्दती :- 

  1. स्पर्धेत ठेवण्यांत आलेल्या वाणांचा प्रकार पारंपारीक ५ वस्त्रापैकीच असावा.
  2. निवड समिती प्रत्येक पारंपारीक वाणातून पहिले, दूसरे व तिस-या बक्षिसासाठी वाणाची निवड करेल.
  3. निवड समितीतील प्रत्येक सदस्यास एका वाणास १० पर्यंत गुण देण्याचे अधिकार असतील.
  4. एकूण गुणांच्या आकडेवारीच्या आधारे पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या • बक्षिसासाठी निवड करण्यात येईल.
  5. सारखे गुण आल्यास समिती निर्णयानुसार एक बक्षिस दोन स्पर्धकामध्ये विभागून देण्यात येईल.
  6. गुणाचे वाटप, कापडावरील नक्षिकाम (डिझाइन), त्याची अचूकता (करेक्टनेस), रंगसंगती, व कापडाची आकर्षकता यांच्या आधारे करण्यांत येईल

Cost of Vastrodyog Vinakarana Bakshish Yojana

Cost of Vastrodyog Vinakarana Bakshish Yojana
Cost of Vastrodyog Vinakarana Bakshish Yojana
  1. विजेत्या पारंपारीक वस्त्रोद्योग विणकराला आयुक्त वस्त्रोद्योग यांचे मार्फत पुरस्काराची रक्कम व प्रशस्ती पत्राचे वाटप करण्यात येईल.
  2. स्पर्धेत सहभागी होणा-या स्पर्धकाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रमाणपत्र देण्यात येईल.
  3. राज्य स्तरीय पारंपारिक वस्त्रोद्योग कापड स्पर्धा वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या स्तरावर आयोजित करण्यात येईल.
GR DOWNLOAD - HERE

I am a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Developer and Owner/founder of Marathi Corner. 6 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: मित्रा, कॉपी करायचं नसतं !! शेअर करायचं असतं !!