अर्ज विणकर कुटुंबाना 200 युनिट पर्यंत फ्री लाईट | Hatmag Vinkar Mofat Light Yojana 2023

By Shubham Pawar

Updated on:

Hatmag Vinkar Mofat Light Yojana :- नमस्कार मित्रांनो, हातमाग विणकर कुटुंबांना प्रत्येक महिन्याला 200 युनिट पर्यंत मोफत (Free) वीज दिली जाणार आहे, त्या संदर्भात नवीन जीआर काढण्यात आलेला आहे. या लेखात आपण हातमाग विणकारांची पात्रता काय आहे? या योजनेचे अंमलबजावणी कशी होणारे याची सर्व माहिती घेणार आहोत. राज्यातील वस्त्रोद्योग क्षेत्राच्या वाढीस चालना देण्यासाठी दिनांक 02/06/2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023-2028 जाहिर केलेले आहे. सदर धोरणाचे हातमाग विणकरांना उपजिविकेचे संरक्षण सुनिश्चित करुन हातमाग वस्त्रोद्योग विणकरांचा आर्थिक व सामाजिक विकास करण्याच्या दृष्टिने अतिरिक्त प्रोत्साहन देणे हे एक उद्दिष्ट आहे.

Hatmag Vinkar Mofat Light Yojana Details:-

PlanHatmag Vinkar Mofat Light Yojana
StartedMaharashtra Gov.
Year2023
beneficiaryA family of handloom weavers
Apply ProcessOffline
Update2023-2028

 

Hatmag Vinkar Mofat Vij Yojana

सदर धोरणातील परिच्छेद क्र. ७.४ मध्ये हातमाग विणकरांच्या कुटुंबाना प्रतिमाह 200 युनिट पर्यंत मोफत वीज देण्यात येईल असे नमूद केले आहे. सदर अनुषंगाने हातमाग विणकरांच्या कुटूंबाना प्रतिमाह 200 युनिट पर्यंत मोफत वीज देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023-28 नुसार हातमाग विणकरांना उपजिविकेचे संरक्षण सुनिश्चित करुन हातमाग वस्त्रोद्योग विणकरांचा आर्थिक व सामाजिक विकास करण्याच्या • दृष्टिने अतिरिक्त प्रोत्साहने देण्याच्या अनुषंगाने हातमाग विणकर कुटुंबाना प्रतिमाह २०० युनिट पर्यंत मोफत वीज देण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

Eligibility of Hatmag Vinkar Free Light Yojana-

  •  लाभार्थी हातमाग विणकर हा केंद्र शासनाच्या सर्वात अलीकडचे हातमाग अंतर्गत नोंदणीकृत विणकर असावा व त्यांच्याकडे तसे ओळखपत्र असावे.
  • एकाच कुटुंबात जास्त लाभार्थी असतील तर फक्त एकच लाभार्थी सदर योजनेसाठी अर्ज करु शकेल.
  • अर्जाच्या दिनांकापूर्वी सहा महिन्यापासून विणकर व्यवसायात कार्यरत असावा.
  • विणकाम करत असल्याचा मागील 6 महिन्याचा पुरावा म्हणून कच्चा माल खरेदीचे बील/ पक्का माल विक्रीचे बील/महामंडळ, महासंघ अथवा संस्थेचा सभासद असल्यास सदर विणकरास विणकाम मजूरी दिल्याबाबत संबंधित संस्थेचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.
  • अर्जदाराकडे महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचा दाखला असणे आवश्यक.
  • लाभार्थी हातमाग विणकर कुटुंबाचे नावे वीज जोडणी असावी.
  • हातमाग विणकरांच्या कुटुंबाना दरमहा 1 ते 200 युनिट पर्यंत (२०० युनिट) मोफत वीज शासनामार्फत देण्यात येईल त्यापेक्षा जास्त म्हणजे 200 युनिटच्या वर वापर झालेल्या बीलाची रक्कम स्वतः लाभार्थ्याला भरावी लागेल..
  • विणकर कुटुंबाने वीज बील देयकाची रक्कम नियमीत भरणा करणे गरजेचे राहिल. विलंब बील भरणा आकारणीची रक्कम शासनाकडून देय होणार नाही.
  • सदर योजनेतील लाभार्थी हातमाग विणकरांचा शासन यंत्रणेद्वारे नियमित आढावा घेण्यात येईल. सदर आढाव्यामध्ये हातमाग व्यवसाय सोडला असल्याचे आढळून आल्यास असा लाभार्थी वीज अनुदान सवलतीस पात्र राहणार नाही

Implementation of Hatmag Vinkar Mofat Light Yojana

  1.  वरील पात्रता धारण करणारा व्यक्ती सोबत जोडलेल्या परिशिष्ट अ मध्ये संबंधीत प्रादेशिक उपायुक्त यांचेकडे अर्ज सादर करतील.
  2. दरमहा प्राप्त झालेले अर्ज संबंधित प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग व विणकर सेवा केंद्र यांचे कार्यालयातील तांत्रिक अधिकारी / कर्मचारी हे सदर अर्जदार विणकर व्यवसाय करीत असल्याची स्थळ तपासणी करतील. संबंधित प्रादेशिक उपायुक्त (वस्त्रोद्योग) प्राप्त अर्जांची छाननी व तपासणी करुन आपल्या शिफारशींसह हातमाग विणकरांची यादी आयुक्त (वस्त्रोद्योग) वस्त्रोद्योग आयुक्तालय, नागपूर यांना मंजूरीसाठी सादर करतील.
  3. प्रादेशिक उपायुक्त, वस्त्रोद्योग यांचे कार्यालयाकडून प्राप्त अर्ज खालील गठीत समिती समोर ठेवण्यात येतील.

Hatmag Vinkar Mofat Vij (Light) Yojana Application form

सदर समितीची बैठक दरमहा आयोजित केली जाईल. बैठकीमध्ये प्राप्त अर्जाची छाननी करून पात्र अर्जदारास वीज सवलत सुरू करण्यासाठी मान्यता देईल व पुढील कार्यवाहीसाठी महावितरण कंपनीला कळविण्यात येईल.

महावितरण कंपनीने प्रत्येक तिमाहीला देण्यात आलेली वीज सवलत विभागाकडे मागणी करावी. सदर रक्कम विभागाकडून महावितरण कंपनीला त्यांनी दिलेल्या खात्यावर आयुक्त वस्त्रोद्योग

यांचे मार्फत RTGS / धनादेशाद्वारे वर्ग करण्यात येईल. ५. सदर योजनेकरीता ” मागणी क्रमांक व्ही-२, लेखाशिर्ष- २८५१, ग्रामोद्योग 3/6 प.

संमिश्र ग्रामोद्योग व लघुउद्योग आणि सहकारी संस्था, (०३) (०५) एकात्मिक व शा घ २०२३-२८ अंतर्गत हातमाग विणकर कुटुंबाना प्रतिमाह २०० युनिट पर्यंत मोफत वीज याजना (२८५) ७४३६), ३३, अर्थसहाय्य या लेखाशिर्षाखाली सन २०२३ २४ करीता अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या तरतूदीतून भागविण्यात यावा व त्याच लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा.

GR and Form Download – HERE

I am a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Developer and Owner/founder of Marathi Corner. 6 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: मित्रा, कॉपी करायचं नसतं !! शेअर करायचं असतं !!