नमस्कार मित्रांनो , आज आपण लेक लाडकी योजना महाराष्ट्र या योजनेची संपूर्ण माहिती बघणार आहोत . मित्रांनो तुम्हाला Lek Ladki Yojana लाभ घ्यायचा असेल आणि तुम्हाला १ लाख १ हजार रुपये चा लाभ घ्यायचा असेल , तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. चला तर मग मित्रांनो पाहुयात , काय आहे लेक लाडकी योजना लाभार्थी पात्रता, आवश्यक कागदपत्रे, लेक लाडकी योजना 2024 चे लाभ कोणते ? इत्यादी सर्व माहिती आपण ह्या लेखात पाहणार आहोत.
लेक लाडकी योजनेचा उद्देश्य काय ?
महाराष्ट्र शासनाची लेक लाडकी योजना सुरु करण्या मागचा मुख्य उद्देश्य राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलीच्या जन्मापासून तिच्या शिक्षणापर्यंत आर्थिक मदत करणे हा आहे. जेणेकरून समाजात मुलींबद्दल निर्माण झालेली नकारात्मक विचारसरणी बदलता येईल आणि भ्रूणहत्येसारखं गुन्हे थांबू शकतात.
या योजनेच्या माध्यमातून मुलींना ५ श्रेणींमध्ये आर्थिक निधी दिला जाणार आहे. मुलीच्या जन्मापासून तिच्या शिक्षणापर्यंत आर्थिक मदत महाराष्ट्र सरकारकडून केली जाईल .लाभार्थी मुलगी १८ वर्षांची झाल्यावर तिला पुढील शिक्षणासाठी ७५ हजार रुपये दिले जातील . जेणेकरून मुलीला उच्च दर्जाचे शिक्षणाचा लाभ घेता येईल . त्याचे भविष्य उज्वल करता येईल .
लेक लाडकी योजनेचे स्वरूप कसे आहे ?
राज्यात मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळा बाह्यमुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे यासाठी मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ ही योजना राज्यात सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी दिली.
Lek Ladki Yojana 2024 Maharashtra
१८ व्या वर्षी मुलींना ७५ हजार रु. लेक लाडकी योजना महाराष्ट्र Lek Ladki Yojana Maharashtra
लेक लाडकी योजनेचे प्रमुख मुद्दे ? Lek Ladki Yojana 2024 Maharashtra
- मुलीचा जन्म सरकारी दवाखान्यात झाला पाहिजे .
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या जन्मापासून अर्ज करावा लागतो .
- गरीब कुटुंबात मुलगी जन्माला येणे हे ओझे मानले जाणार नाही .
- लेक लाडकी योजना राज्यातील जवळच्या कुटुंबात जन्मलेल्या मुलींना आर्थिक मदत देऊन भविष्य उज्वल करेल .
- समाजातील मुलींवरील असमानता दूर करता येईल .
- या योजनेमुळे राज्यातील मुलींबाबत सकारात्मक विचार विकसित होईल .
लेक लाडकी योजनेसाठी लाभार्थी ची पात्रता काय असेल ?
- लेक लाडकी योजना महाराष्ट्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणारा हा प्रथम महाराष्ट्र मधील असावा
तो भारतीय नागरिक असावा . - लेक लाडकी योजना हि मुलींसाठी बनवलेली योजना आहे .
- ज्या कुटुंबाकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहेत तेच कुटुंबातील मुली ह्या योजनेसाठी पात्र असतील .
- वयाच्या १८ वर्षापर्यंत लेक लाडकी योजनेचा लाभ हा लाभार्थीना दिला जाईल .
- लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेचे खाते असणे अत्यंत आवश्यक आहे .
लेक लाडकी योजनेसाठी लागणारे कागदपत्रे : Lek Ladki Yojana 2024 Documents
- पालकांचे आधार कार्ड
- मुलीचे जन्म दाखला
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- बँकेचे खाते पासबुक झेरॉक्स
- जातीचा दाखला
- दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड [ पिवळे / केशरी ]
- उत्पन्नाचा वार्षिक दाखला
- कुटुंबातील सदस्याचा चालू असलेला मोबाईल नंबर
लेक लाडकी योजना अर्ज कसा कराल ?
ह्या लेखामध्ये तुम्हाला Lek Ladki Yojana 2024 Maharashtra योजनेबद्दल माहिती मिळाली महाराष्ट्र सरकारने वार्षिक अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील मुलींसाठी महाराष्ट्र लेक लाडकी योजना सुरु करण्याची घोषणा केली. लेक लाडकी योजने अंतर्ग्रत ऑफलाईन किंवा ऑनलाईन चालू होण्याची माहिती शासन लवकरच जाहीर करेल.
मित्रांनो , या पोस्टमध्ये आम्ही लेक लाडकी योजनेबद्दल माहिती दिली आहे जसे कि , लेक लाडकी योजना काय आहे , या योजनेचे प्रमुख मुद्दे काय आहेत ? या योजनेसाठी पात्रता काय असेल त्याचप्रमाणे लेक लाडकी योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतील ? मला आशा आहे कि तुम्हाला हि पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत शेअर कराल
धन्यवाद !