नमस्कार मित्रांनो, आज आपण प्रधानमंत्री मातृवंदना योजना महाराष्ट्र या योजनेची माहिती बघणार आहोत. ह्या योजनेची नवीन माहिती आलेली आहे, ह्या माहिती नुसार महिलांना एकूण ११,००० हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहेत. ह्या योजनेसाठी पात्रता, लाभार्थी, अर्ज कसा करायचा इत्यादी अर्जविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
मित्रांनो तुम्हाला प्रधानमंत्री मातृवंदना योजना महाराष्ट्र या योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि ११ हजार रुपये लाभ घ्यायचा असेल, तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. चला तर मग मित्रांनो पाहुयात, काय आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना, लाभार्थी पात्रता, लागणारी आवश्यक कागदपत्रे, या योजनेचे लाभ कोणते? प्रधानमंत्री मातृवंदना योजना या योजनेसाठी अर्ज कसा करायांचा? सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
Matruvandana Yojana Maharashtra 2024
काय आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना महाराष्ट्र?
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्याला सरकारकडे अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे दिलेली आहेत ह्या लेखात, ती कागदपत्रे अर्जाला जोडून अर्ज तलाठी किंवा समाज कल्याण / पंचायत समिती मध्ये सादर करावा. हा अर्ज दिल्यानंतर पहिला हफ्ता ५००० रुपये तसेच दुसऱ्या अपत्य मुलगी झाल्यास त्या मुलीच्या जन्मानंतर एकाच टप्प्यामध्ये ६००० रुपये लाभ मिळेल. अश्या प्रकारे दोन विभागामध्ये एकूण ११००० रुपयांचा लाभ हा लाभार्थीना सरकारकडून या योजनेच्या अंतर्गत मिळणार आहे.
प्रधानमंत्री मातृवंदना योजना महाराष्ट्र उद्दिष्ट्ये :
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा उद्दिष्ट्ये अस आहे कि, कामगार महिलांना मजुरी कमी झाल्याबद्दल भरपाई देऊ करणे आणि त्यांना योग्य तशी विश्रांती आणि पोषण आरोग्य निश्चित करणे आहे.
त्याचप्रमाणे गरोदर स्त्रिया आणि माता ह्यांचे आरोग्य सुधारून त्यांना कमी प्रमाणात पोषण नाही ना मिळत ह्याची काळजी घेणे. \’प्रधानमंत्री मातृवंदना योजना महाराष्ट्र\’
- माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करुन त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी.
- जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारावे आणि माता मृत्यू व बाल मृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रणात रहावा.
- सदरचा लाभ हा जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर सुधारणे, स्त्री भ्रूणहत्येस अवरोध करणे आणि स्त्री जन्माचे स्वागत होण्यासाठी हितकारी ठरेल.
Matruvandana Yojana 2024 Maharashtra
प्रधानमंत्री मातृवंदना योजना महाराष्ट्र अंतर्गत कुणाला मिळेल लाभ?
■ ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न प्रति वर्ष आठ लाख रुपयेपेक्षा कमी आहे तसेच किमान १८ वर्षे व कमाल ५५ वर्षे वय असलेल्या महिलांसाठी योजना असेल.
■ दुसरे अपत्य जुळे झाले आणि त्यात दोन्ही मुली असतील किंवा एक मुलगी एक मुलगा झाला तरी एकाच मुलीसाठी लाभ दिला जाईल.
प्रधानमंत्री मातृवंदना योजने अंतर्गत कोणत्या महिला ह्या लाभ घेऊ शकतात, काय आहेत अटी नियम :
- प्रधानमंत्री मातृवंदना योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक वेतन हे आठ लाखापेक्षा कमी असणे अत्यंत आवश्यक आहे, तसे नसल्यास त्या महिला ह्या योजनेचा अर्ज भरू शकणार नाही.
- अर्ज भरणाऱ्या महिलांकडे इ श्रम कार्ड किंवा ती महिला लाभार्थी शेतकरी असेल किंवा मनरेगा जॉब कार्ड त्या महिलेकडे असेल किंवा अंगणवाडी सेविका आशा वर्कर ज्या मदतनीस असतात आशा सर्वानाच या योजनेचा लाभ मिळणार आहे
- त्या लाभार्थी महिला अनुसूचित जातीच्या असल्या पाहिजे.
- त्या लाभार्थी महिलांकडे दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे.
प्रधानमंत्री मातृवंदना योजना या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
- आधार कार्ड / पॅन कार्ड
- जातीचा दाखला
- बँक पासबुक झेरॉक्स
- दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड
- चालू असलेला मोबाईल नंबर
- बाळाचे जन्म नोंदणी प्रमाणपत्राची प्रत
- गरोदरपणाची नोंदणी तारीख, प्रसुतीपूर्व तपासणीच्या नोंदी असाव्यात
- माता आणि बाल संरक्षण कार्डवर बाळाच्या लसीकरणाच्या नोंदी असलेल्या पानाची प्रत
- गरोदर पणाची नोंदणी केलेला RCH पोर्टलमधील लाभार्थी नोंदणी क्रमांक