नमस्कार मित्रांनो , आज आपण इंदिरा गांधी अपंग पेन्शन योजना ह्या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ह्याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत . मित्रांनो इंदिरा गांधी अपंग पेन्शन योजना indira Gandhi Apang Pension Yojana तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि तुम्हाला १५०० रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे चला तर मग मित्रांनो , काय आहे इंदिरा गांधी अपंग योज़ना , त्यासाठी लाभार्थी , पात्रता , आवश्यक लागणारे कागदपत्रे , इंदिरा गांधी योजनेचे लाभ कोणते ? इंदिरा गांधी अपंग योजना महाराष्ट्र 2024 साठी अर्ज कसा करायचा ? सर्व माहिती आपण या लेखात बघणार आहोत .
काय आहे इंदिरा गांधी अपंग पेन्शन योजना ?
आपलं महाराष्ट्र सरकार विविध प्रकारे विविध घटक साठी गरजू लोकांसाठी योजना आणत असतात आता त्यांनी राज्यातील दिव्यांगांसाठी त्यांना आर्थिक मदत होईल म्हणून इंदिरा गांधी अपंग पेन्शन योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत अपंग असलेल्या लोकांना आर्थिक मदत केली जाईल आपल्या भारत देशाची लोकसंख्या बघता मोठ्याप्रमाणावर दिव्यांगांची संख्या आहे आपल्या समाजातील एक महत्वपूर्ण घटक म्हणून आपण ह्यांच्या कडे बघतो दिव्यांग व्यक्तींना सुद्धा इतर लोकांप्रमाणेच हक्क , समानता इतर रोजगार देऊन त्यांच्या जीवनातील अंधकार दूर व्हावा ह्यासाठी अनेक दिव्यांग कायदे , योजना या देशात अस्तित्वात आहेत
इंदिरा गांधी अपंग पेन्शन योजनेचे उद्दिष्ट्ये काय ?
इंदिरा गांधी अपंग पेन्शन योजनेचे प्रमुख उद्दिष्ट्ये म्हणजे समाजातील दिव्यांग , अपंग व्यक्तींना आर्थिक मदत , आधार देणे हा आहे अपंगांना त्यांचे जीवनमान सुधारून , ते स्वावलंबी होतील. त्यांना त्यांचे गरजेच्या वेळी कोना इतरांवर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही. जेव्हा त्यांना वाटत कि आपण कोणावर तरी अवलंबुन आहोत तेव्हा त्यांना नवीन काम करण्यास , उत्साह वाटत नाही आत्मविश्वास कमी होतो . जेव्हा त्यांना त्यांची दैनंदिन कामे , वस्तू इत्यांदींसाठी पैश्याची अत्यंत गरज असते . ह्या इंदिरा गांधी अपंग पेन्शन योजनेमुळे अपंग व्यक्तींना कोणत्याही कामासाठी , पैश्यासाठी कोना इतरांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही हे मूळ उद्दिष्ट्य आहे ह्या योजनेचे .
इंदिरा गांधी अपंग पेन्शन योजनेसाठी पात्रता
- अर्जदार हा सरकारी कार्यलयात काम करणारा नसावा .
- लाभार्थी / अर्जदार ह्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे सरासरी रु ३५००० /- पेक्षा जास्त नसावे .
- या योजनेत केवळ ८० % अपंगत्व असलेली व्यक्तीच अर्ज करू शकते .
- अर्ज करणारी व्यक्ती हि महाराष्ट्र राज्यातील असावी , त्या अर्जदाराचे वात्सव्य कायमस्वरूपी महाराष्ट्र राज्यात असावे .
- अर्जदाराचे वय १८ ते ७९ वर्षांच्या दरम्यान असावे .
इंदिरा गांधी अपंग पेन्शन योजनेचे फायदे :
- स्वतःच्या दैनंदिन काम आणि गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना कोणावर अवलंबुन राहावे लागणार नाही .
- या योजने अंतर्गत दरमहा १५०० /- रुपये पेन्शन दिले जाईल .
- महाराष्ट्र राज्यातील फक्त अपंगांना इंदिरा गांधी अपंग पेन्शन योजना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे .
इंदिरा गांधी अपंग पेन्शन योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
- जन्म दाखला
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- चालू असलेला मोबाईल नंबर
- पत्त्याचा पुरावा
- बँक खाते पासबुक झेरॉक्स
- ८० % अपंगत्व प्रमाणपत्र
इंदिरा गांधी अपंग पेन्शन योजनेसाठी ऑफलाईन अर्ज भरायचा असेल तर काय करावं लागेल :
- इंदिरा गांधी अपंग पेन्शन योजना या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर , सर्वप्रथम अर्जदाराला जिल्हाधिकारी कार्यालय / तलाठी कार्यलयाला भेट द्यावी लागेल .
- तिथं जाऊन तुम्ही इंदिरा गांधी अपंग पेन्शन योजनेचा फॉर्म विचारून घेऊ शकता .
- अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती वाचून व्यवस्थित रित्या अर्ज भरा .
- अर्जासाठी गरज असलेल्या सगळे कागदपत्र सोबत ठेवा .
- जी कागदपत्रे अर्जासोबत जोडायची आहे त्याची प्रत / झेरॉक्स अर्जाला जोडून तो अर्ज तिथे भरून द्या .
- अर्जाची व्यवस्थित रित्या पडताळणी करून झाल्यानंतर तुमचे पेन्शन हे सुरु होईल .
इंदिरा गांधी अपंग पेन्शन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरायचा असेल तर काय करावं लागेल :
- या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून.
- https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/
- तुम्हाला एक पोर्टल दिसेल.
- त्या पोर्टलवर दिलेली सर्व माहिती वाचून व्यवस्थित भरा , आणि जे कागदपत्रे सांगितलेले आहेत त्याची कॉपी जोडून फॉर्म सबमिट करा.
- तुमच्या अर्जाची पूर्ण पडताळणी करण्यात येईल. पडताळणी झाल्यावर तुमची पेन्शन हि चालू होईल.
मित्रांनो या पोस्टमध्ये आम्ही इंदिरा गांधी अपंग पेन्शन योजने बद्दल माहिती दिली आहे जसे कि , काय आहे इंदिरा गांधी अपंग पेन्शन योजना , त्याचे फायदे , त्याचे उद्दिष्ट्ये , इंदिरा गांधी अपंग योजनेसाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन कसा अर्ज भरायचा , त्यासाठी कोणते कागदपत्रे लागणार आहेत इत्यादी
मला आशा हे कि , तुम्हाला हि पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत शेअर कराल
धन्यवाद