वाचनाने मुलांच्या प्रगतीला मिळते गति ! मुलांच्या जगात पुस्तकांचे महत्त्व !

By Shubham Pawar

Updated on:

लहान वयात मुलं ज्या गाेष्टी पाहतात, अनुभवतात, त्या गाेष्टींची सवय मुलांना लागते. अगदी लहान मुलांना म्हणजे सहा – सात महिन्यांच्या बाळाला सुद्धा पुस्तकातलं चित्रं दाखवून गाेष्टी सांगितली, तर त्यांना आवडतं. लहान वयात मुलांना पुस्तरकांचं महत्त्व (pustakache mahatva) कळलं, तर त्याचा फायदा त्यांना आयुष्यभरासाठी हाेताे. डिजीटल युगात काेणत्याही प्रकारची माहिती एका क्लिकवर सहज उपलब्ध हाेते. त्यामुळे पुस्तक वाचून काय मिळणार? असा प्रश्न पडताे. पुस्तकातून फक्त माहिती नाही, तर ज्ञान मिळतं. त्याचबराेबर वाचन करणारी व्यक्ती अनुभव समृद्ध असते. लहान वयापासून मुलांना वाचनाची सवय असल्यास त्यांची कल्पनाशक्ती वाढते, संवाद काैशल्य विकसीत हाेतं, विविध विषयांची माहिती मुलांना मिळते. मुलांसाेबत क्वाॅलिटी टाइम स्पेंड करण्यासाठी पुस्तक वाचन हा उत्तम पर्याय आहे. यामुळे अगदी बाळांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांच्या आयुष्यात  पुस्तकांचे महत्त्व (pustakache mahatva) आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लहान मुलं पुस्तकं फाडून टाकतात, अशी तक्रार अनेक पालक करतात. पण, लहान वयातच मुलांना पुस्तकांची ओळख करून दिल्यास, मुलं पुस्तकं फाडण्याचं प्रमाण नक्कीच कमी हाेतं. अनेक मुलांना संवाद साधणं शिकवावं लागतं. याला अनेक कारणं आहेत. विभक्त कुटुंब, एकच मुलं, माेबाईल किंवा गॅझेटचा अति वापर, शब्द माहित नसणे. पण, जी मुलं पुस्तकं वाचतात, हाताळतात, त्यांची भाषा विकसित हाेते. पुस्तक वाचन म्हणजे एक प्रकारे हा संवाद आहे. यामुळे मुलांमध्ये संवाद काैशल्य लहान वयापासून विकसित हाेते. आजच्या काळात संवाद साधता येणं हा एक प्रकारे तुमचा युएसपी आहे. पुस्तकातील वैविध्यपूर्ण शब्द, वाक्यरचना लहानपणीच मुलांच्या कानी पडल्याने, लहान वयापासून त्या शब्दांचा वापर ते सहजरित्या करतात. लहान मुलांसाठी मराठी मॅगझीन (Marathi Magazine), गाेष्टींची पुस्तकं, लहान कार्डबाेर्डची फक्त चित्रांची पुस्तकं असतात. या पुस्तकांच्या सहाय्याने मुलांना वाचनाची गाेडी लावता येऊ शकते.

मुलांना लहान वयातचं व्हिडीओ रूपात गाेष्टी दाखवल्या तर तेच चित्र त्यांच्या मेमरीमध्ये फीड हाेतं. त्यामुळे मुलं स्वतःहून विचार करत नाहीत. पण, गाेष्ट ऐकताना त्यांच्या कानावर शब्द पडतात आणि मुलांच्या विचारांना चालना मिळते. मुलं स्वतःच्या कल्पना विश्वात रमतात. यातूनच त्यांना नवीन कल्पना सुचतात. मुलं स्वतः खेळ तयार करून खेळतात. मुलं जेव्हा माेबाईल अथवा टीव्ही पाहतात. तेव्हा त्यांच्या डाेळ्यावर ताण येताे. ते एकाच जागी खिळून बसतात. याचे परिणाम मुलांच्या आराेग्यावर दिसून येतात. पुस्तक वाचन करताना मुलांचे मनाेरंजन हाेते. पुस्तक वाचनाची आवड असल्यास मुलांना बोअर झाल्यावर पुस्तक वाचन हा चांगला विरंगुळा असताे. पुस्तक वाचनामुळे बुद्धीला खाद्य मिळते. यामुळे मुलं वेगळ्या प्रकारे विचार करायला शिकतात. वाचनामुळे मुलांना रिलॅक्स वाटते. रात्री झाेपायच्या आधी वाचन केल्यास चांगली झाेप लागते.

मुलं ही बघून अनेक गाेष्टी शिकत असतात. पुस्तक वाचनातून मुलांना अनेक गाेष्टींची ओळख हाेते. यातूनच नवीन चांगली मूल्य मुलं सहजरित्या आत्मसात करू शकतात. गाेष्ट सांगताना, त्याचा बाेध न सांगता फक्त त्या गाेष्टीतल्या पात्रांच्या वर्तन, संवादातून हे संस्कार मुलांवर हाेतात. मुलं विचार करायला शिकतात, वाचन लवकर जमते, याचा फायदा मुलांना शैक्षणिक प्रगतीमध्ये हाेताे. कारण, मुलांकडे शब्दसंपदा चांगली असते. आकलन शक्ती चांगली असते. त्याचबराेबर पुस्तक वाचनामुळे लक्ष केंद्रित करू शकतात. या सर्व गाेष्टींचा एकत्रित फायदा मुलांना अभ्यास करताना हाेताे. आधीपासून वाचन करत असल्यामुळे अभ्यासाची पुस्तकही आवडीने वाचली जातात.

पुस्तक वाचनाच्या सवयीमुळे मुलांमध्ये एक वेगळा दृष्टिकाेन तयार हाेताे. यामुळे संकटांचा सामना कसा करावा, संयमाने कसे वागावे, कठीण परिस्थितीत मार्ग कसा काढावा असे वेगळे विचार मुलं लहान वयापासून करायला शिकतात. यामुळे निगेटिव्ह विचार, डिप्रेशन अशा गाेष्टींपासून मुलं लांब राहू शकतात. पुस्तक हा आपला मित्र आहे. यामुळे मुलं कधीच एकटी पडतं नाहीत. त्यांना नेहमी पुस्तकांची साथ असते.

मुलांच्या वयानुसार पुस्तकांची निवड केली पाहिजे. सहा महिने ते तीन वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी माेठी रंगीत चित्रांची पुस्तके या मुलांना आवडतात. पुस्तकांचा आकार छाेटा असल्यास त्यांच्या हातात मावतात. लहान मुलांना संख्या, अक्षरे, आकार, रंग, प्राणी, पक्षी, प्राणी अशा अनेक गाेष्टींचा परिचय मनाेरंजकरित्या करून देता येताे. गाेष्टीच्या पुस्तकांमध्ये टेक्स कमी आणि जास्त चित्र असणारी पुस्तक निवडल्यास मुलांना ती पुस्तक आवडतात. लहान मुलांना पाैराणिक कथादेखील आवडतात. माेठ्या मुलांसाठी फिक्शन, चरित्र, प्रवास वर्णन, वैज्ञानिक, ऐतिहासिक अशा विविध पुस्तकांचा परिचय करून देऊ शकताे. यातून मुलांच्या आवडीप्रमाणे मुलं पुढे जाऊन पुस्तकांची निवड करू शकतात. मुलांच्या वाढीत पुस्तकांचे महत्त्व (pustakache mahatva)आहे.

पालक मुलांना प्रत्यक्ष प्रत्येक गाेष्टीचा अनुभव देऊ शकत नाहीत. अशावेळी पुस्तक रूपाने मुलांना हे अनुभव देता येतात. मुलांचे ज्ञानही यामुळे वाढते. अनेकदा मुलांना वेगळ्या संस्कृतींचा परिचय या पुस्तकातून हाेताे. यामुळे मुलांचे व्यक्तिमत्व घडत असताना याचा नक्कीच फायदा मुलांना हाेताे. एखादी चांगली सवय अचानक लागत नाही. त्यासाठी मेहनत ही घ्यावीच लागते. मुलांना वाचनाची चांगली सवय लागण्यासाठी पालकांनी मेहनत घेणे आवश्यक आहे. लहान वयापासून मुलांना झाेपण्याआधी पुस्तकं वाचून दाखवू शकताे. त्याबराेबरीने अॅक्टिव्हीटी बुक असतात. बाहेर जाताना अशी पुस्तकं बराेबर नेऊ शकताे. लहान पुस्तक मुलांना वाचण्यासाठी प्राेत्साहन देऊ शकताे. लहान मुलांना एखादी गाेष्ट खूप आवडते. त्यामुळे रात्रंंदिवस त्यांना तिच गाेष्ट ऐकायची असते.

सतत तिचं गाेष्ट वाचून दाखवणे, पालकांसाठी कंटाळवाणे असू शकते. पण, यावेळी पालकांनी थाेडा संयम ठेवून त्यांना गाेष्ट वाचून दाखवावी. मुलांच्या आवडीचा किंवा भावनांचा जवळचा संबंध असताे. यावेळी मुलांना अन्य गाेष्टींची देखील ओळख करून देत रहावी. मुलांना घडवण्यासाठी पालक अनेक पद्धतींचा अवलंब करत असतात. यामध्ये पुस्तक वाचन हा एक चांगला मार्ग आहे. मुलांच्या बाैद्धिक, सामाजिक, भावनिक, शैक्षणिक विकासामध्ये पुस्तकांंचा सिंहाचा वाटा असताे.

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.