Students will get free books, homework will be stopped – दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वह्या. आता गृहपाठ होणार बंद : शालेय शिक्षणमंत्री केसरकर.
Students will get free books, homework will be stopped?
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सरकारने पावले उचलली असून, राज्यातील इयत्ता 1 ली ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना पुस्तकाचा समावेश असलेल्या मोफत वह्या दिल्या जाणार आहेत. या एका वहीतच पाठ्यक्रम असेल.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सरकार उपाययोजना करणार असल्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार सरकारने पावले उचलली असल्याची माहिती केसरकर यांनी दै. \’पुढारी\’ला दिली.
विद्यार्थ्यांना मोफत वह्या मिळणार
सध्या विद्यार्थ्यांना एकाचवेळी वेगवेगळ्या विषयांची पुस्तके आणि तितक्याच प्रमाणात वह्यांचे ओझे पाठीवर वागवावे लागते. या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावरही भार पडत असल्यामुळे आता सरकारने वेगवेगळ्या विषयांच्या स्वतंत्र पुस्तकांऐवजी आता वह्यांमध्येच पुस्तके देण्याचा विचार केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत येताना केवळ एक वही आणावी लागणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.
मुलांचे बालपण जपण्यासाठी शिक्षणतज्ज्ञांचा सल्ला घेणार आहोत. शाळांच्या वेळा या मुलांच्या झोपेशी सुसंगत असल्या पाहिजेत. मुलांच्या शाळेच्या वेळा सुसंगत ठेवून अभिनय, हस्तकला चित्रकला तसेच मैदानी खेळांमध्ये कौशल्य दाखवावे, यासाठी मुलांचा गृहपाठ कमी करण्याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेतला जात असल्याचेही केसरकर म्हणाले.