{ फॉर्म } ड्रोनसाठी 10 लाखांपर्यंत अनुदान अर्ज सुरू | Krushi Drone Subsidy Maharashtra

By Shubham Pawar

Published on:

Drone Subsidy Maharashtra:- एफपीओ साठी साडेसात लाखांपर्यंत अनुदान केंद्र शासनाने कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातून कृषी पदवीधारकांना ड्रोनयुक्त अवजारे सेवा सुविधा केंद्र सुरू करण्यासाठी पाच लाखांपर्यंत अनुदान देण्यास मान्यता दिली आहे. शेतकरी उत्पादक संस्थांना (एफपीओ) ड्रोनसाठी साडेसात लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे.

राज्यातील शेतकरी पीक संरक्षणासाठी सध्या कीडनाशकांच्या फवारणी करण्यासाठी पाठीवरचे पंप, एसटीपी पंप, ट्रॅक्टरचलित पंप तसेच अतिउच्च क्षमतेचे विदेशी (इलेक्ट्रोस्टॅटिक ब्लोअर) पंप वापरतात.मात्र सध्याच्या तंत्रज्ञानाला काही मर्यादा आहेत. फवारणीसाठी मजुरांचा वापर करताना विषबाधेचे प्रकारही होतात.

त्यामुळे ड्रोनद्वारे कीडनाशकांच्या फवारणीचा पर्याय काही पिकांसाठी उपयुक्त ठरू शकतो, अशी शिफारस केंद्राकडे काही संशोधन संस्थांमधून गेली होती. ड्रोनद्वारे यापूर्वी देशाच्या विविध भागांत खासगी व सरकारी संशोधन संस्थांमार्फत गेल्या तीन वर्षांपासून चाचण्या सुरू होत्या.

Drone Subsidy Maharashtra

या चाचण्यांचे निष्कर्ष पाहून ड्रोनसाठी थेट अनुदान देण्याचा केंद्राने निर्णय घेतला व त्यासाठी कृषी यांत्रिकीकरण अभियानातील निधी वापरास मान्यता देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार व कृषी पदवीधरांनाही ड्रोनच्या माध्यमातून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा होत असलेला प्रयत्न हे या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य ठरणार आहे.

त्यामुळे कृषी पदवीधारकांना पाच लाखांपर्यंत, तर केवळ  दहावी उत्तीर्ण व रिमोट तंत्राचे प्रशिक्षण असलेल्या ग्रामीण भागातील कोणत्याही युवकाला आता चार लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे.

अनुदानाचा लाभ घेण्यासाठी ३१ मार्चपर्यंत अर्ज करावे लागणार आहेत. कृषी आयुक्तालयातील निविष्ठा व गुणनियंत्रण विभागातील अवजारे विभागाचे उपसंचालक विष्णू साळवे किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे देखील संपर्क साधता येईल, अशी माहिती आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली. असे असेल ड्रोन अनुदान वाटपाचे धोरण

Krushi Drone Subsidy | ड्रोन अनुदान योजना

•ड्रोन फवारणीची प्रात्यक्षिके कोण घेऊ शकते? : कृषी यंत्रे व अवजारे तपासणी संस्था, भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या संस्था, कृषी विज्ञान केंद्रे, शेतकरी उत्पादन संस्था व कृषी विद्यापीठे

•विद्यापीठे व सरकारी संस्थांना किती अनुदान मिळेल? :  ड्रोन खरेदीच्या १०० टक्के म्हणजे १० लाखांपर्यंत. शेतकरी उत्पादन संस्थांना किती अनुदान मिळेल? : ड्रोन खरेदीच्या ७५ टक्के म्हणजे ७.५० लाखांपर्यंत.

• संस्थांनी ड्रोन भाड्याने घेतल्यास कितीअर्थसाह्य मिळेल? :  प्रतिहेक्टरी ६ हजार रुपयांपर्यंत.

• संस्थांनी ड्रोन प्रात्यक्षिके राबविल्यास किती अर्थसाह्य मिळेल? : प्रतिहेक्टरी ३ हजार रुपयांपर्यंत. ‘Drone Subsidy Maharashtra’

• अवजारे सेवा सुविधा केंद्रांना ड्रोन खरेदीसाठी किती अनुदान मिळेल? : ड्रोन किमतीच्या ४० टक्के म्हणजे ४ लाखांपर्यंत.

• कृषी पदवीधारकाने अवजारे सेवा केंद्र सुरू केल्यास किती अनुदान मिळेल? : ड्रोन किमतीच्या ५० टक्के म्हणजे ५ लाखांपर्यंत.

• ग्रामीण नव उद्योजकाला किती अनुदान मिळेल? : चार लाखांपर्यंत. मात्र तो दहावी उत्तीर्ण, तसेच मान्यताप्राप्त रिमोट ट्रेनिंग संस्थेकडून (दूरस्थ प्रशिक्षण संस्था) प्रशिक्षित असावा.

Drone Subsidy Documents

  1. आधार कार्ड/फोटो असलेल्या ओळखपत्राची स्वयंसाक्षांकित प्रत.
  2. खरेदी करावयाच्या ड्रोन चे अधिकृत विक्रेत्याचे दरपत्रक/कोटेशन.
  3. बँक पासबुकाच्या पहिल्या पृष्ठाची छायांकित प्रत / रद्द केलेला धनादेश.
  4. संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र.
  5. संस्थेशी संबंधीत व्यक्तीच्या बॅन्क खात्यात अनुदान जमा करण्यास संस्थेने प्राधीकृत केले असल्यास प्राधीकृत केल्याचे पत्र.
  6. अधिकृत रिमोट पायलट ट्रेनिंग संस्थेकडील प्रशिक्षण घेतलेल्या रिमोट पायलट परवाना धारक चालकाचे नाव व तपशील (कागदपत्रे जोडण्यात यावी )

 

🛑ड्रोन अनुदान योजना फॉर्म PDF मध्ये – येथे पहा

🛑 सूचना – येथे पहा

This article has been written by Shubham Pawar from Pune Maharashtra. Shubham Pawar is a famous Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Developer and Owner/founder of Marathi Corner. 5 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment