7/12 वरील लँड रजिस्ट्रेशन आयडी म्हणजे काय? | What is land Registration id in Maharashtra

Land Registration id : नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहित असेलच की पीएम किसान सन्मान निधी योजनेची नोंदणी सुरू आहे. नोंदणी करण्यासाठी तुम्हाला जमीन नोंदणी क्रमांक म्हणजेच ‘land Registration id’ लागतो.

लँड रजिस्ट्रेशन आयडी म्हणजे काय?

जश्याप्रकारे प्रत्येक व्यक्तीला एक ओळख म्हणून आधार क्रमांक देण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे आता महसूल विभागामार्फत शेतकऱ्यांच्या प्रत्येक जमिनीला एक विशिष्ट क्रमांक दिला जाणार असून त्या क्रमांकाला ULPIN क्रमांक या नावाने ओळखल जाणार आहे.

लँड रजिस्ट्रेशन आयडी हा एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असून तो वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीला नियुक्त केला जातो. महाराष्ट्रमध्ये याच नंबरला ULPIN नंबरसुद्धा म्हटले जाते. म्हणजेच त्याचा फुल फॉर्म आहे Unique Land Parcel Identification Number असा आहे.

हा नंबर तुम्हाला महाराष्ट्राच्या प्रत्येक सातबारा उतारावरती भेटून जाईल. सातबाऱ्यामध्ये विशिष्ट जमिनीशी संबंधित भूवैज्ञानिक माहिती देण्यात येते, जसे की मातीचा प्रकार आणि भूखंडाचा आकार. यात पिके, सिंचन आणि इतर कृषी तपशीलांशी संबंधित माहिती देखील समाविष्ट आहे.

तुमचे आधार कार्ड बंद होऊ शकते, लगेच अपडेट करून घ्या फक्त २५ रू. मध्ये | Aadhar Card New Update Notice

Land Registration id कसा शोधावा?

आता मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल, की नेमका हा लँड रजिस्ट्रेशन आयडी कसा शोधावा किंवा कोणत्या ठिकाणी असतो ? तर, हा नंबर शोधण्यासाठी तुम्ही आपल्या महाराष्ट्र राज्याच्या सातबाराच्या वेबसाईटवरती जाऊन अगोदर तुम्हाला सातबारा काढावा लागेल आणि त्यावरती तुम्हाला हा नंबर भेटणार आहे.

तुमच्यासाठी हे आणखी सोपे करण्यासाठी, मी तुम्हाला महाराष्ट्रातील 7/12 वर Land Registration id सातबाऱ्यावर कसा शोधावा याठिकाणी त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो.

  • सर्वप्रथम भुलेख महाभूमीच्या ऑनलाइन पोर्टलवर जा – https://bhulekh.mahabhumi.gov.in/
  • दिलेल्या सहा विभागांमधून तुमचा विभाग निवडा: पुणे, कोकण, अमरावती, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर
  • 7/12 निवडा जर तुम्ही 7/12 निवडले असेल तर आवश्यक असलेल्या जमिनीच्या नोंदीसाठी जिल्हा, गाव आणि तालुका निवडा.
  • त्यानंतर एकतर नाव, रेकॉर्डमधील नाव, सर्व्हे नंबर इ., आडनाव आणि पूर्ण नाव किंवा वर्णमालानुसार सर्वेक्षण क्रमांक/गट क्रमांक टाकावा.
  • खाली तुमचा मोबाईल नंबर भरा ”7/12 पहा शोधा” वर क्लिक करा आवश्यक तपशीलांसह ७/१२ स्क्रीनवर दिसेल.

तर अशाप्रकारे मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने आपण आपल्या मोबाईलवर महाभुमिअभिलेखच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन सातबारा डाऊनलोड केल्यानंतर आपल्या सातबाऱ्यावरील विशिष्ट असा क्रमांक म्हणजेच ULPIN क्रमांक सहजरीत्या मिळवू शकतो.

भविष्यकाळामध्ये सातबारा संदर्भातील विविध कामे जशाप्रकारे सातबारा डाऊनलोड करणे नकाशा प्रॉपर्टी कार्ड व इतर शेतजमिनी संदर्भातील संपूर्ण कामे या विशिष्ट क्रमांकावर तीच अवलंबून असणार आहेत. म्हणजेच शेतकऱ्यांना संपूर्ण माहिती लक्षात न ठेवता फक्त त्यांच्या शेतजमिनीचा लँड रजिस्ट्रेशन नंबर लक्षात ठेवून जमिनीशी संबंधित संपूर्ण कागदपत्रे चुटकीसरशी मिनिटांमध्ये डाउनलोड करता येणार आहेत.

लँड रजिस्ट्रेशन आयडी म्हणजे काय?

महसूल विभागामार्फत शेतकऱ्यांच्या प्रत्येक जमिनीला एक विशिष्ट क्रमांक दिला जाणार असून त्या क्रमांकाला ULPIN क्रमांक या नावाने ओळखल जाणार आहे.

Land Registration id कसा शोधावा?

महाराष्ट्र राज्याच्या सातबाराच्या वेबसाईटवरती जाऊन अगोदर तुम्हाला सातबारा काढावा लागेल आणि त्यावरती तुम्हाला हा नंबर भेटणार आहे.

Leave a Comment

close button