आता रेशन कार्ड काढा ऑनलाईन, नवीन सेवा सुरू, लगेच करा अर्ज | Online Ration Card Maharashtra 2024

By Shubham Pawar

Published on:

नमस्कार मित्रांनो, यापुढे जर कोणाला रेशन कार्ड काढायचे असेल किंवा त्यामध्ये काही दुरुस्ती करायचे असेल तर त्यांना ई  रेशन कार्ड दिले जाणार आहे. Online Ration Card Maharashtra अर्थ असा की यापुढे केशरी व पिवळ्या रंगातील असणारे पारंपारिक रेशन कार्ड हळूहळू बंद होत जातील. या नवीन सुविधेवर कार्यप्रणाली सुरू झाली असून लवकरच वितरणही सुरू होणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शासनाच्या विविध योजनांच्या लाभ घेण्यासाठी तसेच आधार कार्ड, मतदान कार्ड यासारखे महत्त्वाचे असणारे दस्तऐवज म्हणजे रेशन कार्ड. रहिवासी पुरावा म्हणून देखील रेशन कार्डचा उपयोग होतो. स्वस्त धान्य दुकानांमध्ये पारंपारिक पिवळे केशरी पुस्तक स्वरुपातील रेशन कार्ड वापरले जाते.

Online Ration Card Maharashtra घरबसल्या मिळणाऱ्या सुविधा

महाराष्ट्र राज्य शासनाने नवीन प्रणाली आणण्याचे ठरवले आहे या अंतर्गत खालील गोष्टी अगदी घरबसल्या करता येणार आहेत.

  • नवीन रेशन कार्ड साठी अर्ज करणे
  • नावामध्ये चूक असल्यास दुरुस्ती करणे
  • पत्ता बदलणे
  • नवीन नाव समाविष्ट करणे किंवा वगळणे

या सर्व सुविधांसाठी नवीन प्रबळ अशी संगणक यंत्रणा उभे करण्यात आली आहे. इ रेशन कार्ड वितरित करण्यासाठी आदेश राज्य शासनाने फेब्रुवारी 2023 मध्ये दिले होते. त्याच अंतर्गत ही नवीन प्रणाली तयार करण्यात आली आहे.

Online Ration card चे स्वरूप

आता पारंपरिक वापरत असलेल्या रेशन कार्ड वर सर्व माहिती आपल्याला पाहायला मिळते. अगदी त्याच पद्धतीने ऑनलाईन रेशन कार्ड वर सुद्धा सर्व माहिती दिलेली असेल. सोबतच विशेष म्हणजे यावर क्यू आर कोड देखील असेल. या क्यू आर कोड चा वापर ज्या ठिकाणी रेशन कार्ड वापरायचे आहे त्या ठिकाणी होईल. अशा संलग्न असलेल्या कार्यालयांमध्ये हा क्यू आर कोड स्कॅन करता येईल. Online Ration Card Maharashtra

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Online Ration card चे फायदे

डीजी लॉकर  या शासनमान्य ॲप मध्ये हे ऑनलाईन रेशन कार्ड दिसेल. 

ऑनलाइन असल्यामुळे पीडीएफ किंवा फोटो या स्वरूपामध्ये मेल, मोबाईल फोन वर  उपलब्ध होईल. 

कोणत्याही वेळी ई सेवा केंद्राला भेट देऊन कार्ड डाऊनलोड करून त्याचे प्रिंट काढता येईल

पारंपारिक रेशन कार्ड धान्य दुकानात घेऊन जाण्याची काही गरज नाही कारण तेथील कामकाज ई पॉस मशीन चालत असते.

Online Ration Card अर्ज कसा करायचे?

22 मे 2024 च्या शासन निर्णयानुसार राज्यातील नागरिकांना क्यू आर कोड असलेले इ रेशन कार्ड डाउनलोड करता येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची गरज असते अर्ज करावा लागणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा वेबसाईटवर RCMS (Online Ration Card Maharashtra) या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे.

नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज करण्याची ऑनलाईन Process-

  1. 1लिंक http://rems.mahafood.gov.in
  2. sign in बटण वर क्लिक करा
  3. public login हा पर्याय निवडा
  4. New User Sign Up Here या पर्यायावर क्लिक करा
  5. नवीन शिधापत्रिका साठी | Want to apply for New Ration Card\” यावर क्लिक करा.
  6. Screen वर दिसणारी सर्व माहिती आधार कार्ड नुसार भरून आपले वयक्तिक user id व पासवर्ड तयार करा.
  7. Register User वर क्लिक करून आपले user id व पासवर्ड किंवा आधार नंबर टाकून लॉगिन करा.
  8. लॉगिन झाल्यावर Apply For New Ration card\’ यावर क्लिक करून सर्व माहिती भरा. या टॅब वरून क्लिक करून माहिती भरा.
  9. Submit For Payment या पर्यायावर क्लिक करून शासन fee भरा. यांच्याकडून Verify झाल्यावर आपल्या लॉगिन ला शिधापत्रिका डाउनलोड साठी उपलब्ध होईल.
  10. जिल्हा, तालुका व गाव निवडा
  11. Add Member वर क्लिक करून प्रथम कुटुंब प्रमुखाची संपूर्ण माहिती भरा. माहिती आधार कार्ड नुसार भरावी.
  12. शिधापत्रिकेतील अजून मेंबर ऍड करायचे असल्यास परत Add Member पुढील टॅब मध्ये बॉक्स समोर माहिती विचारली आहे त्याप्रमाणे माहिती
  13. संपूर्ण फॉर्म भरल्यावर Submit करा.

NPH 50 रू

APL White 100 रू

15- ऑनलाइन फी जमा केल्यानंतर शिधापत्रिका वेरीफाय करण्यासाठी तहसिल कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांच्या कडे जाईल.

Conclusion

वर्षानुवर्ष पारंपरिक स्वरूपात चालत आलेले रेशन कार्ड हळूहळू आता ऑनलाइन स्वरूपात क्यू आर कोड असलेले रेशन कार्ड स्वस्त धान्य दुकाने, कार्यालय व इतर ठिकाणी पाहायला मिळतील. ऑनलाईन असल्यामुळे कोणत्याही ठिकाणी ते सहज उपलब्ध करून देता येईल. म्हणजेच नागरिकांचा वेळ वाचेल तसेच हळू चालणाऱ्या पद्धती वेग धरतील. घरबसल्या नवीन अर्ज करण्यापासून  दुरुस्ती करण्यापर्यंत सर्व कामे करता येते येतील. मी आशा करतो की रेशन कार्ड बद्दल नवीन येणारी या प्रणालीची माहिती तुम्हाला आवडली असेल. आपल्या सर्व मित्र परिवारापर्यंत ही माहिती पोहोचवा. धन्यवाद !

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

1 thought on “आता रेशन कार्ड काढा ऑनलाईन, नवीन सेवा सुरू, लगेच करा अर्ज | Online Ration Card Maharashtra 2024”

Leave a comment