पुढच्या वर्षी अभ्यासक्रम प्रवेश बारावी CET च्या मार्क्स वर | Next year course admission 12th, on CET marks

By Shubham Pawar

Published on:

Next year course admission 12th, on CET marks – प्रत्येकी 50 टक्के गुणांचा विचार होणार पुढील शैक्षणिक वर्षापासून (2023- 24) राज्यातील पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश देताना बारावी आणि सीईटीच्या प्रत्येकी 50 टक्के गुणांचा विचार करण्यात येणार आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.

Next year course admission 12th, on CET marks

सीईटींची संख्या कमी करून, प्रवेश प्रक्रिया 1 जुलैपासून सुरू करण्याचे नियोजन करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. याचा अर्थ पुढील वर्षापासून सीईटीचे महत्त्व संपणार आहे.

सामंत म्हणाले की, सीईटी सेलकडून राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी सीईटी परीक्षा घेण्यात येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे संपूर्ण लक्ष हे सीईटींवर केंद्रित झाले असून, बारावीच्या वर्गामध्ये विद्यार्थीच बसत नसल्याचे चित्र आहे.

पुढच्या वर्षी अभ्यासक्रम प्रवेश बारावी, CET च्या मार्क्स वर

या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीत व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी बारावी आणि सीईटीच्या गुणांना प्रत्येकी 50 टक्के महत्त्व देण्याचा निर्णय घेण्यात आला.

साधारणतः, 2012 मध्ये अशी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. जेईई मेन्सची परीक्षा दोन टप्प्यांत होते. त्याच धर्तीवर विद्यार्थ्यांना दोन संधी मिळाव्या म्हणून पुन्हा एक सीईटी घेतली जाईल. यंदाच्या सीईटी ऑगस्टमध्ये होत असल्या, तरी त्यांचा निकाल परीक्षेपासून दहा दिवसांत जाहीर करण्यात येईल.

This article has been written by Shubham Pawar from Pune Maharashtra. Shubham Pawar is a famous Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Developer and Owner/founder of Marathi Corner. 5 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment