(Sinchan Vihir Yojana Form) सिंचन विहीर योजना 2024 – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन सुविधेसाठी वैयक्तीक सिंचन विहिरींची कामे घेण्यास दिनांक 4 मार्च 2022 च्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे.
प्रत्येक जिल्हयाची भौगोलिक स्थिती भिन्न असल्यामुळे स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन विहिरींचे तांत्रिक व आर्थिक माप दंड निश्चित करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे.
राज्यात विहिरीच्या कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु, स्थानिक पातळीवर यासंदर्भात काही अडचणी असल्यामुळे त्यावर स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे.
Sinchan Vihir Anudan Yojana 2024
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन सुविधेसाठी वैयक्तिक सिंचन विहिरींना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत सुधारित सूचना.
०४ मार्च, 2022 शासन निर्णय:- दि.१७ डिसेंबर, २०१२ मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन सुविधेसाठी वैयक्तिक सिंचन विहिरींसंदर्भात सुधारित सूचना निर्गमित करण्यात आल्या.
त्याअनुषंगाने विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्याचा अधिकार सहकार्यक्रम अधिकारी तथा गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांना देण्यात आला.
तद्नंतर संदर्भाधीन शासन पत्र दि.२८ नोव्हेंबर, २०१७ अन्वये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन विहिरीना
प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांचे ऐवजी
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना प्रदान करण्यात आले. सदर अधिकार पुन्हा गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे.
शासन निर्णय2024: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार सह कार्यक्रम अधिकारी तथा गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांना देण्यात येत आहेत.
नवीन सिंचन विहीर योजना 2024 लाभ धारकाची पात्रता
अ) लाभ धारकाकडे किमान ०.६० हेक्टर क्षेत्र सलग असावे. \’Sinchan Vihir Anudan Yojana\’
ब) प्रस्तावित विहीर पुर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहीरीपासुन ५०० फुटापेक्षा जास्त अंतरावर असावी
क) प्रस्तावित विहीरीपासून ५ पोलच्या आंत विद्युत पुरवठा उपलब्ध असावा.
ख) लाभधारकाच्या ७/१२ वर विहीरीची नोंद असू नये.
छ) लाभधारकाकडे तलाठी यांच्या स्वाक्षरीचा एकूण क्षेत्राचा दाखला असावा. सिंचन विहीर योजना
ज) एकापेक्षा अधिक लाभधारक संयुक्त विहीर घेऊ शकतील मात्र त्यांचे एकूण जमीनीचे क्षेत्र ०.६० हेक्टर पेक्षा जास्त व सलग असावे.
ण) ज्या लाभार्थ्यांना विहीरीचा लाभ देण्यात येणार आहे तो जॉब कॉर्डधारक असला पाहिजे. तसेच त्याने मजूर म्हणून काम करुन मजुरी घेणे आवश्यक आहे.
ज) भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र वरिष्ठ, भू-वैज्ञानिक सर्वेक्षण यंत्रणा
यांचेकडून घ्यावे.
सिंचन विहीर अनुदान योजना प्रवर्ग
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमाच्या परिशिष्ट -१ कलम १ (४) मधील तरतुदीनुसार खालील प्रवर्गासाठी सिंचन सुविधा म्हणून विहिरीची कामे अनुज्ञेय आहेत.
अ) अनुसूचित जाती \”Sinchan Vihir Anudan Yojana\”
ब) अनुसूचित जमाती
क) दारिद्रय रेषेखालील लाभार्थी
ड) भूसुधार योजनेचे लाभार्थी
इ) इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी
फ) कृषि कर्जमाफी योजना २००८ नुसार अल्प भूधारक व सिमांत शेतकरी
ग) अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वन निवासी (वन अधिकार मान्यता) अधिनियम २००६ नुसार पात्र व्यक्ती
सिंचन सूविधा म्हणून विहिरींना मंजूर करण्याबाबतच्या अटी
अ. केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या दिनांक २४ ऑगस्ट २०१२ च्या कार्यसंदर्भातील सूधारित मार्गदर्शक तत्वानुसार बोरवेल, टयूबवेल अनुज्ञेय नाही.
ब. भूजल सर्वेक्षण यंत्रणा GSDA च्या व्याख्येप्रमाणे सेमीक्रिटिल, क्रिटिकल, ओव्हर एक्स्प्लाायटेड क्षेत्रामध्ये वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरी घेवू नयेत.
मात्र या भागात समूह विहिरी हाती घेता येवू शकतात. असा समूह तयार करतांना किमान ३ शेतक-यांचा समूह असावा.
समूहातील शेतक-यांनी करारनामा करुन उपलब्ध होणारे पाणी प्रमाणात वापरतील असे प्रमाणित करावे. असे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर प्रामपंचायतीमार्फत अशी कामे हाती घेण्यात यावीत.
क. समूह विहिरींची नोंद महसूली अभिलेख्यात घेण्यात यावी.
ङ सुरक्षित क्षेत्रात (Safe Zone) वैयक्तिक लाभाची सिंचन विहिरिंची कामे हाती घेता येवू शकतात तथापी त्यासाठी संबंधित भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने विहिरीची मापे निश्चित करावीत.
असे करतांना कठीण खडकातील भागासाठी विहिरींचा व्यास ८ मिटर पेक्षा तसेच मउ खडक आणि मातीच्या भागासाठी ६ मिटर पेक्षा जास्त असू नये.
नवीन विहीरीसाठी अर्ज व त्यावरील कार्यपध्दती
अ) पुढील आर्थिक वर्षात वैयक्तिक सिंचन विहीर मंजुरीसाठी अर्जदाराने १५ ऑगस्टपूर्वी विहीरी करीता विहीत नमून्यात ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा. (सोबत नमूना अर्जाची प्रत)
ब) ग्रामपंचायतीने अशा अर्जाची तात्काळ पोच द्यावी. कोउपरोक्त प्रमाणे विहीरीच्या मागणीसाठी प्राप्त झालेले अर्ज दिनांक १५ ऑगस्ट च्या ग्रामसभेसमोर माहितीसाठी सादर करण्यात यावे.
ड) प्राप्त अर्जातून पुढील वर्षाच्या नियोजनामध्ये समाविष्ट करावयाची लाभधारकाची यादी ग्रामसभेने प्राधान्यक्रमानुसार मंजुर करावी.
लाभधारकाची निवड करतांना केंद्र शासनाने विहीत केल्या प्रमाणे लाभार्थी संवर्ग निहाय मंजुरी प्राधान्याने करावी व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती पैकी दारीद्रयरेषेखालील अर्जदारांना प्राधान्य द्यावे.
मात्र प्राधान्य क्रमांकातील संवर्गातील लाभधारक शिल्लक नसल्यास पुढील प्राधान्य संवर्गातील लाभधारकाची निवड करावी.
- कार्यान्वयीन यंत्रणा सिंचन विहीर योजना\’
विहीरीच्या कामांना पंचायत समिती स्तरावरील तांत्रिक अधिका-यांनी तांत्रिक मान्यता द्यावी व सह कार्यक्रम अधिकारी तथा गटविकास अधिकारी यांनी प्रशासकिय मान्यता द्यावी.
विहीरीची कामे ग्रामपंचायत मार्फतच करण्यात यावी. या कामांमध्ये कुशल भाग ग्रामपंचायती मार्फत पूर्ण करण्यात यावा.
- विहीर कामाच्या पूर्णत्वाचा कालावधी
विहीरीच्या कामांना प्रशासकिय मान्यता दिल्यानंतर सलग दोन वर्षात विहीरींची कामे पूर्ण होणे अनिवार्य राहील.
- कामांची गुणवत्ता व सुरक्षितता
मजूरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना हेल्मेट देण्यात यावीत. याबाबतचा खर्च ६% प्रशासकिय खर्च
निधीतून भागवावा.
कामाचे पूर्णत्वाचे दाखले निर्गमितकरणे
अ. ज्या तांत्रिक अधिका-याने कामाच्या अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता प्रदान केली आहे त्याच पदाच्या तांत्रिक अधिका-याने पूर्णत्वाचे दाखले निर्गमित करावे. जर त्यानी असे करण्यास नकार दिला तर त्यांचे विरुध्द शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी.
ब. अंदाजपत्रकाप्रमाणे काम भौतिकदृष्टया व्यास व खोली मध्ये पूर्ण झाल्यास पूर्णत्वाचा दाखला निर्गमित करावा.
क. विहित केलेल्या खोली पेक्षा आधिच ०.६० हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्यास व विहिर सुरक्षित स्थितीत आहे.
याची खात्री पटल्यास संबंधित लाभधारक यांची संमती आणि क्षेत्रिय तांत्रिक अधिकारी यांच्या जबाबदारीवर विहिर कामाचे पूर्णत्वाचे दाखले निर्गमित करता येवू शकेल.
ङ. अंदाजपत्रकाप्रमाणे मंजूर रक्कम खर्च झाली आहे मात्र बांधकाम प्रलंबित आहे अशा स्थितीत पूर्णत्वाचा दाखला निर्गमित करुनये अशा प्रकरणात बाबनिहाय कामाचे वस्तुनिष्ठ अंदाजपत्रक का तयार केले नाही अथवा कामाचे कार्यान्वयन करतांना काम अंदाजपत्र का प्रमाणे का केले नाही याचा खुलासा घेवून उचित कार्यवाही करण्यात यावी.
इ. पूर्णत्व दाखला निर्गमित करण्यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्यास पर्यवेक्षकिय अधिकारी यांनी तांत्रिक अधिका-यांचे मार्गदर्शन करावे.
सिंचन विहीर अनुदान योजना महाराष्ट्र काय आहे? | MGNREGA अंतर्गत Vihir Yojana Application Form कसा असेल हे पाहुयात.
🔴 सिंचन विहीर अनुदान योजना शासन निर्णय – Download
🔴 सिंचन विहीर अनुदान योजना अर्ज Form – Download
🔴 सिंचन विहीर अनुदान योजना प्रस्ताव – Download
Very good information for me .thank yo very much
mala ya yojanacha labh dhya sir
Data ajun suru nahi…suru zhalyvr video yeyil
MLA ya yojnecha Labh pahije. Dist.sangli tal. Atpadi. Village.Malewadi
Sir maz shet made vir nahi mala vir ghenay sathi ky karva
Ho
Ho
Ho
Ho
Ho