श्रावण बाळ सेवानिवृत्त्ती योजना लगेच करा अर्ज, महिना १५०० रु। Shravan Bal Yojana Maharashtra

By Shubham Pawar

Published on:

नमस्कार मित्रांनो , आज आपण श्रावण बाळ सेवा निवृत्तीवेतन योजना 2023 या योजना अर्ज विषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत, मित्रांनो Shravan Bal Yojana Maharashtra या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल आणि दरमहा १५०० /- रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तर , तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. चला तर मग मित्रांनो पाहुयात , काय आहे श्रावण बाळ सेवा निवृत्तीवेतन योजना { Shravan Bal Yojana Maharashtra } , लाभार्थी पात्रता , आवश्यक कागदपत्रे , श्रावण बाळ सेवा निवृत्तीवेतन योजनेचे लाभ कोणते ? श्रावण बाळ सेवा निवृत्तीवेतनयोजना महाराष्ट्र २०२३ साठी अर्ज कसा करायचा ? सर्व माहिती आपण ह्या लेखात पाहणार आहोत .

श्रावण बाळ सेवा निवृत्तीवेतन योजना म्हणजे काय ?

६५ वर्षे ओलांडलेल्या राज्यातील वृद्धांना आर्थिक मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने वृद्धपकाळ  श्रावण बाळ सेवानिवृत्त्ती योजना हि  योजना सुरु केली आहे. Shravan Bal Yojana Maharashtra या योजनेअंतर्गत सरकार दरमहा ४०० ते ६०० रुपये देणार असून , ह्या कारणाने राज्यामध्ये असणारे वृद्ध लोक हे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होती.

श्रावण बाळ सेवानिवृत्त्ती योजने अंतर्गत दोन गट करण्यात आले आहेत.

गट अ : दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड ज्या स्त्री आणि पुरुष ह्यांच्याकडे आहे आणि जे वयस्कर आहेत त्यांचे नाव ह्या गटात समाविष्ट करण्यात आले आहे.

गट ब : ज्यांच्याकडे दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड नाही असे स्त्री आणि पुरुष जे वयस्कर आहेत त्यांचे नाव ह्या गटात समाविष्ट करण्यात आले आहे.

Shravan Bal Yojana Maharashtra योजनेचे उद्दिष्ट्ये :

Shravan Bal Yojana Maharashtra राज्य मध्ये ज्येष्ठ नागरिकांना  त्यांच्या उतरत्या वयात त्यांच्या वृद्धपकाळात आर्थिक सहाय्य्य करणे , जेणेकरून त्यांना रोज त्यांच्या गरजेसाठी कोणावर अवलंबुन राहण्याची वेळ येऊ नये. हे उद्दिष्ट्ये समोर ठेऊन या योजनेची सुरुवात केली गेली

  • महाराष्ट्र राज्य मध्ये सर्व वृद्धांना  आत्मनिर्भर , स्वावलंबून बनविणे हे महत्वपूर्ण उद्दिष्ट्ये या योजनेचे आहे.
  • वृद्ध नागरिकांचा आर्थिक विकास करणे.
  • वृद्ध नागरिकांचा सामाजिक विकास करणे.
  • श्रावण बाळ सेवा निवृत्तीवेतन योजना

श्रावण बाळ सेवा निवृत्तीवेतन योजनेची वैशिट्ये :

महाराष्ट्र सरकार द्वारे राज्यातील वृद्ध नागरिकांसाठी श्रावण बाळ योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे राज्य मध्ये आर्थिक दृष्ट्या गरीब वृद्ध नागरिकांसाठी सुरु करण्यात आणलेली हि एक अत्यंत महत्वाची अशी एक योजना आहे.

या योजनेमुळे वृद्ध लोकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत होऊन त्यांना कोणावर त्यांच्या गरजे साठी कोणावर अवलंबुन राहण्याची गरज लागणार नाहि. श्रावण बाळ सेवा निवृत्तीवेतन योजना (Shravan Bal Yojana Maharashtra) या योजनेअंर्तगत अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धत करण्यात आली असून , अर्जदार हा आपल्या मोबाईल च्या माध्यमातून या योजने साठी अर्ज करू शकतो.

श्रावण बाळ सेवा निवृत्तीवेतन योजनेसाठी लाभार्थी :

महाराष्ट्र राज्य मध्ये ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक श्रावणबाळ योजने अंर्तगत अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

श्रावण बाळ सेवा निवृत्तीवेतन योजनेचे फायदे  :

  • वृद्ध लोकांना आर्थिक सहाय्य्य मिळेल
  • वृद्ध लोकांचे जीवन सुधारून , त्यांना कोणावर अवलंबुन राहण्याची आवश्यकता नसणार
  •  श्रावण बाळ सेवा निवृत्ती योजनेमुळे वृद्ध नागरिक आत्मनिर्भर होतील
  • वृद्ध लोकांचा सामाजिक आणि आर्थिक विकास होईल
  • Shravan Bal Yojana Maharashtra योजनेअंर्तगत लाभार्थीना राज्य सरकार कडून दर महिन्याला १५०० /- रु , असे आर्थिक सहाय्य्य देण्यात येते ह्यामुळे वृद्ध नागरिक आपल्या नेहमीच्या गरजा पूर्ण करू शकतील
श्रावण बाळ सेवानिवृत्त्ती योजना नियमावली :
  • अर्जदार हा किंवा ह्यांच्या कुटुंबातील कोणती सदस्य सरकारी शाखेत कामास असल्यास त्यांना अर्ज भरता येऊ शकत नाही.
  • अर्जदार हा महाराष्ट्रातील स्थायिक असावा , महाराष्ट्राबाहेर स्थायिक असणाऱ्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • अर्जदार हा भारतीय नागरिक असावा , भारताबाहेर चा रहिवासी नसावा.
  • अर्जदार / लाभार्थी ह्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये २१००० / – पेक्षा जास्त नसावे.
  • अर्जदाराचे वय ६५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
  • लाभार्थी आणि त्यांच्या कुटुंबाचे नाव हे दारिद्र्य रेषेखालील यादीत नाव असावे.
  • लाभार्थीकडे दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड असावे [ BPL ].
श्रावण बाळ सेवानिवृत्त्ती योजनेसाठी कागदपत्रे :
  • आधार कार्ड / पॅन कार्ड
  • चालू असलेला स्वतःचा मोबाईल नंबर / किंवा कुटुंबातील सदस्याचा मोबाईल नंबर
  • मतदान कार्ड
  • दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड [ BPL ]
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • विजेचे बिल
  • लाभार्थी व्यक्तीचा जन्म दाखला
  • महाराष्ट्रातील रहिवासी किंवा १५ वर्षांपासून वास्तव्य केल्याचं पत्रक [ ते ग्रामपंचायत / नगरसेवकांकडून मिळेल ]
  • उत्पनाचा दाखला
Shravan Bal Yojana Maharashtra अर्ज करण्याची ऑफलाईन पद्धत :

या योजनेची माहिती तुम्हाला ह्या लेखात मिळाली असेल , आणखी सखोल माहिती मिळवण्यासाठी तुम्ही ग्रामपंचायत मध्ये किंवा तलाठी कार्यालय मध्ये जाऊन अधिक माहिती जाणून घेऊ शकता तिथं जाऊन तुम्ही अर्ज भरून , आवश्यक असणारे सगळे कागदपत्रे जोडून अर्ज त्या कार्यालय मध्ये सादर करू शकता
अर्ज सादर करून झाल्यानंतर , कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून पोचपावती अवश्य घ्या.

वृद्ध पेन्शन योजना महाराष्ट्र | vrudh pension yojana maharashtra

मित्रानो , या पोस्टमध्ये आम्ही , श्रावण बाळ सेवानिवृत्त्ती योजना या योजनेबद्दल तुम्हाला माहिती दिली जसे कि , श्रावण बाळ सेवानिवृत्त्ती योजना म्हणजे काय , त्याचे लाभार्थी कोण आहेत , त्याची पात्रता काय आहे , त्याचे अटी / नियम काय आहेत , त्या योजनेसाठी कोणते कागदपत्रे लागतील इत्यादी माहिती आपण श्रावण बाळ सेवानिवृत्त्ती योजना या योजनेबद्दल ह्या लेखात जाणून घेतली . त्याचप्रमाणे श्रावण बाळ सेवानिवृत्त्ती योजना या योजनेची ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे ऑनलाईन प्रक्रिया करण्याची कशी आहे इत्यादी. मला आशा आहे कि , तुम्हाला हि पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत शेअर कराल
धन्यवाद !

 

I am a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Developer and Owner/founder of Marathi Corner. 6 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: मित्रा, कॉपी करायचं नसतं !! शेअर करायचं असतं !!