लेक लाडकी योजना 2024 अर्ज, कागदपत्रे अटी शर्ती पात्रता | lek ladki yojana 2024 maharashtra in marathi

By Shubham Pawar

Published on:

नमस्कार मित्रांनो, आज आपण लेक लाडकी 2024 योजना महाराष्ट्र या योजनेची माहिती बघणार आहोत. ह्या योजनेची नवीन माहिती आलेली आहे, ह्या माहिती नुसार मुलींना एकूण १ लाख १,००० हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहेत. ह्या योजनेसाठी कागदपत्रे, अटी शर्ती, पात्रता, अर्ज कसा करायचा? इत्यादी विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो तुम्हाला लेक लाडकी योजना महाराष्ट्र (lek ladki yojana 2024 maharashtra in marathi) या योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि १ लाख १,००० हजार रुपये आपल्या मुलीना लाभ घ्यायचा असेल, तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. चला तर मग मित्रांनो पाहुयात, काय आहे लेक लाडकी योजना, लाभार्थी पात्रता, लागणारी आवश्यक कागदपत्रे, या योजनेचे लाभ कोणते? लेक लाडकी योजना या योजनेसाठी अर्ज कसा करायांचा? सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

lek ladki yojana 2024 maharashtra in marathi

मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलीच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे यासाठी दिनांक १ ऑगस्ट २०१७ पासून माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) नविन योजना संदर्भाधीन दिनांक १ ऑगस्ट, २०१७ च्या शासन निर्णयान्वये लागू करण्यात आली आहे. सदर योजनेस मिळणारा अपुरा प्रतिसाद विचारात घेऊन, सदर योजना अधिक्रमित करुन मुलींच्या सक्षमीकरणाकरिता नवीन योजना लागू करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. त्यानुषंगाने सन 2023-24 च्या अर्थसंकल्पिय भाषणामध्ये \”मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन योजना सुरु करण्यात येईल. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्यामध्ये अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलींचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख देण्यात येतील.” lek ladki yojana 2024 maharashtra in marathi अशी घोषणा करण्यात आलेली आहे. त्यास अनुसरून राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी \”लेक लाडकी\” ही योजना सुरू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) ही योजना अधिक्रमित करून राज्यात दिनांक १ एप्रिल २०२३ पासून मुलीच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी \”लेक लाडकी योजना सुरू करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

लेक लाडकी योजनेची उद्दिष्टे (Objectives) खालीलप्रमाणे

  •  मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देवून मुलींचा जन्मदर वाढविणे.
  • मुलीच्या शिक्षणास चालना देणे.
  • मुलींचा मृत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखणे.
  • कुपोषण कमी करणे.
  • शाळाबाह्य मुलींचे प्रमाण ० (शुन्य) वर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे.

लाभ – सदर योजने अंतर्गत खालील अटी शर्ती व त्याकरिता नमूद आवश्यक कागदपत्रे यांच्या आधारे पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत ६ हजार रुपये, lek ladki yojana 2024 maharashtra in marathi सहावीत ७ हजार रुपये, अकरावीत ८ हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये याप्रमाणे एकूण रुपये १,०१,०००/- एवढी रक्कम देण्यात येईल.

लेक लाडकी योजना अटी व शर्ती (Terms and Conditions)

  1. ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये दिनांक १ एप्रिल, २०२३ रोजी वा त्यानंतर जन्माला येणा-या एक अथवा दोन मुलींना लागू राहील. तसेच, एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील.
  2. पहिल्या अपत्याच्या तिस-या हप्त्यासाठी व दुस-या अपत्याच्या दुस-या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता/पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
  3. तसेच, दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ lek ladki yojana 2024 maharashtra in marathi अनुज्ञेय राहील. मात्र त्यानंतर माता / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
  4. दिनांक १ एप्रिल २०२३ पूर्वी एक मुलगी / मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना (स्वतंत्र) ही योजना अनुज्ञेय राहील. मात्र माता / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
  5. लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक राहील.
  6. लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.
  7. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु. १ लक्ष पेक्षा जास्त नसावे. lek ladki yojana 2024 maharashtra in marathi

लेक लाडकी योजना महाराष्ट्र आवश्यक कागदपत्रे (Documents)

  •  लाभार्थीचा जन्माचा दाखला
  • कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न १ लाखपेक्षा जास्त नसावे.) याबाबत तहसिलदार / सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील.
  • लाभार्थीचे आधार कार्ड (प्रथम लाभावेळी ही अट शिथील राहील)
  • पालकाचे आधार कार्ड (lek ladki yojana 2024 maharashtra in marathi)
  • बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
  • रेशनकार्ड (पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत)
  • मतदान ओळखपत्र (शेवटच्या लाभाकरिता १८ वर्ष पूर्ण झाल्यांनतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला)
  • संबधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला (Bonafied) ९) कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र (\”अ\” येथील अटी शर्तीमधील क्रमांक २ येथील अटीनुसार)
  • अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील, (अविवाहीत असल्याबाबत लाभार्थीचे स्वयं घोषणापत्र)

lek ladki yojana 2024 online apply

सदर lek ladki yojana 2024 maharashtra in marathi योजनेअंतर्गत लाभासाठी मुलीच्या पालकांनी १ एप्रिल २०२३ रोजी वा तदनंतर मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रामीण अथवा नागरी क्षेत्रातील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेत मुलीच्या जन्माची नोंदणी केल्यानंतर, त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्टामध्ये नमूद केल्यानुसार आवश्यक त्या कागदपत्रांसह विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.

१) फॉर्मची ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणे

लेक लाडकी या योजनेअंतर्गत लाभ देण्याकरिता पोर्टलवर लाभार्थ्यांची ऑनलाईन पध्दतीने नोंदणी अंगणवाडी सेविका तथा पर्यवेक्षिका / मुख्यसेविका यांनी करावी. तसेच, लाभार्थ्याचे अर्ज व सर्व कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावी.

२) अंगणवाडी सेविका / पर्यवेक्षिका / मुख्यसेविका:-

लेक लाडकी योजनेच्या (lek ladki yojana 2024 maharashtra in marathi) लाभार्थीची पात्रता पडताळणी करण्याची जबाबदारी ही अंगणवाडी सेविका, संबंधित पर्यवेक्षिका / मुख्यसेविका यांची राहील. अंगणवाडी सेविका / पर्यवेक्षिका / मुख्यसेविका यांनी लाभार्थी पात्रतेची खातरजमा करुन ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा. सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे. त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका / पर्यवेक्षिका / मुख्यसेविका व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदा-या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत असून त्यामध्ये आवश्यकतेनुसार आयुक्तालय स्तरावरून सुधारणा करण्यात येतील.

दिनांक १ एप्रिल २०२३ अगोदर जन्मलेल्या मुलीस माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) योजनेच्या अटी व शर्तीनुसार लाभ दिला जाईल. मात्र, त्याकरिता अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक ३१ डिसेंबर 2024 राहील, तदनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

GR Download शासन निर्णय येथे पहा

अर्ज फॉर्म येथे डाऊनलोड करा

Conclusion

मित्रांनो, या पोस्टमध्ये आम्ही पालकांना व मुलीना या योजनेबद्दल माहिती दिली आहे जसे की – लेक लाडकी योजना (lek ladki yojana 2024 maharashtra in marathi) काय आहे, अर्ज कुठे करावा ? कागदपत्रे, पात्रता, अटी शर्ती इ . मला आशा आहे की तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही ही पोस्ट इतर मित्रांना शेअर कराल. धन्यवाद !

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

Leave a comment