50 हजार रुपये अनुदान पहा पात्रता व अटी, फक्त यांनाच मिळणार | Shetkari Karj Mafi Anudan Yojana 2024

By Shubham Pawar

Published on:

Shetkari Karj Mafi Anudan Yojana 2024 – पीक कर्जाची नियमित परतफेड करणा-या शेतक-यांना प्रोत्साहनात्मक अनुदान महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2024.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मा.मंत्री (वित्त) महाराष्ट्र शासन यांनी सन 2020 च्या पहिल्या/अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहिर केली असून सदर योजनेची अंमजबजावणी अद्याप सुरु आहे.

Shetkari Karj Mafi Anudan Yojana 2024

त्याचप्रमाणे पीक कर्जाची नियमित कर्जपरतफेड करणा-या शेतक-यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा देखील करण्यात आल्याचे आपणांस विदीत आहे.

सदर प्रोत्साहनपर अनुदान थेट शेतक-यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची कार्यवाही संगणकीय प्रणालीद्वारा करावयाची असून त्यासाठी आवश्यक पूर्वतयारी तातडीने सुरु करणे आवश्यक झाले आहे.

या अनुषंगाने आपणांस खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत, त्याचे तातडीने पालन करावे-

  1.   या पत्रासोबत जोडलेल्या नमून्यामधील माहिती आपले अधिनस्त जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तथा विविध कार्यकारी सहकारी संस्था यांचेकडून आठ दिवसांत प्राप्त करुन घ्यावी.
  2. सदर नमून्यातील माहिती EXCEL SHEET मध्ये तयार करुन या कार्यालयाकडे पाठवावी.
  3. सोबतच्या नमून्यामध्ये फक्त पीक कर्जाची माहिती असणे आवश्यक आहे, तसेच सन 2017 18, 2018-19 व 2019-20 या कालावधीत वितरित पीक कर्जाचा समावेश असणे आवश्यक आहे.
  4. ज्या शेतक-यांनी या तीन पैकी एक किंवा दोन वर्षामध्ये पीक कर्जाची उचल करुन त्या कर्जाची विहीत मुदतीत परतफेड केली असेल अशा शेतक-यांच्या माहितीचा ज्या-त्या वर्षामध्ये समावेश असणे आवश्यक आहे.
  5. संबंधीत कालावधीत शेतक-यांनी उचल केलेल्या पीक कर्जाची संपूर्ण परतफेड बँकेने विहीत केलेल्या मुदतीत करणा-या शेतक-यांची माहिती सदर नमून्यात समाविष्ट करावी.
  6. शेतक-यांच्या माहितीचा समावेश करु नये. थकीत राहिलेल्या, विहीत मुदतीनंतर परतफेड केलेल्या त्याचप्रमाणे अंशत: कर्ज परतफेड केलेल्या उक्त नमूद केल्याप्रमाणे EXCEL SHEET मध्ये माहिती तयार झाल्यानंतर सदर माहिती संगणकीय प्रणालीवर सादर करण्यापूर्वी माहितीची तपासणी होणे आवश्यक आहे. याबाबतच्या सविस्तर सूचना दि. 11-05-2023 रोजीच्या दुरचित्रवाणी सभेमध्ये देण्यात येतील.
  7. सोबत जोडलेल्या नमून्याची सॉफट कॉपी इ-मेल द्वारे स्वतंत्ररित्या पाठविण्यात येत आहे.

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

Leave a comment