Grampanchayat maha e gram citizen connect app launch खुशखबर! ग्रामपंचायतमधील सर्व दाखले घरबसल्या मिळणार. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाचा उपक्रम. सर्व दाखले आता तुम्ही तुमच्या मोबाईल वरती पाहू शकता जसे की जन्मदाखला, मृत्यू दाखला, विवाह नोंदणी दाखला, तसेच घरपट्टी पानपट्टी, कर भरण तुम्ही मोबाईल ॲपच्या माध्यमातून पाहू शकणार आहात.
Grampanchayat maha e gram citizen connect app launch
महाराष्ट्र शासनाकडून ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना घरबसल्या कशा सुविधा देता येईल याकडे लक्ष दिले जात आहे. यापूर्वी केवळ जमिनीचा सातबारा उतारा ऑनलाइन पद्धतीने काढला जात होता. मात्र, यापुढे मोबाइल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून गावठाणमधील जागेचा उतारा, ग्रामपंचायतीमध्ये मिळणारे जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र यासारखे अनेक दाखले मिळणार आहेत. सोबतच ग्रामपंचायत सदस्यांची माहिती, आपण यापूर्वी कराचा भरणा केलेल्या सर्व कराच्या रकमेची माहिती या अॅपच्या माध्यमातून मिळणार आहे.
सर्व दाखले पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग व पंचायत राज विभागामार्फत महा ई ग्राम सिटिझन कनेक्ट नावाचा एकमोबाइल अॅप्लिकेशन अॅप लाँच केला आहे. हा अँप आपल्या मोबाइलमध्ये इंस्टॉल करून गावातील नागरिक घरबसल्या ग्रामपंचायतीमधून मिळणारे दाखले काढू शकतात. त्यामुळे त्यांची वेळेची बचत होणार असून, दाखल्याकरिता ग्रामपंचायतीला फेन्या माराव्या लागणार नाहीत. \”Grampanchayat maha e gram citizen connect app launch\”
वेळेतच त्यांना घरबसल्या दाखले मिळणार आहेत, तर ग्रामपंचायतीला या माध्यमातून नागरिकांकडून मिळणारा गृहकर वसूल करणे सोयीचे झाले असल्याने ग्रामपंचायतीला गृहकर वसुलीत येणाऱ्या अडचणी दूर होण्यासमदत होणार आहे.
आता दाखले मिळणार तुमच्या व्हॉट्सॲप वर
हे दाखले मिळणार
या मोबाइल अॅप्लिकेशन अॅपच्या माध्यमातून नागरिकांना घरबसल्या जन्म व मृत्यू प्रमाणपत्र, दारिद्र्यरे- षेखालील प्रमाणपत्र, नमुना ८ असेसमेंट उतारा ही प्रमाणपत्र मिळणार आहेत. याशिवाय या अँपच्या माध्यमातून घरबसल्या घराचा कर भरणा सुद्धा करता येणार आहे. जन्मदाखला, मृत्यू दाखला, विवाह नोंदणी दाखला, तसेच घरपट्टी पानपट्टी, कर भरण
असे करा अॅप इन्स्टॉल
आपल्या मोबाइलमधील प्ले स्टोअरमधून महा ई-ग्राम सिटिझन कनेक्ट हे अॅप इन्स्टाल करा. अँप ओपन करून रजिस्टर करा. त्यामध्ये आपले नाव, लिंग, जन्म तारीख, मोबाइल नंबर, ई-मेल आयडी वासह सर्व माहिती जतन करा. यानंतर मिळालेल्या युजर पासवर्डद्वारे लोगिन करा. {Grampanchayat maha e gram citizen connect app launch}
सिटिझन कनेक्ट या अॅप्लिकेशन अॅपमुळे नागरिकांना ग्रामपंचायतीमधून मिळणाऱ्या प्रमाणपत्रांकरिता नागरिकांना ग्रामपंचायतमध्ये जाण्याची गरज नाही. त्यांना घरबसल्या अॅपच्या माध्यमातून लागणाच्या प्रमाणपत्राकरिता ऑनलाइन अर्ज करता येईल व प्रमाणपत्र घेता येईल. त्यामुळे नागरिकांची वेळेची बचत होईल.