Shahu Maharaj Shishyavrutti Yojana 2024:- मागासवर्गीय घटकातील गुणवत्ताधारक गरजू विद्यार्थ्यासाठी विद्यापीठामार्फत सदर शिष्यवृत्ती योजना कार्यान्वित केलेली आहे. सदर योजना फक्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी लागू असून पदवी व पदव्युत्तर अव्यवसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज (सर्व संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठ विभागातील एकत्रित) गुणवत्तेनुसार विचारात घेतले जातील.
त्यापैकी 48% मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा एकत्रित गुणवत्तेनुसार व उर्वरित 52% विद्यार्थ्याचा त्या त्या प्रवर्गासाठी लागू असलेल्या आरक्षणाच्या टक्केवारीनुसार गुणानुक्रमे अर्ज विचारात घेतले जातील. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील योजनेस पात्र विद्यार्थ्यांना पुढील निकषानुसार शिष्यवृत्ती योजना लागू राहील.
Shahu Maharaj Shishyavrutti Yojana 2024
- सदरची योजना फक्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लागू राहील.सदरच्या योजनेसाठी उत्पन्नाची कोणतेही अट राहणार नाही केवळ गुणवत्ता हाच निकष राहील.
- मागील लगतच्या परिक्षेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी किमान ६० टक्के गुण संपादित केलेले असावेत. पात्र विद्यार्थ्यांचे वय पदवी अभ्यासक्रमाकरीता २५ व पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरीता ३० पेक्षा जास्त नसावे.
- पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील योजनेस पात्र विद्यार्थ्यांना पुढील निकषानुसार शिष्यवृत्ती योजना लागू राहील.
- विद्यार्थ्यांची नियमित अभ्यासक्रमात किमान ७५ टक्के उपस्थिती असणे आवश्यक राहील. या संदर्भात प्राचार्यानी दाखला देणे आवश्यक राहील,
- महाविद्यालय/ विद्यापीठ शैक्षणिक विभागामध्ये विद्यार्थ्याने नियमित अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेला असावा.
- विद्यार्थ्याने व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला नसावा.
- विद्यार्थ्यास गैरशिस्त/नैतिकता/परीक्षेतील गैरप्रकार इ. बाबत शिक्षा झालेली नसावी.
- विद्यार्थ्याने त्याच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. उदा. बँकेचे नाव, पत्ता, खाते क्रमांक (एमआयसीआर कोड आणि आयएफएससी कोड)
- विद्यार्थी भारतीय नागरिक असावा. त्यासाठी नागरिकत्वाचा साक्षांकित दाखला जोडणे आवश्यक राहील.
- संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य हे विद्यापीठाचे मान्यताप्राप्त किंवा प्रभारी प्राचार्य म्हणून मान्यताप्राप्त असावेत.
- शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळत असलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजना लागू राहणार नाही. याबाबत संबंधित विद्यार्थ्याने आणि प्राचार्यांनी एकत्रित हमीपत्र भरून देणे आवश्यक राहील.