Tractor Anudan Yojana Maharashtra 2024 then this is the right place for you here is all about मुख्यमंत्री ट्रॅक्टर योजना महाराष्ट्र. कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे व शेती मधील उर्जेच्या वापराचे प्रमाण २ किलोवॅट/ हेक्टर पर्यंत वाढविणे.
उद्देश : (Mahadbt Farmer Scheme)
जेथे शेतीमधील उर्जेचा वापर कमी आहे अशा क्षेत्रामध्ये व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषि यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे.
प्रात्याक्षिके व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदारमध्ये जागरुकता निर्माण करणे.
धोरण :
कृषि यंत्र/ अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे प्रशिक्षण व प्रात्यक्षिका द्वारे सहभागीदारांना कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहित करणे (Tractor Yojana 2024 Anudan Maharashtra)
Tractor Anudan Yojana Maharashtra 2024
या योजनेतून खालील दिलेल्या कृषि यंत्र / अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येईल:
१) ट्रॅक्टर
२) पॉवर टिलर
३) ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे
४) बैल चलित यंत्र/अवजारे
५) मनुष्य चलित यंत्र/अवजारे
६) प्रक्रिया संच
७) काढणी पश्च्यात तंत्रज्ञान
८) फलोत्पादन यंत्र/अवजारे
९) वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
१०) स्वयं चलित यंत्रे
भाडे तत्वावरील सुविधा केंद्र:
१) कृषि अवजारे बँकेची स्थापना
२) उच्च तंत्रज्ञान , उत्पादन सेवा सुविधा केंद्राची स्थापना
लाभाच्या माहितीसाठी कृपया सोबतचे प्रपत्र पाहावे.
मुख्यमंत्री ट्रॅक्टर योजना महाराष्ट्र
- शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे
- शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा
- शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक
- फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार
- कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक
- एखाद्या घटकासाठी / औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल (\”Mahadbt Farmer Scheme\”)
उदा. एखाद्या शेतकऱ्याला सन २०१८-१९ मध्ये ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असेल तर पुढील १० वर्षे ट्रॅक्टरसाठी लाभ मिळण्यास पात्र ठरणार नाही सन २०१९-२० मध्ये इतर औजारासाठी लाभापात्र राहील
Tractor Anudan Yojana Maharashtra 2024 आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- ७/१२ उतारा
- ८ अ दाखला
- खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
- जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )
- स्वयं घोषणापत्र
- पूर्वसंमती पत्र
एक शेतकरी – एक अर्ज :
\’Tractor Anudan Yojana Maharashtra\’ केवळ एकाच अर्जाद्वारे कृषी विभागाच्या विविध योजनांमधील सर्व बाबींना अर्ज करण्याची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. शेतकरी बांधवांनी पोर्टलवरील उपलब्ध बाबींपैकी आपल्या पसंतीच्या बाबी प्रथमतः
निवडाव्यात व त्यांचा अर्जात समावेश करावा. आपल्या पसंतीच्या सर्व बाबी निवडून झाल्या नंतरच ‘अर्ज सादर करा’ या बटनवर क्लिक करावे. अशाप्रकारे, आपण निवडलेल्या सर्व बाबींसाठी एकच अर्ज तयार होईल व या बाबींसाठी ज्या-ज्या योजनेतून लाभ देणे शक्य असेल त्या पैकी कोणत्याही एका योजनेतून ऑनलाईन लॉटरीद्वारे लाभ देण्यात येईल.
mahadbt Farmer Scheme List
- प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – प्रती थेंब अधिक पिक (सूक्ष्म सिंचन घटक)
- कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान
- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान : अन्नधान्य, तेलबिया, ऊस व कापूस
- बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (आदिवासी उप योजना / आदिवासी उप योजना बाह्य)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
- कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम
- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
- राष्ट्रीय कृषी विकास योजना – रफ्तार
- राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना
- मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना
योजनेचा लाभ मिळेल का
Name omkar vinod khade tal.man district .satar po.pipari at .dhamani please tractor yajana sathi labha milava ashi aamachi vich aahi
Please sir /madam mi satar jelha madhye rahato aamachi vich aahi ki tractor yojan madhye aamhala labha milava