संत तुकाराम महाराज माहिती मराठी मध्ये Sant Tukaram Maharaj Information in Marathi

By Shubham Pawar

Updated on:

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. त्या भूमीमध्ये अनेक संत होऊन गेले. (Sant Tukaram Maharaj Information in Marathi) त्यांचे कार्य महान आहे. कारण महाराष्ट्रात संत नसते तर महाराष्ट्रातील कुप्रथा आजही असत्या म्हणून त्यांचे कार्य आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे संत ज्ञानेश्वर पासून तुकाराम संत एकनाथ संत रामदास यामधील मला भावलेले संत तुकाराम महाराजांपर्यंत संत परंपरा लाभली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिवाजी महाराजांच्या काळातील एक थोर समतावादी संत म्हणून संत तुकाराम महाराजांचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो. आपल्याला लाभलेल्या अल्प आयुष्यामध्ये संत तुकाराम महाराज यांनी मराठी भाषेतील अजरामर अशा संत साहित्यात मोलाची भर टाकली. कधीही भंग न पाहणाऱ्या हजारो अभंगांची रचना करून जनसामान्य मराठी भाविकाला आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये परमेश्वराची भक्ती कशी करावी याचा सहज पणे उल्लेख केलेला आहे.

Sant Tukaram Maharaj Information in Marathi

तुकाराम महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात येईल देहू या चिमुकल्या गावामध्ये सन 22 जानेवारी 1608 मध् झाला. तुकाराम महाराजांचे वडिलांचे नाव बोल्होबा असे होते. तर आईचे नाव कनकाई असे होते. संत तुकाराम महाराजांचे कुटुंब हे विठ्ठल भक्त होते. \”Sant Tukaram Maharaj Information in Marathi\”

संत तुकाराम महाराजांचे आठवे पूर्वज विश्वंभर बाबा हे संत ज्ञानेश्वर कालीन महान साधू होते. विश्वंभर बाबांनी संत तुकारामांच्या कुळामध्ये विठ्ठल भक्तीला खऱ्या अर्थाने सुरुवात केली असे म्हणता येईल.

संत तुकाराम क्षत्रिय मराठा समाजात जन्माला आले होते असे असले तरी ते स्वतःला शूद्र , कुणबी, यातीहिन समजत. अर्थात संत तुकारामांचा जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्था या गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता. “यारे यारे लहानथोर, याती भलती नारी नर\” असे म्हणणारे संत तकाराम हे एक समतावादी थोर पुरुष होते.

संत तुकाराम महाराज माहिती मराठी

संत तुकाराम यांचे लग्न त्यांच्या वडिलांनी लोहगाव येथे रुक्मिणीशी लावून दिले. लोहगाव येथे तुकाराम महाराजांचे मामाचे गाव होते. आणि सासरवाडी सुद्धा होती. पुढे त्यांची याठिकाणी अनेक कीर्तने झाली. रुक्मिणी किंवा रूखमाई ही तुकाराम महाराजांची पहिली पत्नी पुढे दम्यामुळे अकाली मृत्यु पावली. तिचा पहिला मुलगा सुद्धा अकाली मृत्यू पावला. या दुःखाने तुकाराम महाराज व्याकुळ झाले. Sant Tukaram Maharaj Information in Marathi

तुकाराम महाराज यांचे दुसरे लग्न जिजाई या पुणे जिल्ह्यातील खेडच्या आप्पाजी गुळवे यांच्या मुलीशी झाले. जिजाईचे नाव अवलाई असेही होते. जिजाईपासून संत तुकारामांना महादेव, विठोबा, नारायण आणि काशी. भागीरथी. गंगा अशी सहा मले झाली. परंपरागत व्यवसायाची जबाबदारी पार पाडत असताना 1629, 30 आणि 31 या वर्षामध्ये फार मोठा दुष्काळ पडला. या दुष्काळामध्ये लोक अक्षरशः देशोधडीला लागले.

अन्नान्नदशा करीत दाही दिशा फिरू लागले. संत तुकाराम यांनी आपल्या भावामध्ये आणि स्वतःमध्ये घरातील संपत्तीचे वाटप केले. आपल्या वाटेला आलेली कर्जखते, गहाणखते इंद्रायणी नदीमध्ये सोडून दिल्ही लोकांना एक प्रकारे कर्जमुक्त केले.

Sant Tukaram Maharaj Information in Marathi

संत तुकारामांचा निष्पाप आत्मा आणि कोमल मन पत्नीचा मृत्यू मुलाचा मृत्यू आणि दुष्काळ यामुळे दुःखाने भरून गेले. जगामध्ये परमेश्वर असेल तर त्याने इतके प्रचंड मोठे दुःख माझ्या आणि जगाच्या वाट्याला काय येऊ द्यावे? असा मोठा प्रश्न तुकारामांना पडला. ते विचार करू लागले. जवळच्याच भामचंद्र डोंगरावर जाऊन त्या ठिकाणी त्यांनी निर्वाण मांडले. परमेश्वराचा धावा ते अतिशय व्याकूळ अंतकरणाने करू लागले. परमेश्वराचे दर्शन अर्थात आत्मसाक्षात्कार त्यांना याच ठिकाणी झाला.

संत तुकाराम यांना लहानपणीच त्यांच्या घरी आई वडील यांनी उत्तम शिक्षण दिले होते. ते साक्षर होते. त्यांनी हिंदू धर्मातील सर्व प्रमुख ग्रंथांचा अभ्यास आपल्या घरीच केला होता. धर्म साक्षरता त्यांना प्राप्त होती. आपल्या ज्ञानाने आणि प्रत्यक्ष अनुभव आला तुकाराम महाराज हे एक चिंतनशील व्यक्तिमत्व. Sant Tukaram Maharaj Information in Marathi

संत तुकाराम हे बुद्धिवादी असले तरी त्यांचा आत्मा हा कवीचा होता. त्यांनी अभंगांची रचना करण्यास सुरुवात केली. त्यांचे स्वतःचे विठ्ठलाचे मंदिर होते. त्या मंदिरामध्ये झालेली पडझड त्यांनी दुरुस्त केली. त्या ठिकाणी ते कीर्तन करू लागले. स्वतःचे अभंग गाऊ लागले. भागवत संप्रदायाचे तत्त्वज्ञान समोर बसलेल्या वारकऱ्यांना सुलभ आणि स्पष्ट भाषेत ते सांगू लागले. त्यामुळे जनसामान्य माणसे प्रभावित झाली. त्यांच्या भोवती गोळा होऊ लागली. भगवत भक्तीची वाट सापडल्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये आनंदाची एक मोठी वाट निर्माण झाली.

संत तुकाराम महाराज माहिती

“वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा
इतरांनी वहावा भार माथा \”
असे त्यांचे स्पष्ट आणि परखड उद्धार आहेत.
“अर्थेविन पाठांतर कासया करावे
उगाची मरावे घोकुनिया

इतक्या परखडपणे त्यांनी त्याकाळच्या पोथीनिष्ठ पाठांतरवादी कर्मठ लोकांवर टीका केली. वेदांचा उल्लेख करून संत तुकाराम लोकांना लोकभाषेत सांगताहेत हे त्यावेळच्या ब्राह्मण समाजातील काही धुरीणांना अजिबात आवडले नाही. पुढे तुकारामांचा शिष्य बनलेल्या रामेश्वर भट्टासारख्याने संत तुकारामांची निंदा केली. \”Sant Tukaram Maharaj Information in Marathi\”

संत तुकारामांची कीर्ती दाही दिशांना सुगंधाप्रमाणे पसरत होती. छत्रपती शिवरायांच्या कानीही ती गेली होती. छत्रपती शिवरायांनी संत तुकारामांना द्रव्य आणि पोशाख यांचा नजराणा पाठवला. परंतु सोने आम्हाला मातीसमान आहे. याची आमच्यासाठी आवश्यकता नसून गोरगरिबांच्या कल्याणासाठी तुम्ही त्याचा वापर करा. असे संत तुकारामांनी उलट उत्तर दिले. अर्थात यामुळे संत तुकारामांचा आदर अधिकच वाढला. त्यांचे निस्पृह मन पाहून शिवाजी महाराज सुद्धा त्यांच्या भेटीसाठी व्याकूळ झाले. Sant Tukaram Maharaj Information in Marathi

Sant Tukaram Maharaj Information

\”असाध्य ते साध्य करिता सायास I
कारण अभ्यास तुका म्हणे\”

अशा प्रकारचे एकापेक्षा एक नितांतसुंदर अभंग महान संत तुकाराम महाराजांनी रचले. तुकारामांना वारकरी जगद्गुरू म्हणून ओळखतात. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज तुकोबांना गुरु मानत.संत बहिणाबाई ही तुकारामांची शिष्या होती. तुकारामांना वारकरी जगद्गुरू म्हणून ओळखतात. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज तुकोबांना गुरु मानत.संत बहिणाबाई ही तुकारामांची शिष्या होती. [Sant Tukaram Maharaj Information in Marathi]

संत तुकारामांनी तुकाराम गाथा लिहली, तिच्यामध्ये पाच हजारांवर अभंग आहेत. पंढरपूरचे विठ्ठल हे त्यांचे आराध्य दैवत होते. त्यांनी विठ्ठलावर तसेच समाजावर अनेक उपदेशपर अभंग, कीर्तने रचली.

संत तुकाराम महाराज

लहानपण देगा देवा |
मुंगी साखरेचा रवा |
तसेच नाही निर्मळ जीवन |
काय करील साबण |

अशी अनेक अभंगे त्यांच्या कुशाग्र बुद्धि मत्तेचे दयोतक आहेत. त्यांच्या अभंगातील गोडवा अतुलनीय आहे. त्यांच्या अभंगाना स्वतःचा बाज, आगळे सौदर्यं आहे. त्यातील शब्द प्रत्येकाच्या मनाला भुरळ घालतात. वार करी संप्रदायाची एक अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली. सतराव्या शतकात सामाजिक प्रबोधनाची प्रभावी मुहूर्तमेढ संत तुकाराम महाराजांनी रोवली. त्या काळी समाजातील अंधश्रध्दा दूर करून समाजाला अचूक, योग्य दिशा देण्याचे महत्वपूर्ण, महान कार्य तुकोबांनी केले. Sant Tukaram Maharaj Information in Marathi

स्वतःच्या सुखापेक्षा तुकोबांनी जगाच्या कल्याणाकडे सदैव लक्ष दिले. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले असे मानले जाते. हा दिवस \’तुकाराम बीज\’ म्हणून ओळखला जातो. तुकाराम महाराजांच्या जीवनपटा वर अनेक पुस्तके, मालिका, चित्रपट प्रसिध्द झाले आहेत. आजही मराठी भाषेत सुप्रसिद्ध असलेल्या अनेक म्हणी, वाक्प्रचार, शब्दप्रयोग आपण तुकारामांच्या गाथेतूनच घेतलेल्या आहेत. आजच्या समाजाला संत तुकारामांचे अभंग नवी दिशा देतात.

Sant Tukaram Maharaj Mahiti Marathi

आज आपण विज्ञान-तंत्रज्ञानात खूप प्रगती केली तरी प्रत्येकाला अनेक कौटुंबिक, सामा जिक, भावनिक समस्या भेडसावतात. त्या सर्वांवर तुकोबांच्या अभंगातून नक्की मार्ग सापडेल. नाहीतर आपली अवस्था तुझे आहे तुजपाशी, परि तू जागा चुक लासी अशी होईल. आपल्या देशात संत तुकाराम महाराज जन्मास आले हे प्रत्येक भारतीयाचे अहोभाग्यच म्हणावे लागेल. Sant Tukaram Maharaj Information in Marathi

संत तुकाराम महाराजांनी सुमारे चार हजार पेक्षा जास्त अभंगरचना केली. अर्थात ही अभंगरचना जी म्हणजे वैदिक धर्मा विरुद्ध केलेले बंड आहे असे तत्कालीन ब्राह्मणांना वाटले. त्यांनी हे अभंग इंद्रायणी नदीत बुडवा असे संत तुकारामांना सांगितले. त्यासाठी तुकाराम महाराजांवर दडपण आणले.

संत तुकाराम आता अधिकाधिक विरक्त होत चा होते. त्यांना कोणत्याही प्रापंचिक गोष्टींमध्ये आशा आणि अपेक्षा राहिली नव्हती. ते वैराग्य पूर्ण जीवन जगत होते. चाळीसी नंतर आता आपण हे जग स्वेच्छेने सोडून जावे असे त्यांना वाटू लागले. वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी 9 मार्च 1650 या दिवशी संत तुकारामांचे निर्याण झाले. “आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा\” असे म्हणून ते वैकुंठला निघून गेले. Sant Tukaram Maharaj Information in Marathi

संत तुकाराम महाराज माहिती मराठी मध्ये

संत तुकाराम वैकुंठाला गेले असले तरी त्यांचा विच जनसामान्यांमध्ये कायमचा रुजला गेला. आता त्यांची अभंग है गाथा लोक गंगेवर तरलेली होती. वैदिकांना त्यांचा विचार मान्य नसला तरी वारकऱ्यांना त्यांचा विचार म्हणजे जीवनाचा सार सर्वस्व होता. आजही वारकरी देहूला संत तुकारामांच्या दर्शनासाठी जातात आणि तुकारामांचा अभंग गाथा डोक्यावर घेऊन अक्षरशः नाचतात.

“ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस \” असे सार्थ उदगार तकारामांच्या बाबतीत सत्य झालेले काळाने पाहिले. (Sant Tukaram Maharaj Information in Marathi) संत तुकाराम हे बुद्धिवादी असले तरी त्यांचा आत्मा का कवीचा होता. त्यांनी अभंगांची रचना करण्यास सुरुवात केली. त्यांचे स्वतःचे विठ्ठलाचे मंदिर होते. त्या मंदिरामध्ये झालेली पडझड त्यांनी दुरुस्त केली. त्या ठिकाणी ते कीर्तन करू लागले. स्वतःचे अभंग गाऊ लागले. भागवत संप्रदायाचे तत्त्वज्ञान समोर बसलेल्या वारकऱ्यांना सुलभ आणि स्पष्ट भाषेत ते सांगू लागले. त्यामुळे जनसामान्य माणसे प्रभावित झाली. त्यांच्या भोवती गोळा होऊ लागली. 

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

Leave a comment