Swami Vivekananda Student Yojana:- (पुरग्रस्त, दुष्काळग्रस्त व आपत्तीग्रस्त भागातील विद्यार्थ्यासाठी) विद्यार्थ्यांना कोणत्या न कोणत्या कारणाने नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी बरेच विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. विद्यार्थ्यांना आर्थिक मदत होईल या उद्देशाने शैक्षणिक वर्ष 2020-21 पासुन नव्याने सदर योजना सुरू करण्यात आलेली आहे.
सदर योजनेचा लाभ सरसकट पुरग्रस्त, दुष्काळग्रस्त व आपत्तीग्रस्त भागातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या एकुण 32,000 विद्यार्थ्यास गुणवत्तेनुसार रू. 1000/- अर्थसहाय्य देण्यात येईल. विद्यार्थ्यांना कोणत्या न कोणत्या कारणाने नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते.
अशावेळी बरेच विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. विद्यार्थ्यांना आर्थिक मदत होईल या उद्देशाने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासुन नव्याने सदर योजना सुरू केलेली आहे.
Swami Vivekananda Student Yojana
नियम व अटी
१.सदर योजना व्यवसायिक व अव्यवसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार लागू राहील.
२. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या चारही विद्याशाखेतील प्रत्येकी आठ हजार विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार 1000/- प्रमाणे एकुण 32000 विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येईल.
३. महाविद्यालये/विद्यापीठ शैक्षणिक विभागामध्ये विद्यार्थ्याने नियमित अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्यांची नियमित अभ्यासक्रमात किमान ७५ टक्के उपस्थिती असणे आवश्यक राहील. या संदर्भात प्राचार्यांनी दाखला देणे आवश्यक राहील. पुरग्रस्त, दुष्काळग्रस्त व आपत्तीग्रस्त भागातील विद्यार्थी म्हणून मा.प्राचार्य/विद्यापीठ विभागप्रमुख यांनी शिफारस करणे आवश्यक राहील.
४.विद्यार्थ्यास या योजनेच्या कालावधीत कोणतीही पगारी नोकरी स्विकारता येणार नाही. विद्यार्थ्यास गैरशिस्त / नैतिकता/परीक्षेतील गैरप्रकार इ. बाबत शिक्षा झालेली नसावी.
५.विद्यार्थ्याने त्यांच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. उदा. बँकेचे नाव, पत्ता, खाते क्रमांक (एमआयसीआर कोड आणि आयएफएससी कोड)
६. विद्यार्थ्याने आणि संबंधित प्राचार्यांनी एकत्रित हनीपत्र भरून देणे आवश्यक राहील.
Apply Here – https://bcud.unipune.ac.in/Scholorships