रेशन कार्ड नंबर काढा तुमच्या मोबाईल मधून | RC Details Ration Card Maharashtra

By Shubham Pawar

Updated on:

RC Details Ration Card Maharashtra: मित्रांनो, राज्यात जेव्हापासून रेशन कार्डला आधार क्रमांक लिंक करण्यात आले तेव्हापासून रेशन कार्डला एक विशिष्ट क्रमांक देण्यात येऊ लागला. ज्याला \”RC Number\” रेशन कार्ड नंबर असे म्हणतात. तर मित्रांनो, हा रेशन कार्ड नंबर  तुम्हाला माहीत नसेल, तर तो नेमका कसा शोधायचा? तुमच्या मोबाईलवर हा नंबर कसा शोधून काढावा? हे आपण आजच्या ह्या लेखात जाणून घेणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RC Details Ration Card Maharashtra

मित्रांनो, तुमचा रेशन कार्ड नंबर {RC Details Ration Card Maharashtra} जाणून घेण्याकरिता तुम्हाला Android मोबाईलवर एक अॅप्लिकेशन इंस्टॉल करावे लागेल. तर सर्व स्टेप बाय स्टेप माहिती पाहुयात.

  1. सर्वप्रथम तुमच्या Android मोबाईल मध्ये Google Play Store ओपन करून घ्यावे.
  2. Google Play Store ओपन झाल्यावर सर्वात वर सर्च बार मध्ये \”Mera Ration\” हे केंद्र शासनाकडून जारी करण्यात आलेले मोबाईल अॅप्लिकेशन सर्च करावे.
  3. \”Mera Ration\” अॅप्लिकेशन इंस्टॉल करून ते ओपन करून घ्यावे.
  4. \”Mera Ration\” हे अॅप्लिकेशन ओपन झाल्यावर काही परमिशन तुम्हाला Allow कराव्या लागतील. त्यानंतर अॅप्लिकेशनच्या होमपेजवर तुम्हाला बरेच ऑप्शन दिसतील.
  5. दिसत असलेल्या ऑप्शनमधून 7 व्या क्रमांकावरील \”Aadhar Seeding\” ह्या ऑप्शनवर क्लिक करावे.
  6. \”Aadhar Seeding\” या ऑप्शनवर क्लिक केल्यावर आता तुम्हाला \”Ration Card No\” आणि \”Aadhar No\” असे दोन पर्याय दिसतील. आणि खाली सबमीट बटन दिसेल.
  7. तर यामधून तुम्ही \”Aadhar No\” हा ऑप्शन सिलेक्ट करून तुमच्या घरातील कोणत्याही सदस्याचे आधार क्रमांक त्या ठिकाणी नमूद करून घ्यावे. आणि सबमीट बटणावर क्लिक करावे.
  8. सबमीट बटणावर क्लिक केल्यावर आता तुमच्या रेशन कार्डची संपूर्ण माहिती तुम्हाला दिसेल.
  9. ज्यामध्ये Home State म्हणजे तुमचे राज्य, Home District म्हणजे तुमचा जिल्हा, Scheme म्हणजे तुम्हाला कोणत्या योजनेअंतर्गत रेशन मिळत आहे, त्यानंतर Card Number दिसेल. आणि खाली रेशन कार्डवर सर्व सदस्यांची नावे आणि त्यांचे आधार क्रमांक सिडिंग आहे की नाही, ही माहिती दिसेल.
  10. तर यामध्ये तुम्हाला दिसत असलेला Card Number जो की 12 अंकी असेल, तोच तुमचा रेशन कार्ड क्रमांक {RC Details Ration Card Maharashtra} असणार आहे.

ही माहिती विडिओ स्वरुपात पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

तर मित्रांनो अशाप्रकारे \”Mera Ration\” हे अॅप्लिकेशन तुमच्या मोबाईल मध्ये इंस्टॉल करून आणि वरील प्रकारे स्टेप फॉलो करून तुम्ही तुमचा 12 अंकी रेशन कार्ड क्रमांक RC Details Ration Card Maharashtra शोधू शकता.

ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर, ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर नक्की करा आणि असाच प्रकारच्या उपयुक्त माहितीसाठी आमच्या marathicorner.com/ वेबसाईटला नेहमी भेट देत रहा.

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

Leave a comment