पंडित दीनदयाल स्वयंम योजना 2024 | Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana

By Shubham Pawar

Published on:

Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana –  आदिवासी विकास विभागाच्या अधिपत्याखाली अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता राज्यात एकूण 495 वसतीगृहे मंजुर असून त्यांची एकूण प्रवेश क्षमता 61070 इतकी आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

त्यापैकी 491 शासकीय वसतीगृहे कार्यरत असून त्यापैकी 283 वसतीगृहे ही मुलांची व 208 वसतीगृहे ही मुलींची आहेत, या वसतीगृहांची क्षमता 58495 इतकी आहे.

राज्यात विविध ठिकाणी महाविद्यालये, उच्च महाविद्यालये, तंत्रनिकेतन, वैद्यकीय महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, आय.टी.आय, अल्प मुदतीचे कौशल्यावर आधारीत अभ्यासक्रम इत्यादिंची सोय झाली आहे.

Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana

सदर उच्च शैक्षणिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सदर विद्यार्थी ग्रामीण तसेच दुर्गम क्षेत्रातून तालुक्याच्या / जिल्ह्याच्या/ विभागीय मुख्यालय / महानगरांच्या ठिकाणी शिक्षणासाठी येतात.

मात्र त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना या ठिकाणी निवास, भोजन तसेच इतर शैक्षणिक खर्च परवडत नसल्याने त्यांना अशा सुविधा मोफत पुरविण्यासाठी विभागांतर्गत शासकीय वसतीगृहांमध्ये प्रवेश देण्यात येतो. Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana

मात्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याने शासकीय वसतिगृहांतील उपलब्ध प्रवेश क्षमता कमी पडत आहे.

पंडित दीनदयाल स्वयंम योजना 2024

मागील 3 शैक्षणिक वर्षामध्ये वसतीगृह प्रवेशासाठी सरासरी 75,000 अर्ज प्राप्त होत आहेत. याप्रकरणी विभागाच्या कार्यान्वित वसतीगृहांची प्रवेश क्षमता 58495 असल्याने वसतीगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या वसतीगृह प्रवेशासाठी विविध लोकप्रतिनीधी.

विविध विद्यार्थी संघटना तसेच क्षेत्रिय कार्यालयांकडून नवीन वसतीगृहे मंजूर करण्याबाबत तसेच वसतीगृहांची प्रवेश क्षमता वाढविण्याबाबत सतत मागणी होत आहे. Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana

तथापि, नवीन वसतीगृहे मंजूर करणे, वसतीगृह प्रवेशाच्या क्षमतेत वाढ करणे. त्याकरिता भाड्याच्या इमारती शोधणे तसेच नवीन कर्मचारी नियुक्ती करणे इत्यादी बाबींकरिता होणारा विलंब.

तसेच राज्य शासनावरील अनावर्ती भांडवली खर्च टाळण्यासाठी सद्यस्थितीत कार्यरत वसतीगृहांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करूनही प्रवेश न मिळणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरीता भोजन, निवास व शैक्षणिक साहित्यासाठी थेट रक्कम वितरण करण्याबाबत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

  • अनुसूचित जमातीच्या शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता 12वी नंतरच्या उच्च शिक्षणाकरीता भोजन, निवास व शैक्षणिक साहित्यासाठी त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरण करण्याबाबत \”पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजना” राबविण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. \”Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana\”
  • सदर योजनेंतर्गत सन 2016-17 या शैक्षणिक वर्षापासून सद्यस्थितीत शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या एकूण 20,000 विद्यार्थी संख्येच्या मर्यादेत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरीता भोजन, निवास व शैक्षणिक साहित्यासाठी त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरण करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

 सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी खालीलप्रमाणे निकष असतील – 

मुलभूत पात्रता

  • विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. विद्यार्थ्यांने अर्जासोबत जात पडताळणी प्रमाणपत्र
    सादर करणे बंधनकारक राहील.
  • विद्यार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न रु.2.50 लाख पेक्षा जास्त नसावे. तसेच केंद्र शासनामार्फत ज्या ज्या वेळी मॅट्रीकेत्तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल, त्यानुसार या योजनेसाठी पालकाची वार्षीक उत्पन्न मर्यादा लागू राहील.
  • विद्यार्थ्याने स्वत:चा आधार क्रमांक आपले राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संल्लग्न करणे बंधनकारक राहील. Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana
  • विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे अशा शहरातील सदर विद्याथ्याचे पालक रहिवाशी नसावेत.
  • सदर योजनेचा लाभ मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांने संबंधित शहरामध्ये राहणे आवश्यक राहील.

Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana शैक्षणिक निकष

  1. सदरचा विद्यार्थी 12वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा.
  2. केंद्र शासनाच्या पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती करीता निश्चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजनेंतर्गत लाभ देण्यात येईल.
  3. तथापि, दोन वर्षापेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  4. एका शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेच्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.  \’Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana\’
  5. यामध्ये प्रथम पदवी पूर्ण न करता दुसऱ्या पदवीसाठी प्रवेश मिळाल्यास सुध्दा लाभ घेता येणारा नाही.
  6. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, अखिल भारतीय वैद्यकीय परिषद, भारतीय फार्मसी परिषद, वास्तुकला परिषद, राज्य शासन किंवा तत्सम संस्था इ. मार्फत मान्यताप्राप्त महाविद्यालयात/संस्थेमध्ये व मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यास प्रवेश मिळालेला असावा.
  7. विद्यार्थ्याची संस्थेमधील / महाविद्यालयातील उपस्थिती 80 टक्केपेक्षा अधिक असणे आवश्यक राहील. विद्यार्थ्यांची निवड करताना गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल.
  8. निवड करण्यात आलेल्या विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील.
  9. मात्र विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी त्या त्या अभ्यासक्रमाच्या परिक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.

 इतर निकष

  •  योजनेचा लाभ 12वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यास देण्यात येईल.
  • तथापि एका विद्यार्थ्यास जास्तीत जास्त 7 वर्षे सदर योजनेचा लाभ घेता येईल.
  • सदर योजनेचा 7 वर्षे लाभ घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्यास वसतीगृहात प्रवेश मिळणार नाही.
  • सदर योजनेस पात्र विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास योजनेंतर्गत लाभ देण्यात येणार नाही.
  • सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय 28 वर्षापेक्षा अधिक नसावे.
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याने आदिवासी विकास विभागाच्या संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील.
  • विद्यार्थ्यास आदिवासी विकास विभागाच्या सामाजिक न्याय विभागाच्या किंवा संबंधित शैक्षणिक संस्थेच्या वसतीगृहामध्ये मोफत प्रवेश मिळालेला नसावा.
  • विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा. \”Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana\”
  • आदिम जमातीच्या व अनुसुचित जमातीच्या अपंग विद्यार्थ्याना सदर योजनेचा लाभ प्राथम्याने देय राहील.

 

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

1 thought on “पंडित दीनदयाल स्वयंम योजना 2024 | Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana”

Leave a comment