मराठी मध्ये कंटेंट रायटिंग करण्यासाठी 9 सोपे विषय | Content Writing Idea in Marathi

By Shubham Pawar

Published on:

Content Writing Idea in Marathi – जर आपण कंटेन्ट राइटिंग करण्यासाठी विषय शोधत असाल तर मित्र/मैत्रिणींनो तुम्ही योग्य ठिकाणी आलेले आहात. आजच्या घडीला खूप सारे लोक असे आहेत ज्यांना कंटेन्ट राइटिंग करण्याची इच्छा आहे पण त्यांना समजत नाही की कोणत्या विषयावर कंटेन्ट राइटिंग करावे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तुम्हाला जर एक उत्तम कंटेन्ट राईटर व्हायचे असेल तर तुम्हाला ज्या विषयी अतिशय सखोल आणि बरोबर माहिती आहे त्या विषयावर आपण कंटेन्ट राइटिंग करु शकाल. आज या लेखातून आपल्याला समजेल कोणकोणते विषय आहेत ज्यावर आपण कंटेंन्ट राईट करु शकतो. Content Writing Idea in Marathi

– Pragati Dasgude (Content Writer)

Content Writing Idea in Marathi

कन्टेंट राईटिंग करण्यासाठी विषय पुढिलप्रमाणे:- 

  • आरोग्य  – आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाचा घटक तो म्हणजे आरोग्य. आपले आरोग्य निरोगी रहावे असे प्रत्येक व्यक्तीला वाटते, त्यासाठी प्रत्येकजण Google मध्ये शोधत असतो की आपलं आरोग्य निरोगी कसे राहिल. त्यामुळे आरोग्य या विषयावर खुप सारे आर्टिकल आपण लिहू शकतो. त्यामध्ये सुद्धा व्यायाम, योगा, आयुर्वेदिक उपचार, पथ्य यांसारख्या विषयांवर आपण वेगवेगळ्या प्रकारे लेख लिहू शकतो.
  • प्रेमकथाहा विषय प्रत्येक व्यक्तीच्या आवडीचा आहे. अशी कोणतीही व्यक्ती नाही  जिला प्रेमकथा आवडत नसेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कथा आपल्या वयक्तिक जीवनात प्रेम निर्माण करतात. या विषयावर वाचन करणारे खुप वाचक अपल्याला आढळतात. जर आपण नियमीतपणे आपल्या वेबसाइट वर प्रेमकथा लेख लिहित असाल तर नक्कीच त्या वेबसाईट वर वाचक वाढत जातील. \”Content Writing Idea in Marathi\”
  • विनोदी कथा – विनोदी कथा वाचनारे खुप सारे लोक आहेत. आपल्या वयक्तिक जिवनातील ताण, तणाव, थकवा दूर करण्यासाठी हा विषय अतिशय उपयुक्त आहे. अशा प्रकारच्या कथा शोधणारे खुप सारे वाचक आहेत, ज्यांना विनोदी गोष्टी वाचायला आवडतात. अशा वाचकांसाठी नक्कीच आपण या विषयावर कथा लिहू शकता.

मराठी कंटेंट रायटिंग

  • ऐतिहासिक माहिती – ज्या व्यक्तींना इतिहासाची जास्तीत जास्त माहिती आहे त्यांच्यासाठी हा उत्तम विषय आहे. इतिहासामधील विविध व्यक्ती, घटना, ठिकाणे यांची माहिती आपण वाचकांपर्यंत पोहचवू शकता. खरंतर  आपल्या भारताचा इतिहास आपण इतर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी यासारखी दुसरी कोणतीही संधी नाही. आपण या प्रकारचे ऐतिहासिक लेख लिहू शकता. फार कमी कन्टेंट इतिहासावर लिहिले जातात त्यामुळे हा इतिहास प्रेमींसाठी अत्यंत योग्य विषय आहे.

 

  • शेतीपीके – आपण जर एक शेतकरी असाल तर तुम्ही शेतिपिकांविषयी खुप काही लिहू शकता. जसे की कोणते पीक केव्हा घ्यावे, त्यासाठी कोणते बियाणे चांगले आहे, त्या पीकाला कोणते खत वापरावे व किती प्रमाणात वापरावे, या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या लेखात लिहा. आजकाल पिकांवर खुप सारे रोग येत आहेत त्यावर काय विलाज करावा याविषयी ही लेख लिहू शकतात. प्रत्येक  शेतकरयासाठी हे लेख फायद्याचे ठरु शकतात. तुम्हाला जर शेतीविषयी चांगल्या प्रकारची माहिती असेल तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारचे लेख लिहा. {Content Writing Idea in Marathi}
  • ज्योतिषशास्त्र – आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या विषयावर काय लिहिणार तर खुप सारे जण असतील ज्यांना राशीभविष्य समजत असेल तर त्यामध्ये आपण दररोज सर्व राशीभविष्याविषयी माहिती लिहू शकाल. आपल्या इथे बरेचसे लोक आहेत ज्यांना आपल्या राशीत आज काय आहे हे जाणुन घेण्याची इच्छा असते.त्यामुळे यावर तुम्ही लेख लिहा.
  • कला – बरेचसे लोक हे कलाकारांविषयी लिहित आहेत पण कलेविषयी फार कमी सामग्री विकिपिडीयावर आहे. कला हा विषय तसा सोपा ही आहे आणि अवघड सुद्धा. ज्यांना एखादी कला आत्मसात करायची आहे पण, त्यांच्याजवळ वेगवेगळे कोर्स करण्यासाठी पैसे नाहीत असे लोक नेहमीच Google वर कला कोर्स विषयी पाहत असतात तर तुम्हाला एखादी कला अवगत असेल तर नक्कीच तुम्ही दररोज त्यावर लेख लिहून गरजू कलाकारांपर्यंत पोहचवू शकाल. [Content Writing Idea in Marathi]
  • फॅशन – प्रत्येक व्यक्तीला छान दिसायला आवडते आणि आपण छान दिसण्यासाठी गरज असते फॅशनची. फॅशन मुळे आपण आकर्षक दिसतो. फॅशन ही अशी गोष्ट आहे ज्यामध्ये वेळोवेळी बदल होत राहतो. या बदला बरोबर आपणही तो बदल आपल्या जीवनात करत असतो. जर तुम्हाला फॅशन बद्दल माहिती आणि आवड असेल तर तुम्ही नियमीत पणे त्यावर लेख लिहाल. खूप सारे ब्लॉगर आहेत जे फक्त फॅशन या विषयावर लेख लिहितात आणि ते त्यात यशस्वी सुद्धा झाले आहेत.
  • शिक्षण – शिक्षण क्षेत्रातील ज्ञान तुम्हाला असल्यास तुम्ही त्यावरही  खुप सारे लेख लिहिण्याची संधी आहे. आजकाल आपण पाहतो की बरेचसे विद्यार्थी हे इंटरनेट वरच वेगवेगळ्या प्रश्नांचे उत्तर शोधत असतात, त्यामुळे तुम्हाला ज्या विषयाचे ज्ञान आहे त्या संबंधी लेख लिहू शकता. जर आपण यावर विचार केलात तर खुप विषय आहेत उदाहरणार्थ मराठी, हिंदी, अर्थशास्र, भूगोल, राज्यशास्त्र, जीवशास्त्र इत्यादी.

आम्ही अशी आशा करतो की तुम्हाला नक्कीच या लेखातून समजले असेल की कन्टेंट राईटिंग साठी कोणत्या विषयावर लेखन करावे. वरीलपैकी ज्या विषयामध्ये आपणांस रुची  आणि ज्ञान आहे त्या विषयामध्ये कन्टेंट लिहू शकता. \’Content Writing Idea in Marathi\’

– Pragati Dasgude (Content Writer)

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

Leave a comment