रब्बी पीक विमा योजना 2024 ऑनलाईन अर्ज सुरू | Rabbi Pik Vima Yojana Maharashtra

By Shubham Pawar

Published on:

Rabbi Pik Vima Yojana Maharashtra – महाराष्ट्रात अतिवृष्टी, अवकाळी पाऊस व दुष्काळ या सारख्या नैसर्गिक आपत्तिंमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पीक विमा योजना अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना फायद्याची ठरली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rabbi Pik Vima Yojana Maharashtra

योजनेच्या प्रमुख बाबी

विमा पात्र शेतकरी कर्जदार, बिगर कर्जदार, भाडेपट्टीवर शेती करणारे ई. सर्व शेतकरी विमा संरक्षित बाबी: नैसर्गिक आपत्तींपासून अधिसूचित क्षेत्र पातळीवर विमा संरक्षण, नुकसान भरपाई राज्य शासनाद्वारे केलेल्या पीक कापणी प्रयोगाच्या आधारित. चालू वर्षांचे सरासरी उत्पन्न उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी नोंदले गेल्यास नुकसान भरपाई देय. \”Rabbi Pik Vima Yojana Maharashtra\”

पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, काढणी पश्चात नुकसान, अधिसूचित स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसानीस संरक्षण विमा हप्ता व सबसिडीः किफायतशीर विमा हप्ता. शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ताः विमा संरक्षित रक्कमेच्या 1.5%, नगदी व व्यापारी पिकांसाठी 5%.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी हा video पहा 

Video

पिकाच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे होणारे नुकसान (Mid season adversity) – क्षेत्र पातळीवर हंगामाच्या शेवटी देय नुकसान भरपाई – पीक पेरणीपासून ते काढणी पर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पुर क्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड रोगराई इत्यादि बाबीमुळे उत्पन्नात येणारी घट. [Rabbi Pik Vima Yojana Maharashtra]

अधिसूचित स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसानीस वैयक्तिक पातळीवर विमा संरक्षण (Localized Calamities) – गारपीट, मुत्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक अधिसूचित नैसर्गिक आपत्ती झाल्यामुळे होणारे अधिसूचित पिकाचे ठराविक क्षेत्रातील नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येईल.

काढणी पश्चात नुकसान (Post Harvest Losses) – ज्या पिकांची काढणीनंतर शेतात पसरवून अथवा पेंढया बांधून सुकवणी करणे आवश्यक असते अशा कापणी / काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकाचे काढणी नंतर 2 आठवड्याच्या आत (14 दिवस) गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस आणि बिगर मौसमी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निकषांचे अधीन राहून नुकसान भरपाई निश्चित केली जाईल, अधिसूचित स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसानीची सूचना 72 तासाच्या आत Crop Insurance App/ विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांका संबंधित बँक/ कृषि विभाग द्वारे द्यावी.

रब्बी पीक विमा योजना 2024-2025 महाराष्ट्र हायलाइट्स 

🔥 योजनेचे नाव प्रधानमंत्री फसल बिमा योजना 2024-25
🔥 लाँच केले सर्व राज्यांसाठी
🔥 योजनेचे उद्दिष्ट शेतीचे रक्षण करणे
🔥 लाभार्थी भारतातील सर्व शेतकरी
🔥 फायदे शेतकर्यांना नुकसान भरपाई प्रदान करणे
🔥 अर्ज प्रक्रिया  ऑनलाईन
🔥 पिक विमा नोंदणी लिंक  इथे क्लिक करा 

सहभाग प्रक्रिया

कर्जदार शेतकरी – प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकन्यांसाठी ऐच्छिक आहे तथापि कर्जदार शेतकन्यांना आपल्या अधिसूचित पिकांचा विमा करावयाचा नसेल त्यांनी योजनेत सहभागाच्या अंतिम दिनांकापूर्वी 7 दिवस संबंधीत बँक शाखेत विहित नमुन्यातील घोषणापत्र मरून देणे आवश्यक आहे. {Rabbi Pik Vima Yojana Maharashtra}

अन्यथा त्यांच्या अधिसूचित पिकांचा विमा संबंधीत बँकेमार्फत करण्यात येईल. त्याच प्रमाणे ज्या शेतकन्यांनी मागील हंगामात आपल्या पिकांचा विमा न करणेबाबत घोषणापत्र आपल्या बँक शाखेत दिले असल्यास, चालू हंगामात विमा करण्यासाठी विहीत नमुन्यातील घोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे.

बिगर कर्जदार शेतकरी – ऐच्छिक बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील विमा प्रस्ताव पत्रक पुर्णतः भरून आधार कार्ड, बैंक पासबुक व विमा हप्त्याची बैंक शाखेत वि. का.स. सेवा सोसायटी अथवा सी एस सी केंद्रात अंतिम मुदतीपूर्वी जमा करावी. शेतकरी स्वतः किंवा बँक मध्ये व सी. एस. सी. केंद्रमध्ये जाऊन विमा प्रस्ताव सादर करू शकतात भरू शकतात,

फॉर्म भरण्याची अंतिम तारीख : रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत ) – 30 नोव्हेंबर 2022 गहू (बागायत), हरभरा, रब्बी कांदा – 15 डिसेंबर 2022 आणि उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग – 31 मार्च, 2023

त्वरा करा !! बैंक शाखेत शेवटच्या दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी आपल्या पिकांचा विमा अंतिम मुदतीच्या आधीच होईल ह्याची खात्री करा. योजनेच्या अधिक महितीसाठी योजनेचे परिपत्रक व महाराष्ट्र शासनाची अधिसूचना वाचावी www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध. \”Rabbi Pik Vima Yojana Maharashtra\”

Official Website – PMFBY.GOV.IN

शासन निर्णय GR व पीक विमा चार्ट – GR DOWNLOAD

सामाईक क्षेत्राच शपथपत्र – DOWNLOAD

पीक पेरा PDF डाऊनलोड – DOWNLOAD

Ratio excel file download – DOWNLOAD

Tenant certificate format 100rs stamp paper वर घेणेDOWNLOAD

 

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

Leave a comment