उद्योगांना 10 लाखापर्यंत कर्ज अनुदान योजना PMFME Loan Scheme Online Apply

By Shubham Pawar

Published on:

नमस्कार मित्रांनो, आज आपण PMFME Loan प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजना 2023 ऑनलाइन रजिस्ट्रेशन लाभ पात्रता अर्ज विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल, आणि १० लाखां पर्यंत लोन मिळवायचे असेल, तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. चला तर मग मित्रांनो पाहुयात, काय आहे PMFME सूक्ष्म खाद्य उद्योग योजना, लाभार्थी पात्रता, आवश्यक कागदपत्रे, PMFME 2023 योजनेचे लाभ कोणते? प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजना महाराष्ट्र 2023 साठी अर्ज कसा करायचा? सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजना उद्योगांना 10 लाखापर्यंत कर्ज अनुदान योजना PMFME Loan Scheme प्रचार व प्रसिद्धी मोहीम सण 2023-24 हि योजना  केंद्र पुरस्कृत योजना आहे. यामध्ये केंद्र आणि राज्य निधी हा ६०:४० या प्रमाणात आहे. एक जिल्हा एक उत्पादन ठरवणार व त्याप्रमाणे त्या उद्योगांना लाभ मिळणार असे या योजनेचे स्वरूप असणार आहे.

समाविष्ट जिल्हे  – महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्हे [ मुंबई शहर व मुंबई उपनगर समाविष्ट ]

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य योजनेचा उद्देश्य

 • सध्या कार्यरत असलेले व नवीन स्थापित होणारे वैयत्किक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग तसेच शेतकरी उत्पादक गट / संस्था / कंपनी , स्वयं सहाय्य्यता गट व सहकारी उत्पादक संस्था यांची पत मर्यादा वाढविणे .
 • उत्पादनांचे ब्रॅंडिंग व विपणन अधिक बळकट करून त्यांना संघटित अशा पुरवठा साखळीशी जोडणे.
 • महाराष्ट्रातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना PMFME Loan Scheme औपचारिक रचनेमध्ये आणण्यासाठी सहाय्य करणे.
 • सामाईक सेवा जसे कि साठवणूक , प्रक्रिया सुविधा , पॅकेजिंग , विपणन तसेच उद्योग वाढीसाठीचा सर्वकष सेवांचा सूक्ष्म उद्योगांना अधिक लाभ मिळवून देणे.
 • अन्न प्रक्रिया क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण यावर भर देणे.
 • PMFME Loan Scheme सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांनी व्यवसायिक व तांत्रिक सहाय्याचा अधिकाधिक लाभ घ्यावा यासाठी प्रयन्त करणे.

पात्र प्रकल्प

 • एक जिल्हा एक उत्पादन [ ODOP ] नवीन तसेच कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग.
 • एक जिल्हा एक उत्पादन व्यतिरिक्त [NON ODOP ] नवीन प्रक्रिया उद्योग व कार्यरत उद्योगांचे विस्तारीकरण व स्तर वृद्धी करणं.
 • फळे , भाजीपाला , अन्नधान्य , कडधान्य तेलबिया , मसाला पिके , दुग्ध व किरकोळ उत्पादने , PMFME Loan Scheme बेकरी तसेच स्नॅक आधारित उत्पादने.

PMFME Loan लाभार्थी निवडचे निकष

वैयक्तिक लाभ :

 1. PMFME Loan Scheme उद्योगामध्ये १० पेक्षा कमी कामगार कार्यरत असावेत.
 2. अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे पेक्षा जास्त असावे.
 3. एका कुटुंबातील एकच व्यक्ती पात्र असेल.
 4. सदर उद्योगाला औपचारिक दर्जा प्राप्त करून देण्याची तयारी असावी.
 5. पात्र प्रकल्प किंमतीच्या किमान १० टक्के लाभार्थी हिस्सा देण्याची व उर्वरित बँक कर्ज मुदत घेण्याची तयारी असावी.

गट लाभार्थी :

 1. ODOP तसेच ODOP साठीचे प्रस्ताव सहाय्य्यसाठी पात्र.
 2. वार्षिक उत्पादन व अनुभवाची अट नाही.
 3. पात्र प्रकल्प किमतीच्या किमान १० टक्के प्रवर्तकाचे योगदान.
 4. पात्र प्रकल्प खर्चा मध्ये जमीन / भाडे किंवा भाडे तत्त्वावरील कामाच्या शेडची , किंमत सामाविष्ट नाहीत.
 5. पात्र प्रकल्प खर्चामध्ये तांत्रिक PMFME Loan Scheme नागरी काम ३० टक्के पेक्षा जास्त नसावे.

पात्र लाभार्थी :

PMFME वैयत्किक  लाभ :

वैयत्किक मालकी / भागीदारी , शेतकरी उत्पादक संस्था [ FPO ] शेतकरी उत्पादन कंपनी सहकारी  संस्था स्वयं सहाय्यता गट [ SHG ] गैर सरकारी संस्था [ NGO ] खाजगी कंपनी [ Pvt. Ltd. Companies ] इत्यादी.

गट लाभ :

शेतकरी उत्पादक संस्था / शेतकरी उत्पादक कंपनी , सहकारी संस्था , स्वयंसहाय्यता गट आणि त्यांचे फेडरेशन [ उदा. MSRLM-CLF , MAVIM-VLF , CMRC , NULM-ALF ] शासकीय संस्था.

आता संपूर्ण महाराष्ट्रात फिरा फक्त ११०० रु. मध्ये, एसटी ची योजना MSRTC Aavdel Tithe Pravas Yojana

PMFME आर्थिक मापदंड

 1. वैयक्तिक लाभासाठी पात्र प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के व जास्तीत जास्त १० लाखांपर्यंत बँक कर्जाच्या निगडित अनुदान लाभ.
 2. मार्केटिंग व ब्रॅंडिंग साठी एकूण खर्चाच्या ५० टक्के रक्कम कमाल निधी मर्यादा केंद्र शासना मार्फत विहित करण्यात येईल.
 3. स्वंयसहाय्यता गटातील सदस्यांना बीज भांडवल रु ४०,००० /- प्रति सदस्य ग्रामिण व शहरी गटांसाठी.
 4. सामाईक पायाभूत सुविधा पात्र प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के अनुदान कमाल सहाय्यमर्यादा ३ कोटी.
 5. मूल्य साखली पात्र प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के अनुदान कमाल सहाय्य्य मर्यादा ३ कोटी क्षमता बांधणी प्रशिक्षण १०० टक्के अनुदान.

अर्ज करण्याची पद्धत :

वैयक्तिक  लाभार्थी :

www.pmfme.mofpi.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करावा.

गट लाभार्थी :

www.pmfme.mofpi.gov.in या संकेत स्थळावर अर्ज करावा.

Conclusion

मित्रांनो, या पोस्टमध्ये आम्ही PMFME Loan प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेबद्दल माहिती दिली आहे जसे की – प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजना आहे , त्याचे फायदे , त्याचे उद्दिष्टे , PMFME LOAN योजनेसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया , आवश्यक कागदपत्रे इ . मला आशा आहे की तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही ही पोस्ट इतर लोकांसोबत शेअर कराल. धन्यवाद !

 

I am a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Developer and Owner/founder of Marathi Corner. 6 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: मित्रा, कॉपी करायचं नसतं !! शेअर करायचं असतं !!