Digital Rupee in Marathi – सर्वांसाठी उद्या 30 नोव्हेंबर रोजी येणार डिजिटल रुपया. देशात ऑनलाइन पेमेंटचा वापर वाढतच आहे. तरीही प्रत्यक्ष कॅश ठेवावीच लागते. मात्र, आता खिशात कॅश ठेवण्याचीही गरज नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्वांसाठी डिजिटल रुपयांच्या चाचणीसाठी पायलट प्रोजेक्टची मोठी घोषणा केली आहे. दि.1 डिसेंबरला किरकोळ डिजिटल रुपयाला (e₹-R) लाँच करण्यात येणार आहे. या डिजिटल रुपयामुळे आपल्या देशाला एक नवीन चालना मिळणार आहे आणि भरपूर असे फायदे सुद्धा होणार आहेत तर ते फायदे नक्की काय आहेत हे आपण या लेखांमध्ये पाहूयात.
Digital Rupee in Marathi
E-R डिजिटल टोकनच्या स्वरुपात राहणार आहे. सध्या असलेल्या नोटा आणि नाण्यांच्याच मूल्यवगति डिजिटल रुपया जारी करण्यात येणार आहे. ऑक्टोबरमध्ये थोक डिजिटल रुपयाचा पायलट प्रोजेक्ट सुरु करण्यात आला होता. आरबीआयने दि. 31 ऑक्टोबरला किरकोळ क्षेत्रासाठी महिनाभरात त्याचे लाँचिंग करण्याची माहिती दिली होती. Digital Rupee in Marathi
₹ R डिजिटल रुपया या प्रकल्पात सहभागी होणारे ग्राहक आणि व्यापायांच्या सीयूजीमध्ये निवडक ठिकाणी उपलब्ध राहणार आहे.
कोणत्या बँकांमध्ये मिळेल ०1-R
एसबीआय, आयसीआयसीआय बँक, येस बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँक या चार बँकांचा प्रारंभीच्या टप्प्यात समावेश राहणार आहे. दुसया टप्प्यात बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्र बँक यांचा समावेश होईल. Digital Rupee in Marathi
या शहरांचा समावेश होणार
- पहिल्या टप्प्यात मुंबई, नवी दिल्ली, बंगळुरु, भुवनेश्वर इत्यादी शहरांचा समावेश आहे.
- त्यानंतर अहमदाबाद, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, इंदूर, कोची, लखनौ, पाटणा, शिमला इत्यादी शहर जोडण्यात येतील. टप्याटप्प्याने आणखी शहरे व बँका जोडण्यात येतील.
डिजिटल रुपयाचा फायदा काय?
- अनोळखी व्यक्तीला माहिती शेअर करण्याची गरज पडणार नाही.
- रोख रकमेवरील अवलंबन कमी होईल.
- प्रत्यक्ष चलनी नोटा व नाण्यांच्या छपाईचा खर्च कमी होईल,
- एका व्यक्तीकडून दुसयाला किंवा दुकानदारांना पैसे पाठविता येईल.
- क्यूआर कोड स्कॅन करूनही पैसे देता येतील.
- जगभरातील 60 देशांच्या मध्यवर्ती बँकांनी भारताच्या e-R रुपयांमध्ये रुची दाखविली आहे.
- काही देशांमध्ये चाचणीदेखील सुरु करण्यात आली आहे. Digital Rupee in Marathi
Digital Rupee in Marathi
इंटरनेटच्या माध्यमातून बिटकॉईन किंवा वन कॉईनसारखी आभासी चलने अस्तित्वात आल्यानंतर कोणत्याही दोन व्यक्तींत बँक किंवा कोणत्याही आर्थिक संस्थेच्या मध्यस्थीशिवाय खरेदी-विक्री व्यवहार शक्य करणारी डिजिटल रुपया ही आता वास्तवात येऊ घातलेली कल्पना आहे. आपल्या खात्यात असलेल्या पैशांचे डिजिटल रुपयात रूपांतर करता येते. कोणत्याही बँकेच्या खात्याशिवाय डिजिटल रुपयाद्वारे दैनंदिन व्यवहार करता येतील.
तर मित्रांनो अशा प्रकारे डिजिटल रुपयाचा भरपूर असा फायदा आहे तर हे उद्यापासून आपल्या व्यवहारामध्ये येणार आहे तर नक्की सर्वांनी वापरावा आणि आपले फायदे करून घ्यावेत. \”Digital Rupee in Marathi\”