पोकरा योजना महाराष्ट्र 2023 | Pocra Yojana Maharashtra 2023

By Shubham Pawar

Updated on:

Pocra Yojana Maharashtra 2023 – नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प याच्या अंतर्गत पोकरा ही योजना येते. ही पोकरा योजना शेतकऱ्यांसाठी बनवली आहे. पोखरा योजनेत मार्फत शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. शेतकऱ्यांसाठी अतिशय उत्तम योजना आहे. यामध्ये किती टक्के अनुदान दिले जाते व यामध्ये कुठल्या योजना समाविष्ट आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.

Pocra Yojana Maharashtra 2023

ही योजना गरजू शेतकऱ्यांना व या योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. पोकरा योजने अंतर्गत यामध्ये 15 जिल्हे समाविष्ट करण्यात आले आहेत.

हे जिल्हे पुढील प्रमाणे आहेत : जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद, जालना, लातूर, अमरावती. {Pocra Yojana Maharashtra 2023}

या प्रकल्पामध्ये साधारणपणे 155-156 या तालुक्यांचा समावेश आहे. साधारणतः 3755 ग्रामपंचायतीं या योजनेमध्ये येतात या योजनेचा लाभ साधारणपणे 17 लाख शेतकऱ्यांना होतो. भारतरत्न नानाजी देशमुख यांचे नाव या प्रकल्पाला दिलेले आहे. नानाजी देशमुख यांनी कृषी विभागामध्ये अतिशय महत्त्वाची कामगिरी केलेली आहे.

जर एखादा अल्पभूधारक शेतकरी असेल तर त्याला पाण्यासाठी विहिरीची योजना दिली जाते. जर तो शेतकरी इच्छुक असेल की त्याला शेततळं करायचा आहे, जेणेकरून तिन्ही हंगामामध्ये त्या शेतकऱ्याला पीक घेता येईल अशा शेतकऱ्यांसाठी शेततळे देण्याची योजना आहे. साठवलेलं पाणी शेतात न्यायचं असेल तर त्यासाठी लागणारी पाईप लाईन यासाठीची ही योजना यामध्ये आहे.

पाणी वाचवण्यासाठी जे तुषार सिंचन व ठिबक सिंचन असते ते सुद्धा या प्रकल्पाच्या माध्यमातून मिळू शकते. या प्रकल्पातून सामाजिक लाभ सुद्धा मिळू शकतो जसे की, शेतकऱ्यांना उत्पादन काढल्यानंतर साठवणुकीची कुठलीच व्यवस्था नसल्यामुळे बाजार कमी असतानाही ते उत्पादन विकावं लागतं त्यासाठी या योजनेमार्फत गोडाऊनची ही सुविधा योजना देते.ही शेतकऱ्यांसाठी अतिशय उत्तम योजना आहे. “Pocra Yojana Maharashtra 2023”

पोकरा योजना महाराष्ट्र 2023

पोखरा योजनेसाठी एक समिती नेमण्यात आलेली आहे. त्या समितीचे नाव ग्राम कृषी संजीवनी समितीची ( VCRMC) संरचना असे आहे. या समितीमध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रगत शेतकरी, अनुसूचित जातीतील एक सदस्य, महिला बचत गट प्रतिनिधी असे कार्यकारी सदस्य या समितीमध्ये असतात. तसेच अकार्यकारी समितीमध्ये कृषी सहाय्यक, ग्रामसेवक इत्यादी अधिकारी यामध्ये समाविष्ट असतात. Pocra Yojana Maharashtra 2023

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अशाप्रकारे कार्यपद्धती करावी
www.mahapocra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने यामध्ये नोंदणी करून पोखरा योजनेसाठी अर्ज करू शकता.

पोखरा योजनेचा अर्ज करण्यासाठी पुढील प्रमाणे कागदपत्रे लागतात

  •  अर्जदाराचा सातबारा व आठ अ चा उतारा
  • अर्जदार अनुसूचित जातीतील असल्यास त्याचा पुरावा
  • अर्जदार अपंग असल्यास त्याचा पुरावा

पोखरा योजनेमध्ये पुढील प्रमाणे घटक येतात

  •  हवामान अनुकूल कृषी परिस्थिति प्रोत्साहनअनुदान देणे.यामध्ये शंभर टक्के अनुदान दिले जाते.
  •  हवामान अनुकूल कृषी पद्धती यामध्ये शंभर टक्के अनुदान दिले जाते.
  •  जमिनीमध्ये कर्ब ग्रहणाचे प्रमाण वाढविणे यामध्ये शंभर टक्के अनुदान दिले जाते.
  •  क्षारपड व चोपण जमिनीचे व्यवस्थापन( खारपाणीग्रस्त गावे) संरक्षक शेती यामध्ये 100% व काही ठिकाणी 50% अनुदान दिले जाते. Pocra Yojana Maharashtra 2023
  • एकात्मिक शेती पद्धती यामध्ये 50% अनुदान दिले जाते.
  •  जमीन आरोग्य सुधारणे यामध्ये 50% अनुदान दिले जाते.
  •  पाण्याचा कार्यक्षम व शाश्वत पद्धतीने वापर करणे यामध्ये 50% अनुदान दिले जाते.
  •  पाणी साठवण संरचनांची निर्मिती यामध्ये 100 % व काही ठिकाणी 50% अनुदान दिले जाते.
  • सूक्ष्म सिंचन यामध्ये 50% अनुदान दिले जाते.
  •  काढणीपक्षात व्यवस्थापन व हवामान अनुकूल मूल्य साखळी प्रोत्साहन. यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन देणे. यामध्ये शेतकरी गटासाठी 100% अनुदान दिले जाते व भाडेतत्त्वावर कृषी अवजार केंद्र- सुविधा निर्मिती यासाठी 50 % अनुदान दिले जाते.
  •  शेतमाल वृद्धी साठी हवामान अनुकूल उद्यानमुख मूल्य साखळ्यांचे बळकटीकरण यामध्ये 50 % अनुदान दिले जाते. हवामान अनुकूल बियाणे वितरण प्रणाली कार्यक्षमता वृद्धी त्यामध्ये 50% अनुदान दिले जाते. बियाणे हबसाठी पायाभूत सुविधांचा विकास करणे यामध्ये 50% अनुदान दिले जाते. [Pocra Yojana Maharashtra 2023]

पोकरा योजनेमध्ये कोणकोणते घटक येतात याबद्दल आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगितली आहे. पोकरा योजनेबद्दल ही माहिती तुम्हाला समजली असेल अशी आशा आहे.

PKVY म्हणजे काय आहे?

2015 मध्ये सुरू करण्यात आलेली परमपरगत कृषी विकास योजना (PKVY), केंद्र प्रायोजित योजना (CSS), शाश्वत शेतीवरील राष्ट्रीय मिशन (NMSA) अंतर्गत मृदा आरोग्य व्यवस्थापन (SHM) चा विस्तारित घटक आहे.

पोकरा प्रकल्पाची उद्दिष्टे काय आहेत?

PoCRA चे प्रकल्प विकास उद्दिष्ट (PDO) ‘महाराष्ट्रातील निवडक जिल्ह्यांमध्ये हवामानातील लवचिकता आणि अल्पभूधारक शेती प्रणालीची नफा वाढवणे’ हे आहे.

This article has been written by Shubham Pawar from Pune Maharashtra. Shubham Pawar is a famous Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Developer and Owner/founder of Marathi Corner. 5 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment