नमस्कार मित्रांनो, आज आपण मुख्यमंत्री वयोश्री योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो तुम्हांला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. ही योजना नक्की काय आहे कोण या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतील. पात्रता काय आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे Mukhyamantri Vayoshri Yojana Apply Online या योजनेचा लाभ कसा घेता येईल याविषयी आपण सर्व माहिती या पोस्ट मध्ये जाणून घेणार आहोत.
राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करणेकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात “Mukhyamantri Vayoshri Yojana” सुरु करण्यात आली आहे.
सद्यस्थितीत 65 वर्षे व त्यावरील अंदाजित एकूण 10-12 टक्के ज्येष्ठ नागरिक (१.२५ – १.५० कोटी) आहेत. त्यापैकी मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या ना कोणत्या अपंगत्वाचा सामना करावा लागतो. सदर बाब विचारात घेवून केंद्र शासनाने दारिद्रय रेषेखालील संबंधित दिव्यांग/दुर्बलताग्रस्त ज्येष्ठ नागरिकांसाठी शारिरीक अक्षमतेनुसार सहाय्य साधने/उपकरणे पुरविण्याची वयोश्री योजना सुरु केली आहे.
Mukhyamantri Vayoshri Yojana GR
ज्येष्ठ नागरिकांना सक्रिय जीवनात आणण्यासाठी आणि गतिशीलता, संप्रेषण आणि मोकळेपणाने जीवन जगता यावे, यासाठी उपकरणे प्रदान करून तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक तथा कौटुंबिक स्वास्थ अबाधित ठेवून वयोमानानुसार अनुकूल समाज निर्माण करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनेच्या धर्तीवर राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना “राज्यात राबवण्यात आली आहे. राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करणेकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र” राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करणेकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एकवेळ एकरकमी रु. 3000/- पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण (D.B.T.) प्रणालीद्वारे देण्यात येणार आहेत.
Overview of Mukhyamantri Vayoshri Yojana Apply Online
योजनेचे नाव | मुख्यमंत्री वयोश्री योजना |
कोणी सुरु केली | महाराष्ट्र शासन व केंद्र शासन |
लाभार्थी | ज्येष्ठ नागरिक |
लाभ | 3000/- रु. |
अर्ज प्रक्रिया | सुरु नाही |
वेबसाईट | Online |
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे स्वरूप
सदर Mukhyamantri Vayoshri Yojana Apply Online योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थतता/+ दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने/ उपकरणे खरेदी करता येतील.
उदा:-
- चष्मा
- श्रवणयंत्ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर
- फोल्डिंग वॉकर
- कमोड खुर्ची
- नि-ब्रेस
- लंबर बेल्ट
- सर्वाइकल कॉलर इ.
Mukhyamantri Vayoshri Yojana लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष
- सदर योजनेतंर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक (ज्या नागरिकांनी दि.३१.१२.२०२३ अखेर पर्यन्त वयाची ६५ वर्षे पूर्ण केली असतील, असे नागरिक पात्र समजण्यात येतील). ज्या व्यक्तींचे वय ६५ वर्षे आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तींकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा आणि आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे. जर लाभार्थ्यांकडे आधार कार्ड नसेल, आणि स्वतंत्र ओळख दस्तऐवज असतील, तर ते ओळख पटविण्यासाठी स्वीकारार्ह असेल.
- लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य/केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतो.
- उत्पन्न मर्यादा – लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु.२ लाखाच्या आत असावे. (Mukhyamantri Vayoshri Yojana Apply Online) याबाबतचे लाभार्थ्याने स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील.
- सदर व्यक्तीने मागील ३ वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे. याबाबतचे लाभार्थ्याने स्वयं घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील. मात्र दोषपूर्ण/अकार्यक्षम उपकरणे इत्यादींच्या बदलीला अपवाद म्हणून परवानगी दिली जाऊ शकते.
- पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तीक आधार संलग्न बचत खात्यात रु. ३०००/- थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे वितरीत झाल्यावर सदर योजनेअंतर्गत विहीत केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनःस्वास्थ केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे देयक (Invoice) प्रमाणपत्र ३० दिवसांच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांच्याकडून प्रमाणित करुन संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम (CPSU Mukhyamantri Vayoshri Yojana Apply Online) संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर ३० दिवसांच्या आत अपलोड करणे आवश्यक राहील. अन्यथा लाभार्थ्यांकडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल.
- निवड / निश्चित केलेल्या जिल्हयात, लाभार्थ्यांच्या संख्येपैकी ३० टक्के महिला असतील.
मुख्यमंत्री वयोश्री योजना आवश्यक कागदपत्रे
- आधारकार्ड / मतदान कार्ड
- राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स
- पासपोर्ट आकाराचे २ फोटो
- स्वयं-घोषणापत्र
- शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे Mukhyamantri Vayoshri Yojana Apply Online
Mukhyamantri Vayoshri Yojana Apply Online
पोर्टल तयार करणे :- राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या धर्तीवर सदर योजनेचे नवीन स्वतंत्र पोर्टल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून विकसित करण्यात येईल.
नोंदणीकृत लाभार्थ्यांची कागदपत्रे तपासणी, आधार प्रमाणीकरण, हमीपत्र, बँक लिकेज इत्यादी तपासून शिबिरा करिता नेमून दिलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्यांमार्फत प्रमाणित करून घेण्यात येईल व सदरील डाटा ऑनलाइन पद्धतीने व ऑफलाईन पद्धतीने जतन करण्यात येईल.
(ii) मूल्यमापन पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांना E-Token (Mukhyamantri Vayoshri Yojana Apply Online) प्रदान करण्यात येईल. तसेच ऑफलाईन पद्धती करिता नोंदणी पावती प्रदान करण्यात येईल.
(iii) जिल्हा / महापालिका स्तरावरील मूल्यमापन कार्य पूर्ण पार पाडल्यानंतर सदरील पात्र लाभार्थ्यांची माहिती ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीने आयुक्त, समाज कल्याण, पुणे / सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे PSU द्वारे सादर करण्यात येईल.
(iv) पात्र लाभार्थ्यांची यादी, नाव, फोटो व लिंग तसेच नाव, बँक खाते, आधार क्रमांक, बीपीएल कार्ड क्रमांक इ. तपशीलवार माहिती आयुक्तालयामार्फत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल.
(v) तक्रार निवारण, अभिप्राय इ. सेवा प्रदान करण्यासाठी विभागाद्वारे स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात येईल. (IVR System, Toll free क्रमांक इ.)
Conclusion
मित्रांनो , ह्या पोस्ट मध्ये आम्ही Mukhyamantri Vayoshri Yojana Apply Online माहिती दिली आहे जसे की योजना काय होती, कोण लाभ घेऊ शकतो, कसा लाभ घेया येईल, मला आशा आहे कि तुम्हांला हि पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत शेअर कराल. धन्यवाद !
Vayoshri yojana suru zali aahe ka? asel tar link pathava