ज्येष्ठ नागरिकांना 3 हजार रु. अर्ज | Mukhyamantri Vayoshri Yojana 2024

By Shubham Pawar

Updated on:

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 – नमस्कार मित्रांनो, आज आपण मुख्यमंत्री वयोश्री योजने विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो तुम्हांला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. ही योजना नक्की काय आहे? कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतील? सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेचा लाभ कसा घेता येईल? याविषयी आपण सर्व माहिती आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mukhyamantri Vayoshri Yojana

राज्यातल्या 65 वर्षांवरच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकार मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करणार आहे. दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या 65 वर्षांवरच्या नागरिकांना याचा लाभ होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे.

या योजनेअंतर्गत ज्येष्ठांमधलं अपंगत्व आणि अशक्तपणा निराकरणासाठी आवश्यक उपकरणं खरेदी केली जातील. यासाठी आरोग्य विभाग ज्येष्ठ नागरिकांचं सर्वेक्षण तसंच तपासणी करुन पात्र लाभार्थी ठरवले जातील. पात्र लाभार्थ्यांना 3 हजार रुपये एकरकमी बँक खात्यात जमा केले जातील.

राज्यातल्या सर्व जिल्ह्यातल्या सुमारे 15 लाख ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळेल, असा सरकारचा अंदाज आहे.  यासाठी आरोग्य विभागांमार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रिनींग करण्यात येऊन लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल आणि पात्र लाभार्थींना तीन हजार रुपये एकरकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.

या योजनेसाठी 480 कोटी रुपयांच्या खर्चास देखील या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यात सध्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या सव्वा ते दिड कोटींच्या दरम्यान आहे. त्यामध्ये अपंगत्व आणि मानसिक अस्वास्थ्याने पिडीत सुमारे 15 लाख ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळेल. केंद्राची राष्ट्रीय वयोश्री योजना राज्यातील निवडक जिल्ह्यात राबवण्यात येते. मात्र ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राज्यातील सर्व जिल्ह्यात राबवण्यात येईल.

Mukhyamantri Vayoshri Yojana Overview

योजनेचे नाव  Mukhyamantri Vayoshri Yojana
कोणी सुरु केली  महाराष्ट्र शासन व केंद्र शासन
लाभार्थी  ज्येष्ठ नागरिक
उद्दिष्ट  शेतकऱ्यांना सोलर पंप पुरवणे
अर्ज प्रक्रिया  सुरु नाही
वेबसाईट  Online

Mukhyamantri Vayoshri योजनेची ठळक वैशिष्ट्ये

  • पात्र ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रकट होणाऱ्या अपंगत्व/अशक्तपणाच्या मर्यादेनुसार उपकरणांचे मोफत वितरण.
  • एकाच व्यक्तीमध्ये अनेक अपंगत्व/अशक्तता दिसून आल्यास, प्रत्येक अपंगत्व/अशक्तपणाच्या संदर्भात सहाय्यक उपकरणे दिली जातील.
  • आर्टिफिशियल लिम्ब्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन (ALIMCO) मदत आणि सहाय्यक जिवंत उपकरणांची एक वर्ष मोफत देखभाल करेल.
  • उपायुक्त/जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत प्रत्येक जिल्ह्यातील लाभार्थ्यांची ओळख राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेश प्रशासनाद्वारे केली जाईल.
  • शक्यतो, प्रत्येक जिल्ह्यातील 30% लाभार्थी महिला असतील.
  • राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश प्रशासन/जिल्हास्तरीय समिती NSAP किंवा राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या इतर कोणत्याही योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्तीवेतन प्राप्त करणाऱ्या बीपीएल लाभार्थींचा डेटा बीपीएल श्रेणीतील ज्येष्ठ नागरिकांच्या ओळखीसाठी वापरू शकते.
  • उपकरणे कॅम्प मोडमध्ये वितरित केली जातील.

मुख्यमंत्री वयोश्री योजना पात्रता

ज्येष्ठ नागरिक, बीपीएल श्रेणीतील आणि वयाशी संबंधित कोणत्याही अपंगत्व/अशक्तपणाने ग्रस्त आहेत. कमी दृष्टी, श्रवणदोष, दात गळणे आणि लोकोमोटर अपंगत्व अशा सहाय्यक-जीवित उपकरणांसह प्रदान केले जातील जे प्रकट झालेल्या अपंगत्व/अशक्तपणावर मात करून, त्यांच्या शारीरिक कार्यांमध्ये सामान्यता आणू शकतील. या योजनेचा लाभ देशभरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना मिळणे अपेक्षित आहे.

Mukhyamantri Vayoshri Yojana समर्थित उपकरणे

  • चालण्याची काठी
  • कोपर क्रचेस
  • वॉकर / क्रॅचेस
  • ट्रायपॉड्स/क्वाडपॉड्स
  • श्रवणयंत्र
  • व्हीलचेअर
  • कृत्रिम दात
  • चष्मा

ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील. मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून लाभ देणार

  • राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेस Mukhyamantri Vayoshri Yojana राज्य मंत्रिमंडळाची मान्यता.
  • दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादेत 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ होणार.
  • ज्येष्ठांमध्ये अपंगत्व, अशक्तपणा याचे निराकारण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे तसेच मानसिक स्वास्थ संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्रे व योगोपचार केंद्रांद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येणार.
  • आरोग्य विभागांमार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रिनींग करण्यात येऊन लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल आणि पात्र लाभार्थीना तीन हजार रुपये एकरकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार.
  • केंद्राची राष्ट्रीय वयोश्री योजना Mukhyamantri Vayoshri Yojana राज्यातील निवडक जिल्ह्यात राबवण्यात येते. मात्र मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबवण्यात येईल.
  • या योजनेसाठी 480 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता.

शासनाची बाल संगोपन योजना 2024 दर महा 1100 /- रू.

Conclusion

मित्रांनो, ह्या पोस्ट मध्ये आम्ही मुख्यमंत्री वयोश्री योजना Mukhyamantri Vayoshri Yojana या योजनेबद्दल माहिती दिली आहे जसे की योजना काय होती, योजनेची ठळक वैशिष्ट्ये कोणती, योजनेची पात्रता काय आहे, कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतील? सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेचा लाभ कसा घेता येईल, मला आशा आहे कि तुम्हांला हि पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत शेअर कराल.

धन्यवाद !

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

Leave a comment