Monkeypox Virus in Marathi – मंकीपॉक्स हा रोग फार वेगाने पसरत आहे – मंकीपॉक्स हा दक्षिण आफ्रिकेत आढळणारा आजार आहे – मात्र आता 15 दिवसांत 15 देशा मध्ये मंकीपॉक्स पोहचला – आज आपण मंकीपॉक्स विषयी जाणून घेऊ.
मंकीपॉक्स म्हणजे काय ?
मंकीपॉक्स हा रोग मंकीपॉक्स विषाणूमुळे होतो – हा रोग पहिल्यांदा एका अपहरण केलेल्या माकडात आढळला होता.
कसा पसरतो?
हा विषाणू, त्वचा, श्वासनलिका, डोळे, नाक किंवा तोंडाच्या वाटे शरीरात प्रवेश करतो – माकडं, उंदीर, खार, यांना हा आजार झाला असेल आणि त्यांच्याशी थेट संपर्क आला – तर माणसाच्या शरीरात विषाणू जाऊ शकतो – तसंच एखाद्या रुग्णाने वापरलेले कपडे किंवा चादर यांच्यावाटेही हा रोग पसरतो.
मंकीपॉक्सची लक्षणं कोणती ?
सुरुवातीच्या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, सूज, पाठदुखी, स्नायूंमध्ये वेदना यां लक्षणांचा समावेश आहे – ताप चढला की शरीरावर पुरळ येतं. त्याची सुरुवात चेहऱ्यापासून होते.
हा संसर्ग आपोआप 14 ते 21 दिवसात बरा होतो – मात्र सध्या आफ्रिकेत या रोगामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याचंही समोर आलं आहे.
या रोगाचा उपचार काय ?
या रोगासाठी कोणताच उपचार नाही. रोगाचा प्रसार कमी करणे हाच एक उपाय आहे.
मंकीपॉक्स विषीयीची माहिती महत्वाची आहे आपण थोडासा वेळ काढून इतरांना देखील शेअर करा