आदर्श गाव योजना महाराष्ट्र | Adarsh Gaon Yojana Maharashtra

By Shubham Pawar

Published on:

Adarsh Gaon Yojana Maharashtra – आदर्श गाव योजना हा सरकारच्या नेतृत्वाखालील उपक्रम आहे ज्याचा उद्देश गृहनिर्माण, आरोग्य सेवा, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी यासारख्या मूलभूत सुविधा पुरवून ग्रामीण भागातील जीवनमान सुधारणे आहे.

ग्रामीण भागातील गरिबी, बेरोजगारी आणि मुलभूत सुविधांचा अभाव या समस्यांचे निराकरण करण्याचा या योजनेचा उद्देश आहे. हा कार्यक्रम स्थानिक सरकार विविध सरकारी संस्था आणि ना-नफा संस्थांच्या सहकार्याने राबवतो. ग्रामीण विकासाला चालना देणे आणि ग्रामीण भागातील रहिवाशांचे जीवनमान सुधारणे हे आदर्श गाव योजनेचे अंतिम ध्येय आहे.  Adarsh Gaon Yojana Maharashtra

आदर्श गाव योजना महाराष्ट्र

ग्रामीण भागातल्या गावांच्या विकासासाठी आदर्श गाव योजना तयार केलेली आहे या योजनेमागील उद्देश असा आहे की ज्या गावांमध्ये सोयी सुविधा नाहीत अशा गावांचा विकास करण्यासाठी या योजनेचा उपक्रम सरकारने सुरू केलेला आहे. हा उपक्रम 11 ऑक्टोंबर 2014 पासून सुरू करण्यात आला आहे जयप्रकाश नारायण यांच्या जन्मदिवसापासून भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे.

आदर्श गाव योजनेचे प्रेरणास्त्रोत मोहनदास करमचंद गांधी म्हणजेच महात्मा गांधी हे आहेत आयुष्य गाव योजना म्हणजे नक्की काय हे तुम्हाला आम्ही सोप्या भाषेत या लेखातून सांगणार आहोत आदर्श गाव योजना महाराष्ट्र बद्दल तुम्हाला जर संपूर्ण माहिती हवी असेल तर तुम्ही हा संपूर्ण लेक वाचवा. “Adarsh Gaon Yojana Maharashtra”

Adarsh Gaon Yojana Maharashtra

आपण जाणून घेऊयात की आदर्श गाव म्हणजे काय?

“आदर्श गाव म्हणजे ज्या गावांमध्ये लोक अंधविश्वासू नाहीत, लोक विकासाच्या मार्गावर आहेत अशा गावाला आदर्श गाव असे म्हटले जाते.”

आदर्श गाव योजना महाराष्ट्र – सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात की आदर्श गाव योजना काय आहे. या योजनेद्वारे ग्रामीण भागातील विविध खेड्यांमध्ये विकास घडवण्यासाठी ही योजना तयार केली आहे. विविध गावांमध्ये जागरूकता येण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम ही योजना थोर स्वातंत्र्य सेनानी अच्युतराव पटवर्धन यांच्या प्रेरणेतून 1992 साली सुरू केली.

आदर्श गाव योजनेच्या माध्यमातून सर्वप्रथम महाराष्ट्र मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार गाव हे महाराष्ट्रातील सर्वप्रथम आदर्श गाव आहे या गावाला 15 ऑगस्ट 1994 रोजी आदर्श गाव म्हणून सन्मानित केले आहे. हिवरे बाजार गाव हे पहिले अतिशय दुष्काळी गाव होते. तिथे शेतीसाठी सुद्धा पाणी पुरत पुरत नसे.

त्यामुळे येथील नागरिकांची स्थिती अतिशय खराब होती त्यांना रोजगार नसे. या गावातील सरपंच पोपटराव पवार यांनी गावाची परिस्थिती बदलली हे एक आशियातील सर्वात श्रीमंत गाव आहे पंधराशे संख्या असणाऱ्या या गावात 95% साक्षर आहेत आदर्श गाव योजना ही गावांच्या विकासासाठी आर्थिक मदत करते. Adarsh Gaon Yojana Maharashtra

आदर्श गाव योजना

आदर्श गाव योजनेची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे :- 

  • कुटुंबांना गरिबीपासून बाहेर काढण्यासाठी मदत करते.
  • आरोग्य विषयी वेगवेगळे शिबिरे घेतले जातात.
  • नागरिकांच्या वेगवेगळ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सभा भरवल्या जातात.
  • गाव कचरा मुक्त होण्यासाठी वेगवेगळ्या योजना तयार केल्या जातात.
  • पाणी जपून वापरावे याबाबत माहिती दिली जाते.
  • गावामध्ये विकास होण्यासाठी शिक्षण, शेती, गृह उद्योग, नोकरी, उद्योगाच्या विविध संधी याबाबत मार्गदर्शन केले जाते.
  • गाव स्वच्छतेबाबत विविध उपक्रम राबवले जातात.

नागरिकांनी पर्यावरणाविषयी जागरूक राहण्यासाठी उपक्रम असतात त्यामध्ये सार्वजनिक शौचालय, रस्ते अशा इत्यादी प्रकारच्या गोष्टीवर भर दिला जातो. {Adarsh Gaon Yojana Maharashtra}

Adarsh Gaon Yojana

या योजनेद्वारे ची कामे केली जातात ती सर्व कामे शासन ग्रामपंचायतच्या हस्ते सुपूर्त करतात. साधारणपणे पाच गावांना प्राधान्य देतात पाच वर्षांमध्ये शंभर गावे निवडण्यासाठी दिली जातात. यातून 25 गावांचा प्रस्ताव विभागाकडे जलसंधारणासाठी दिला जातो.

प्रत्येक गावाचे नियोजन हे जिल्ह्याच्या कलेक्टर द्वारे केले जातात. आदर्श गाव योजनेचा प्रमुख उद्देश हा गावामध्ये वेगवेगळ्या सोई सुविधा उपलब्ध करून देणे आहे जसे की पिण्यासाठी योग्य पाणी उपलब्ध करून देणे, गावामध्ये रस्ते उपलब्ध करून देणे, शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देणे, भविष्याकरिता वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करणे, गावामध्ये दवाखाने उपलब्ध करून देणे, तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि सर्वात मुख्य म्हणजे गावामध्ये स्वच्छता ठेवणे. या सर्व गोष्टींचा समावेश आदर्श गाव योजनेच्या अंतर्गत होतो. [Adarsh Gaon Yojana Maharashtra]

आदर्श गाव योजनेसाठी अर्ज कसा करावा?

ज्या गावाला आदर्श गाव योजनेमध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे त्या गावाने ग्रामसेवक व सरपंच यांच्या एकत्रित स्वाक्षरीने जिल्हा कृषी अधिकाऱ्याकडे जमा करावे. त्यासोबत जे कागदपत्र व प्रमाणपत्र यासाठी लागतात तेही सुपूर्त करावे..

मित्र-मैत्रिणींनो तुम्हाला आदर्श गाव योजने विषयीचीही माहिती समजली असेल अशी आशा आहे. हा लेख संपूर्ण वाचल्याबद्दल धन्यवाद. (Adarsh Gaon Yojana Maharashtra)

आदर्श गाव म्हणजे काय?

ग्रामसभेच्या माध्यमातून गावातच सर्व प्रकरणे निकाली काढली जातात आणि लोक अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाहीत असे एक आदर्श गाव आहे.

आदर्श ग्राम योजनेचा अर्थ काय?

SAGY अंतर्गत, प्रत्येक संसद सदस्य ग्रामपंचायत दत्तक घेतो आणि पायाभूत सुविधा तसेच सामाजिक विकासाला महत्त्व देऊन तिच्या सर्वांगीण प्रगतीचे मार्गदर्शन करतो.

This article has been written by Shubham Pawar from Pune Maharashtra. Shubham Pawar is a famous Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Developer and Owner/founder of Marathi Corner. 5 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment