मिलिटरी भरती ट्रेनिंग, विद्यार्थांना महिना १०,००० मिळणार, लगेच करा अर्ज Military Bharti Traning 2024

By Shubham Pawar

Published on:

नमस्कार मित्रांनो , आज आपण Military Bharti Traning आणि त्यात विद्यार्थ्यांना महिना १०,००० मिळणार ह्या अर्ज विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो जर तुम्ही मिलिटरी, सैनिक भरती च्या ट्रेनिंग साठी इच्छुक असाल त्यात विद्यार्थ्यांना महिना १०,००० मिळणार ह्या संधीचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असल्यास तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. चला तर मग मित्रांनो पाहुयात, काय आहे Military Bharti Traning चे स्वरूप, अटी – नियमावली, पात्रता, निवडप्रक्रिया आणि ह्यासाठी अर्ज कसा करायचा? सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता इतर मागासवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 2024-25 या वर्षामध्ये मिलिटरी भरतीच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑफलाईन व अनिवासी पद्धतीने महाज्योती मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरीता इच्छुक विद्यार्थ्याकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

 1. प्रशिक्षणासाठी एकुण मंजूर विद्यार्थी संख्या – 1500
 2.  प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने
 3.  विद्यावेतन 10,000/- प्रतिमाह ( 75% उपस्थिती असल्यास)
 4.  आकस्मिक निधी 12,000/- (एकवेळ)

योजनेच्या लाभासाठी पात्रता

 1.  विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा/ असावी.
 2.  विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा/ असावी.
 3. विद्यार्थी नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा/ असावी.
 4. विद्यार्थी 12 वी वर्गात प्रवेश घेतलेला असावा किंवा 12 वी वर्ग उत्तीर्ण केलेला असावा.
 5.  महाज्योतीच्या कोणत्याही योजनांचा कोणत्याही स्वरुपात लाभ घेतलेल्या विद्यार्थ्याने चालू योजनेसाठी पुन्हा अर्ज करु नये, त्यांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
 6. विद्यार्थ्याची अंतिम निवड छाननी परिक्षेद्वारे करण्यात येईल.
 7. विद्यार्थ्याचे किमान वय 17 वर्ष व कमाल वय 21 वर्ष पेक्षा जास्त असू नये.
 8.  वैद्यकीय अर्हता :-
  उंची :- कमीत कमी 157 से.मी (पुरुष)

कमीत कमी 152 से.मी (महिला)

छाती :- कमीत कमी 77 से.मी (दीर्घ श्वास घेतल्यानंतर 82 से.मी) केवळ पुरुषांकरिता

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा – click here 

प्रशिक्षणाकरिता द्यावयाचे अनिवार्य वैद्यकीय मानके :-

 • उमेदवाराचे शरीर मजबूत आणि चांगले मानसिक आरोग्य असावे.
 • छातीचा विकास कमीत कमी 5 से.मी विस्तारित असावा.
 • प्रत्येक कानाने सामान्य ऐकणे आणि दोन्ही डोळ्यांमध्ये चांगली दुरबीन दृष्टि असणे
  आवश्यक आहे. त्याला प्रत्येक डोळ्याने 6/6 अंतराचा दृष्टिकोन वाचता आला पाहिजे.
  (सैन्य भरती साठी रंग दृष्टी चाचणी CP-III असावी.)
 • नैसर्गिक निरोगी हिरड्या आणि दात पुरेशा प्रमाणात असणे आवश्यक आहे
  (म्हणजे किमान 14 दंत बिंदु)
 • हाडांची विकृती, हायड्रोसेल आणि व्हॅरिकोकल किवा मुळव्याध यांसारखे रोग नसावेत,
 • लाल आणि हिरवा रंग ओळखला पाहिजे.
  (उपरोक्त सर्व कागदपत्रांची छाननी व अनिवार्य मानकांची तपासणी करुनच
  प्रशिक्षणाकरिता प्रवेश दिल्या जाईल, याची उमेवारांनी नोंद घ्यावी)

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा – click here 

लाभार्थी निवड प्रक्रिया

 1. महाज्योती मार्फत लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन
  पद्धतीने अर्ज करावा.
 2. प्राप्त अर्जाची निकषानुसार छाननी करण्यात येईल.
 3. छाननीमध्ये पात्र विद्यार्थ्यांची मिलिटरी भरती पूर्व परीक्षेच्या धर्तीवर व अभ्यासक्रमानुसार
  चाळणी परीक्षा घेण्यात येईल.
 4. चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांकनानुसार मेरीटच्या आधारे व आरक्षित जागांच्या प्रमाणात पात्र विद्यार्थ्यांची यादी व प्रतीक्षा यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

प्रशिक्षणाचे स्वरूप :-

 1. विद्याथ्यांना Military Bharti परीक्षा पूर्व प्रशिक्षण तसेच लेखी व शारीरिक परीक्षांचे सुधारित
  अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येईल.
 2. सदर प्रशिक्षणाचा कालावधी हा 6 महिन्यांचा असेल.
 3. प्रशिक्षण अनिवासी स्वरुपाचे असेल.
 4. प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरुपाचे देण्यात येईल.

आरक्षण

सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे :-

अ.क्र. सामाजिक प्रगल्भ टक्केवारी निवड करावयाच्या लाभार्थ्याची संख्या
1 इतर मागास वर्ग (OBC) 59% 885
2 निरधीसुचीत जमाती – अ (VJ-A ) 10% 150
3 भटक्या जमाती – ब (NT-B) 8% 120
4 भटक्या जमाती – क  (NT-C) 11% 165
5 भटक्या जमाती –  ड (NT-D) 6% 90
6 विशेष मागास प्रवर्ग (SBC) 6% 90
  एकूण 100% 1500

समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे :-

 1.  अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे.
 2. प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • जातीचे प्रमाणपत्र (Cast Certificate)
 • रहिवासी दाखला (Domicile Certificate)
 • वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer)
 • विद्यार्थी 12 वी वर्गात प्रवेश घेतलेला असावा किंवा 12 वी वर्ग उत्तीर्ण केलेला असावा.
 • पासबूक किंवा रद्द केलेला धनादेश (आधारकार्ड लिंक असावा)
 • अनाथ असल्यास दाखला

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा – click here 

अर्ज कसा करावा

 •  महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील \”Application for Military Bharti 2024-25 Training\” यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.
 • अर्जासोबत तपशीलात नमुद सर्व कागदपत्रे स्वाक्षांकीत करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून
  जोडावे.

अटी व शर्ती

 • अर्ज करण्याचा अंतिम दि. 28/05/2024 राहील.
 • पोस्टाने किंवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
 • जाहिरात रह करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे याबाबतचे सर्व अधिकार आहे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचे राहतील.
 •  प्रशिक्षणाकरीता निवड झालेले विद्यार्थी ज्या दिनांकास संस्थेत प्रशिक्षणाकरीता रुजु होतील त्या दिनांकापासुन त्यांना महाज्योतीच्या धोरणानुसार विद्यावेतन लागू होईल. तथापि प्रत्यक्ष प्रशिक्षणास 75% उपस्थिती असणाऱ्यांनाच विद्यावेतन देय राहिल.
 • कोणत्याही माध्यमातुन व अंतीम निवड प्रक्रियेच्या तसेच प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर
  उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास किंवा या
  पूर्वी सदर योजनेचा लाभ घेतल्याचे आढळल्यास तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या \’सारथी \’या
  कडून योजनेचा लाभ घेतला असल्यास त्यांची निवड रद्द करण्यात येईल.
 • महाज्योतीच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतला असल्यास विद्यार्थी या प्रशिक्षणास अपात्र ठरेल.
 • नमुद निकषांची पूर्तता न करणाऱ्या, अपूर्ण अर्ज सादर करण्याऱ्या किंवा अर्जासोबत कागदपत्रे
  न सादर करणाऱ्या विद्यार्थ्याचा अर्ज बाद करण्यात येईल.
 • विद्यार्थाचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे.
 • अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre वर संर्पक करावा संर्पक क्र. 0712-2870120/21
  ई-मेल आयडी : mahajyotimpsc21@gmail.com

conclusion

मित्रांनो, ह्या पोस्ट मध्ये आम्ही मिलिटरी भरती च्या अर्जा संबधी माहिती दिली आहे जसे कि , Military Bharti प्रक्रियेचे स्वरूप काय आहे , निवडप्रक्रिया कश्या प्रकारे होणार आहे, त्यासाठी काय अटी – नियमावली असणार आहे , आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत, अर्ज ऑनलाईन पद्धतीने कश्या प्रकारे करता येईल इत्यादी.

मला अशा आहे कि तुम्हाला हि पोस्ट आवडली असेल आणि ह्या पोस्ट चा तुम्हाला नक्की फायदा होईल म्हणूनच तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत शेअर कराल.

धन्यवाद !

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

Leave a comment