या १४ जिल्ह्यात आता रेशन धान्याऐवजी पैसे मिळणार, लवकर हा फॉर्म भरून द्या | Ration Card New GR

By Shubham Pawar

Published on:

Ration Card New GR – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या संदर्भ क्र. 1 येथील दि. 24-07-2015 च्या शासन निर्णयान्वये राज्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपिएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांप्रमाणे (प्रतिमाह प्रति सदस्य 5 किलो अन्नधान्य, ₹200 प्रति किलो गहू व ₹3.00 प्रति किलो तांदुळ या दराने) अन्नधान्याचा लाभ देण्यात येत होता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Card New GR

सदर योजनेकरिता आवश्यक असलेल्या अन्नधान्याची खरेदी केंद्र शासनाच्या Non NFSA योजनेंतर्गत गहू ₹22.00 प्रति किलो व तांदुळ ₹23.00 प्रति किलो या दराने करण्यात येत होती. तथापि, सदर योजनेंतर्गत यापुढे गहू व तांदुळ उपलब्ध होणार नसल्याचे भारतीय अन्न महामंडळाने त्यांच्या अनुक्रमे दि. 31-05-2022 व दि. 19-2022 च्या पत्रान्वये कळविले आहे. \”Ration Card New GR\”

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी 👉👉  येथे क्लिक करा 👈👈

मित्रांनो, राज्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपिएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे जानेवारी, 2024 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी 150 रु. इतक्या रोख रकमेच्या थेट हस्तांतरणाची (Direct Benefit Transfer-DBT) योजना कार्यान्वित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात आली आहे.

तसेच प्रतिवर्षी किमान आधारभूत किमतीत होणाऱ्या वाढीनुसार केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या Cash Transfer of Food Subsidy Rules, 2015 मधील तरतुदीनुसार प्रतिमाह प्रतिलाभार्थी सुधारित वाढीव रोख रक्कम (पुढील दशकाच्या पूर्णांकात थेट हस्तांतरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. \’Ration Card New GR\’

14 जिल्ह्यात आता रेशन धान्याऐवजी पैसे मिळणार

दि. 24-07-2015 च्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आलेल्या निकषांनुसार शेतकरी योजनेच्या लाभासाठी Ration Card Management System RCMS वर नोंद असलेल्या पात्र शिधापत्रिकाधारकांकडून DBT साठी आवश्यक असलेला बँक खात्याचा तपशिल सोबत जोडलेल्या नमुन्यात ऑफलाईन / ऑनलाईन भरुन घेण्यात येणार आहे. शिधापत्रिकाधारकांनी अर्जासोबत उचित कागदपत्रांची/प्रमाणपत्रांची पूर्तता करणे आवश्यक राहणार आहे. {Ration Card New GR}

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी 👉👉  येथे क्लिक करा 👈👈

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

Leave a comment