Pradhan Mantri Awas Yojana Online Apply Marathi: प्रधानमंत्री आवास योजना ही घरकुलाची केंद्र पुरस्कृत योजना असून पूर्वीच्या इंदिरा आवास योजनेचे रूपांतर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मध्ये करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यात या योजनेची अंमलबजावणी सन 2016-17 या वित्तीय वर्षांपासून करण्यात येत आहे. या योजनेसाठी केंद्र व राज्य हिस्सा अनुक्रमे 60:40 इतका आहे. प्रधानमंत्री आवास योजना केंद्र पुरस्कृत योजना असून सन 1995-96 पासून स्वतंत्रपणे राबविली जाते.
ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील बेघर/कच्चे घर असलेल्या कुटूंबांना घरकुल बांधकामासाठी अर्थसहाय्य देणे हा योजनेचा उद्देश आहे. लाभार्थ्यांची निवड ग्रामपंचायतीमार्फत केली जाते. ग्रामपंचायतीमार्फत तयार केलेली कायम प्रतिक्षा यादी ग्रामपंचायतीच्या सुचना फलकावर प्रसिध्द केली जाते.
प्रधानमंत्री आवास योजना मुळे अनेकांना घरांसाठी अनुदान मिळत आहे. या योजनेबद्दल सर्व माहिती, पात्रता, अटी कागदपत्रे, अनुदान, घराचे क्षेत्रफळ व लाभार्थी निवड कशी केली जाईल अशी आणखी माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.
Pradhan Mantri Awas Yojana Maharashtra
अटी:
- योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी दारिद्रय रेषेखालील असावा.
- कायम प्रतिक्षा यादीत त्याचे नाव असावे.
- घरकुल बांधकामासाठी स्वत:ची जागा असावी.
- 25 चौ. मी. क्षेत्रफळ घर बांधण्यासाठी आवश्यक आहे.
अशा सर्वसाधारण अटी आहेत.
वरील अटींची पुर्तता करणाऱ्या व कायम प्रतिक्षा यादीत समाविष्ट न झालेल्या कुटूंबांनी ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.
सन 2002 मध्ये झालेल्या दारिद्रय रेषेच्या सर्व्हेनुसार सन 2007-08 ते सन 2014-15 मध्ये लाभार्थ्यांची निवड करून घरकुलांचा लाभ देण्यात आला आहे. सन 2011 च्या आर्थिक सामाजिक व जात सर्वेक्षणाची माहितीच्या आधारे सन 2015-16 पासून पुढील वर्षांसाठी लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे.
लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी रू.95,000/- इतके अर्थसहाय दिले जाते. घरकुल अनुदाना व्यतिरिक्त महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत 90/95 दिवसांच्या अकुशल मजूरीच्या स्वरूपात अर्थसहाय्य दिले जाते. \’Pradhan Mantri Awas Yojana Maharashtra 2024\’
प्रधानमंत्री आवास योजना कागदपत्रे
- ओळखपत्र (नोकरी करणाऱ्यांसाठी)
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र (नोकरी करणाऱ्यांसाठी)
- मालमत्ता दस्तऐवज (नोकरी करण्याऱ्यांसाठी)
- व्यवसाय पत्ता पुरावा (व्यापार करण्याऱ्यांसाठी)
- उत्पन्नाचा पुरावा (व्यापार करण्याऱ्यांसाठी)
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- अर्जदाराचे पक्के घर नसल्याचे प्रतिज्ञापत्र लिहून द्यावे लागेल
- गृहनिर्माण संस्थेने प्रदान केलेली एनओसी
- वांशिक गट प्रमाणपत्र
- स्वच्छ भारत मिशन क्रमांक
- मनरेगा लाभार्थ्यांचा जॉब कार्ड क्रमांक
- पगार प्रमाणपत्र
नोट: कागदपत्रांमध्ये काही कागदपत्रे नोकरी करणाऱ्यांसाठी व व्यापार करणाऱ्यांसाठी दिलेले आहे. बाकीचे कागदपत्रे पण नोकरी, व्यापार व तसेच सर्वांसाठी आवश्यक आहे. \”Pradhan Mantri Awas Yojana Online Apply Marathi\”
प्रधानमंत्री आवास योजना अनुदान रक्कम व क्षेत्रफळ
रक्कम:
केंद्र शासनाने दिनांक 1 एप्रिल 2016 पासून नवीन मंजूर घरकुलाकरिता:
- साधारण क्षेत्र – रुपये 1,20,000/-
- नक्षलग्रस्त व डोंगराळ क्षेत्राकरिता – रुपये 1,30,000/-
इतकी प्रती घरकुल किंमत निश्चित केलेली आहे.
तसेच शासन निर्णय दि. 30 मे 2015 नुसार घरकुलाच्या कामातील 90 मनुष्यदिन (अकुशल कामे) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत घेतली जातात. Pradhan Mantri Awas Yojana Online Apply Marathi
घरकुलाचे क्षेत्रफळ:
प्रधानमंत्री आवास योजना- (ग्रामीण) मध्ये प्रामुख्याने पूर्वीच्या इंदिरा आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे क्षेत्रफळ 20 चौ.मीटर वरून वाढवून 25 चौ. मीटर एवढे करण्यात आले आहे. एवढेच घरकुलासाठी क्षेत्रफळ असणे आवश्यक आहे.
Pradhan Mantri Awas Yojana निवड व वितरण पद्धत
योजनेसाठी लाभार्थी निवड व वितरण पद्धत खालील प्रमाणे आहे👇👇
लाभार्थी निवड:
लाभार्थ्यांची निवड सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण-2011 मधील माहितीच्या आधारे करण्यात येते. योग्य पद्धतीने ही निवड प्रक्रिया करून लाभार्थ्यांना अनुदान दिले जाते व त्यामुळे लाभार्थ्यांला घर बांधण्यासाठी योजने मार्फत अनुदान मिळते.
अनुदान वितरण पध्दत:
प्रधानमंत्री आवास योजना- (ग्रामीण) अंतर्गत केंद्र व राज्य हिस्सा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये PFMS (Public Financial Management System) प्रणालीद्वारे थेट वितरित केला जातो. ह्या ऑनलाईन प्रणाली माध्यमातून योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळतो.
अशा प्रकारे प्रधानमंत्री आवास योजने द्वारे लाभार्थी निवड व अनुदान वितरण केले जाते. \’Pradhan Mantri Awas Yojana Online Apply Marathi\’
प्रधानमंत्री आवास योजना साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी हा विडियो नक्की बघा 👇👇 Pradhan Mantri Awas Yojana Online Apply Marathi