म्हाडा लॉटरी 2023 मिळणार हक्कांच घर PM आवास योजना MHADA lottery 2023 Mumbai Online Apply

By Shubham Pawar

Published on:

नमस्कार मित्रांनो, आज आपण म्हाडा लॉटरी योजना 2023 ऑनलाइन रजिस्ट्रेशन लाभ पात्रता अर्ज विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो म्हाडा लॉटरी Mhada Home Scheme तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल, आणि चांगले घर मिळवायचे असेल, तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. चला तर मग मित्रांनो पाहुयात, काय आहे म्हाडा लॉटरी होम योजना, लाभार्थी पात्रता, आवश्यक कागदपत्रे, MHADA Scheme Maharashtra योजनेचे लाभ कोणते? MHADA lottery 2023 योजना महाराष्ट्र 2023 साठी अर्ज कसा करायचा? सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

म्हाडा लॉटरी 2023 मिळणार हक्कांच घर

 • नोंदणीसाठी व अर्ज भरण्यासाठी आवश्यक बाबी :

मोबाईल क्रमांक [ आधार क्रमांकाशी संलग्न व ई-मेल आय डी ]

 • अर्जदारांना नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे :

जाहिरात प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे कागदपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ मिळणार नाही त्यामुळे अर्जपात्रतेसाठी आवश्यक पुढील कागदपत्रे तयार ठेवावीत.

 1. आधार कार्ड
 2. पॅन कार्ड
 3. अधिवास / १५ वर्ष महाराष्ट्रातील वास्तव्याचा दाखला अथवा संबधीत शासकीय यंत्रणेसाठी अधिवास प्रमाणपत्र मिळवण्यासाठी केलेल्या अर्जाची पोचपावती.
 4. उत्पन्नाचा पुरावा म्हणून दि ०१ / ०४ / २०२१ ते ३१ / ०३ / २०२२ [ उत्पन्नाच्या पुराव्यासाठी आयकर विवरण पत्र अथवा तहसीलदार यांनी दिलेला वार्षिक उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरला जाईल ] गट निहाय उत्पन्न मर्यादा सोबत तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे आहे.
 5. अर्जदार ज्या प्रवर्गासाठी अर्ज करत आहे त्या वर्गात मोडत असल्याबाबत म्हाडाने निश्चित केलेले संबधित सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले प्रामाणपत्र .

[ अधिक माहितीसाठी संकेस्थळवरील माहिती पुस्तिका पाहावी ]

प्रधानमंत्री आवास योजना [ PMAY ] [ शहरी ] योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदारांची अटी व शर्ती

 1.  अर्जदार व अर्जदाराच्या कुटुंबाच्या नावे भारतात कुठेही पक्के घर नसावे.
 2. अर्ज करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत नोंदणी असणे अथवा करणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत नोंदणी केलेली असल्यास नोंदणी क्रमांक अर्जात नमूद करणे आवश्यक आहे. तथापी नोंदणी नसल्यास सोडतीमध्ये यशस्वी झाल्यानंतर नोंदणी करणे बंधनकारक आहे. सदर नोंदणी करण्याची प्रक्रिया मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ स्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या संस्थेद्वारे नोंदणी करण्याची तजविज करण्यात आली आहे त्या करिता नियमानुसार लागणारे शुल्क विजेत्या लाभधारकास भरणा करणे क्रमप्राप्त आहे याची कृपया नोंद घ्यावी.
 3. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या सदनिकांसाठी अर्जदार, कुटुंबामध्ये पती -पत्नी व अविवाहित मुले यांचा समावेश असेल तसेच सदनिकांसाठी कुटुंबातील कर्त्या महिलेच्या किंवा कुटुंबातील कर्ता पुरुष व महिला यांच्या संयुक्त नावे वितरण करण्यात येईल.
 4. दिनांक ०१/०४/२०२१ ते ३१/०३/२०२२ या कालावधीतील अर्जदाराचे स्वतःचे व त्यांची पत्नी / पती यांचे दोघांचे मिळून उत्पन्न वार्षिक ३,००,०००/- (रुपये तीन लाख पेक्षा कमी असावे. “कौंटुबिक वार्षिक उत्पन्नम्हणजे अर्जदाराचे स्वतःचे व त्यांची पत्नी / पती यांचे दोघांचे मिळून वार्षिक नोकरीद्वारे अथवा उद्योगधंद्यापासून, जीवितार्थाचे सर्वसाधारण साधन म्हणून उत्पन्न. दिनांक ०९/०४/२०२१ ते ३१/०३/२०२२ या कालावधीत झालेल्या उत्पन्नाच्या प्राप्तीवरून आयकर विवरण पत्र अथवा तहसिलदाराचा उत्पन्नाचा दाखला उत्पन्न पुरावा म्हणून सादर करणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही स्वरुपाचा उत्पन्न स्तोत्राबाबतची कागदपत्रे दाखले / पुरावे / प्रतिज्ञापत्र / वेतन प्रमाणपत्र इ. ग्राह्य धरली जाणार नाहीत.

उत्पन्न मर्यादा खालीलप्रमाणे प्रधानमंत्री आवास योजने व्यतिरिक्त इतर योजनांसाठी

क्र

उत्पन्न गटसुधारित कमाल उत्पन्न मर्यादा [ रुपये वार्षिक ]
मुंबई महानगर क्षेत्र MMR , पुणे महानगर क्षेत्र PMRDA , नागपूर महानगर क्षेत्र NMRDA, नागपूर सुधार प्रन्यास NIT प्रदेश तसेच १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली स्थानिक स्वराज्य संस्था
अत्यल्प उत्पन्न गट [ EWS ]रु ६,००,००० /- पर्यंत
अल्प उत्पन्न गट [ LIG ]रु ९,००,००० /- पर्यंत
मध्यम उत्पन्न गट [ MIG ]रु १२,००,००० /- पर्यंत
उच्च  उत्पन्न गट [ HIG ]कमाल मर्यादा नाही
  

 

टिप : उपरोक्त ४ ही उत्पन्न गटासाठी किमान मर्यादा निश्चित करण्यात आलेली नसली तरी,

कमाल मर्यादा नाही.

१) अत्यल्प (EWS) उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प व अल्प उत्पन्न (LIG) गटासाठी अर्ज करू शकतात. २) अल्प (LIG) उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प व मध्यम (MIG) उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.

३) मध्यम (MIG) उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम (MIG) व उच्च (HIG) उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.

४) उच्च (HIG) उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ उच्च (HIG) उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.

(अधिक माहितीसाठी संकेतस्थळावरील माहिती पुस्तिका पहावी).

 

 Mhada Yojana म्हाडा सदनिका

 1. सोडतीमधील यशस्वी अर्जदाराला सदनिकेची रक्कम भरून घेण्यासाठी तात्पुरते देकार पत्र दिल्यानंतर विहित मुदतीमध्ये सदनिकेच्या रकमेचा भरणा करणे आवश्यक असेल,
 2. लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार आवश्यक मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क भरणे आवश्यक असेल.
 3. सदनिकेचा ताबा घेण्यापूर्वी सदनिकेचे सेवा शुल्क भुई भाडे इत्यादी करांचा भरणा करावा लागेल.

(क) विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) अंतर्गत प्राप्त विखुरलेल्या सदनिका

१. सोडतीमधील यशस्वी अर्जदाराता सदनिकेची रक्कम भरुन घेण्यासाठी तात्पुरते देकार पत्र दिल्यानंतर विहित मुदतीमध्ये सदनिकेच्या रकमेचा भरणा करणे आवश्यक असेल,

२. सदर सदनिका विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) अंतर्गत विकासकाकडून प्राप्त झाल्या असून सदर सदनिकांचे काही सेवा शुल्क आकार, मालमत्ता कर, विद्युत देयक इत्यादी प्रलंबित रक्कमांचा समावेश सदनिकांच्या विक्री किंमतीमध्ये करण्यात आलेला नाही. सदर करांचा भरणा संबंधित सदनिकाधारकांनी त्या-त्या विभाग / विकासक / सोसायटी यांना सदनिकेचा ताबा घेण्यापूर्वी करणे आवश्यक आहे.

३. या व्यतिरीक्त यशस्वी अर्जदारांना महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार इतर आवश्यक करांचा भरणा करणे बंधनकारक असेल,

(ड) विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) अंतर्गत बांधकाम चालू असलेल्या सदनिका

१. इमारत क्र. १९. स्वगृह को. ऑप. हौ. सोसा., लोकमान्य नगर, दादर, मुंबई या विकास प्रकल्पातील सदनिका विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) अंतर्गत प्राप्त विकासकाकडून प्राप्त झाल्या असून सदनिकांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. योजनेचे बांधकाम अंदाजित माहे डिसेंबर २०२४ या अखेर पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. सदर सदनिकांचे सेवा शुल्क आकार, मालमत्ता कर, विद्युत देयक इत्यादी रक्कमांचा समावेश सदनिकांच्या विक्री किंमतीमध्ये करण्यात आलेला नाही. सदर करांचा भरणा संबंधित सदनिकाधारकांनी त्या-त्या विभाग / विकासक / सोसायटी यांना सदनिकेचा ताबा घेण्यापूर्वी करणे आवश्यक आहे.

२. अर्जदारांना सदनिकेची रक्कम टप्पेनिहाय भरणे आवश्यक असून सविस्तर माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेमध्ये देण्यात आली आहे.

३. यशस्वी अर्जदारांना महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार इतर आवश्यक करांचा भरणा करणे बंधनकारक असेल.

विकास नियंत्रण नियमावली ३३ (७) अंतर्गत प्राप्त सदनिका

१. सोडतीमधील यशस्वी अर्जदाराता सदनिकेची रक्कम भरुन घेण्यासाठी तात्पुरते देकार पत्र दिल्यानंतर विहित मुदतीमध्ये सदनिकेच्या रकमेचा भरणा करणे आवश्यक असेल,

२. सदर सदनिका विकास नियंत्रण नियमावली ३३ (७) अंतर्गत विकासकाकडून प्राप्त झाल्या असून सदर सदनिकांचे काही सेवा शुल्क आकार, मालमत्ता कर विद्युत देयक इत्यादी प्रलंबित रकमांचा समावेश सदनिकांच्या विक्री किंमतीमध्ये करण्यात आलेला नाही. सदर करांचा भरणा संबंधित सदनिकाधारकांनी त्या-त्या विभाग / विकासक / सोसायटी यांना सदनिकेचा ताबा घेण्यापूर्वी करणे आवश्यक राहील. ३. या व्यतिरीक्त यशस्वी अर्जदारांना महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार इतर आवश्यक करांचा भरणा करणे बंधनकारक असेल.

(ई) मुंबई मंडळाअंतर्गत विखुरलेल्या (वेगवेगळ्या ठिकाणी) सदनिका विक्री योजना

१. सदर सदनिका “जशा आहे त्या स्थितीमध्ये” विक्रीकरिता उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सदर सदनिका विखुरलेल्या असून या सदनिकांबाबत कोणताही दावा प्रलंबित असल्यास वितरण / ताबा झालेला असल्यास पडताळणी अंती योग्य निर्णय घेण्यात येईल व सदरचा निर्णय अर्जदारास

बंधनकारक असेल तसेच सदनिकांचे काही प्रलंबित शुल्क, कर इत्यादी बाकी असल्यास अर्जदारांना परस्पर भरणे बंधनकारक असेल या करांचा सदनिका विक्री किंमतीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही.

२. या व्यतिरीक्त यशस्वी अर्जदारांना महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार इतर आवश्यक करांचा भरणा करणे बंधनकारक असेल.

म्हाडा लॉटरी योजना पात्रता निकष सर्वसाधारण सूचना

1 ] अर्ज नोंदणी करावयाच्या दिवशी अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

2 ] अर्जदार किंवा त्यांची पत्नी / पती किंवा त्यांची अज्ञान मुले यांच्या नावे मातकी तत्वावर भाडे खरेदी पध्दतीवर अथवा नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थेचा सदस्य म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) हद्दीत म्हाडाने वितरीत केलेला, शासनाने वितरीत केलेला किंवा खाजगीरीत्या संपादित केलेला निवासी गाळा / निवासी भुखंड नसावा, (प्रधानमंत्री आवास योजनेसाठी भारतात कुठेही कुटूंबाच्या नावे पक्के घर नसावे)

3 ] गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र शासन, शासन निर्णय क्र. याचिका – २०१२/ प्र.क्र.६६/निप दिनांक ११ सप्टेंबर, २०१९ अन्वये शासकीय गृहनिर्माण योजनेतील घर धारण करित असलेल्या व्यक्तीस त्या किंवा अन्य कोणत्याही शासकीय गृहनिर्माण योजनेत दुसरे घर अनुज्ञेय नाही याबाबत तरतूद करण्यात आली आहे “राज्यातील एखादी व्यक्ती किंवा तिचे कुटूंबातील कोणत्याही व्यक्ती राज्यातील कोणत्याही भागात महाराष्ट्र शासनाच्या किंवा शासन अधिनस्त कोणत्याही प्राधिकरण / स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणत्याही शासकीय गृहनिर्माण योजनेत त्याला मालकी तत्वावर वाटप झालेले/वितरीत झालेले घर/ सदनिका धारण करत असेल अथवा केंद्र शासन / राज्य शासनाकडून अनुदान प्राप्त गृहनिर्माण / आवास योजने लाभ घेतला असेल तर यापुढे अशा व्यक्ती किंवा त्याच्या/तिच्या कुटूंबियांना राज्यामध्ये कोठेही राज्य शासनाच्या / शासन अधिनस्त प्राधिकरण / स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, त्या किंवा अन्य कोणत्याही गृहनिर्माण योजनेत शासकीय योजनेतील दुसरे घर / सदनिका / भुखंड अनुज्ञेय नाही,

पात्रता निकष – सर्व साधारण सूचना

 • अर्जदाराने जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून मागील सलग २० वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये अर्जदाराचे किमान १५ वर्षे सलग वास्तव्य असावे.

 

 • राखीव प्रवर्गाच्या पात्रतेसाठी तपशिलवार संकेतस्थळावर जारी केलेल्या माहिती पुस्तिकेमध्ये देण्यात आली आहे. • अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, भटक्या जमाती व विमुक्त जातीच्या प्रवर्गातील लाभार्थीना जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र प्रत्यक्ष सदनिकेचा ताबा घेण्यापूर्वी सादर करणे बंधनकारक राहील.

 

 • मुंबई मंडळाच्या सदनिका विक्रीसाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास (जमिनीची विल्हेवाट) नियम १९८१ व महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास (मिळकत व्यवस्थापन, गाळ्यांची विक्री, हस्तांतरण व अदलाबदल) विनियम १९८९ यामधील तरतूदी अनुसार वेळोवेळी होणान्या सुधारणांसह, लागू केल्या जाणाऱ्या तरतूदींच्या अधीन राहून इच्छुक अर्जदारांकडून या सदनिका विक्रीकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

 • नियोजित प्रकल्पातील योजनांचे चटई क्षेत्रफळ, विक्री किंमत, सदनिकांची संख्या अंदाजित असून त्यामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

 • जाहिरातीमधील काही योजनांना भोगवटा प्रमाणपत्र (Occupation Certificate) अप्राप्त असून म्हाडा / बृहन्मुंबई महानगर पालिकेडून भोगवटा प्रमाणपत्र (Occupation Certificate) प्राप्त झाल्यानंतर सदनिका वितरणाची कार्यवाही केली जाईल.

 

 • संगणकीय सोडतीत कोणत्याही प्रकारे मानवी हस्तक्षेप होऊ शकत नाही. याकरिता अर्जदारांना विनंती करण्यात येते की, अशा प्रकारच्या कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये.

 

 • मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने या योजनेतील सदनिकांच्या वितरणासाठी किंवा याबाबतच्या कोणत्याही कामासाठी कोणालाही प्रतिनिधी / सल्ला देणारा वा प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदारांनी कोणत्याही अनधिकृत व्यक्तीशी परस्पर पैशांचा व्यवहार केल्यास

त्याला मुंबई मंडळ / म्हाडा जबाबदार राहणार नाही. तसेच अर्जदारास कोणी दलाल / व्यक्ती परस्पर म्हाडाच्या नावे पैसे उकळणे किंवा फसवणूक करणे इ. बाबी करताना आढळल्यास म्हाडाच्या मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी / प्राधिकरण, तसेच उपमुख्य अधिकारी (पमान ) / मुंबई मंडळ यांचे कार्यालयास कळवावे,

 • गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत येणारे अर्ज स्विकारणे वा नाकारणे / सोडत रद्द करणे किंवा सर्व योजना किंवा एखादी विशिष्ट योजना रद्द करण्याचे अधिकार मुख्य अधिकारी / मुंबई मंडळ यांनी राखून ठेवले आहेत.

 

 • सदनिका / योजनेच्या बाबती कोणत्याही न्यायालयामध्ये दावा प्रलंबित असल्यास अथवा यापूर्वी सदनिकांचे वितरण झाले असल्यास, पडताळणी अती योग्य निर्णय घेण्यात येईल व सदरचा निर्णय अर्जदारास बंधनकारक असेल.

 

 • जाहीरातीमध्ये / माहितीपुस्तिकेमध्ये अनावधानाने झालेल्या किंवा छपाईच्या चुकांचा कोणत्याही प्रकारे अर्जदारास फायदा घेता येणार नाही.

 

 • या जाहिरातीमधील व माहिती पुस्तिकेत दिलेला तपशिल परिपूर्ण नाही, तो फक्त निर्देशक आहे. सदनिकांच्या वितरणाच्या अटी व शर्ती, यशस्वी लाभार्थीना वेळोवेळी म्हाडाद्वारे कळविल्या जातील व त्या लाभार्थीना बंधनकारक राहतील. तसेच महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास (मिळकत) व्यवस्थापन, विक्री, हस्तांतरण व सदनिकेची अदलाबदल) विनियम १९८१ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास (जमिनीची विल्हेवाट) नियम १९८१ च्या तरतूदी वेळोवेळी होणाऱ्या सुधारणांसह अर्जदारास जशाच्या तशा व संपूर्णपणे बंधनकारक राहतील,

Conclusion

मित्रांनो, या पोस्टमध्ये आम्ही म्हाडा लॉटरी योजनेबद्दल माहिती दिली आहे जसे की – म्हाडा लॉटरी योजना काय आहे , त्याचे फायदे , त्याचे उद्दिष्टे , mhada lottery योजनेसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया , आवश्यक कागदपत्रे इ . मला आशा आहे की तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही ही पोस्ट इतर लोकांसोबत शेअर कराल. धन्यवाद !

MHADA lottery 2023 Mumbai Online Apply Video 

 

I am a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Developer and Owner/founder of Marathi Corner. 6 year experience in blogging and youtube careers.

1 thought on “म्हाडा लॉटरी 2023 मिळणार हक्कांच घर PM आवास योजना MHADA lottery 2023 Mumbai Online Apply”

Leave a Comment

error: मित्रा, कॉपी करायचं नसतं !! शेअर करायचं असतं !!