महिलांना सॅनिटरी नॅपकिन फक्त २४ रु मध्ये अस्मिता योजना महाराष्ट्र Asmita Yojana Maharashtra 2023

By Shubham Pawar

Updated on:

नमस्कार मित्रांनो , आज आपण महिलांना सॅनिटरी नॅपकिन फक्त २४ रु मध्ये मिळणार अस्मिता योजना महाराष्ट्र (Asmita Yojana Maharashtra ) या योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो तुम्हांला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे.

चला तर मग मित्रांनो पाहुयात , महिलांना सॅनिटरी नॅपकिन फक्त २४ रु मध्ये मिळणार अस्मिता योजना (Asmita Yojana Maharashtra ) आणि त्यासाठी काय आहे नक्की उद्देश्य , काय फायदे आहेत , कोणाला या योजनेचा लाभ घेण्यात येईल , इत्यादी सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

अस्मिता योजना प्रस्तावना :

महाराष्ट्र सरकार वेळोवेळी समाजातील संपूर्ण घटकांचा विकास व्हावा म्हणून विविध प्रकारच्या लोक कल्याणकारी आणि अत्यंत उपयोगी अशा योजना राबवित असते याच गोष्टीला अनुसरून सरकारने मुलींसाठी , महिलांसाठी त्यांच्या सक्षमीकरणसाठी अस्मिता योजना सुरु केली
अस्मिता योजना हि महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स पुरवण्यासाठीची महाराष्ट्र सरकारने सुरु केलेली योजना आहे.

२०१८ साली सॅनिटरी नॅपकिन सामान्य लोकांना परवडेल ह्या किमतीत उपलब्ध करण्यासाठी किशोरी मुली महिला बचत गट यांच्यासाठी रोजगार उपलब्ध आहेत सॅनिटरी नॅपकिन्सच्या विक्रीसाठी आवश्यक मोबाईल ऍप्लिकेशन मधून नोंदणी करण्यासाठी बचत गटांकडून भरपूर प्रतिसाद मिळाला. सॅनिटरी नॅपकिन्स चे वितरक म्हणून काम करण्यासाठी १७ व १८ मार्च २०१८ या दोन दिवसांत २३७२ बचत गटांनी अँपमध्ये नोंदणी केली होती.

अस्मिता योजनेचे (Asmita Yojana Maharashtra ) उद्देश्य :

अस्मिता योजना हि महाराष्ट्र शासनामार्फत चालवली जाणारी योजना आहे. माफक किंमतीत शालेय विद्यार्थिनीना व महिलांनाही सॅनिटरी नॅपकिन विकत घेणे शक्य व्हावे म्हणून हि योजना बचत गटांच्या माध्यमातून चालवली जाते. बचत गटांनी शाळकरी मुलींना शाळेमार्फत उपलब्ध केलेली अस्मिता कार्डे मिळवणे व ती बचत गटाकडून नॅपकिन खरेदी करताना गटाच्या प्रतिनिधीला दाखवणे आवश्यक आहे

Asmita Yojana Maharashtra वैशिष्ट्ये :
अस्मिता योजनेंर्तगत मुलींचे शाळांमधील अनुपस्थितीचे प्रमाण कमी करून मुलींची शाळांमधील उपस्थिती वाढविणे हा शासनाचा उद्देश्य आहे. अस्मिता योजनेच्या अंतर्गत अस्मिता वेबपोर्टलच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुली आणि महिलांना सॅनिटरी नॅपकिन उप्लब्ध होण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक अस्मिता प्रायोजक होऊ शकतील , या उपलब्ध झालेल्या निधीतून ग्रामीण भागातील मुलींना सॅनिटरी नॅपकिन मिळवण्यासाठी नागरिकांच्या सहभागातून मोठी मदत उपलब्ध होणार आहे.

मुलींसाठी जमवा लाखो रुपये, सुकन्या समृध्दी योजना | Sukanya Samriddhi Yojana Maharashtra

अस्मिता योजनेचे (Asmita Yojana Maharashtra )फायदे :
1] अस्मिता योजना ग्रामीण भागातील मुली आणि महिला यांच्या आरोग्यासाठी वरदान ठरत आहे, तसेच मुली आणि महिलांना माफक दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्याकरिता राज्यात अस्मिता योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

2] जिल्हा परिषद शाळांमधील 11 ते 19 या वयोगटातील किशोरवयीन मुलींसाठी अस्मिता योजना अनुदान तत्वावर राबविण्यात येत आहे, त्यासाठी जिल्हा परिषद शाळांमधील मुलींना अस्मिता कार्ड देण्यात येत आहे.

3] अस्मिता योजनेच्या माध्यमातून ग्रामीण महिला बचत गटांनामधील महिलांना मानधन देण्यात येत आहे, त्यामुळे या योजनेव्दारे रोजगार निर्माण होत आहे, यासाठी या महिला बचत गटांना अस्मिता अप्लिकेशन वापर करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे, ग्रामीण भागात मुलींना आणि महिलांना सॅनिटरी नॅपकीन वाटण्याची जवाबदारी महिला बचत गटांना देण्यात आली आहे.

4] अस्मिता योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील शाळांमधील किशोरवयीन मुलींची गैरहजेरी कमी करण्यासाठी आणि आरोग्य व शिक्षणाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी त्याचप्रमाणे ग्रामीण भागामधील महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा शासनाचा उद्देश आहे.

Conclusion :

मित्रांनो , ह्या लेख मध्ये आम्ही आपण महिलांना सॅनिटरी नॅपकिन फक्त २४ रु मध्ये मिळणार अस्मिता योजना महाराष्ट्र (Asmita Yojana Maharashtra ) या योजनेबद्दल माहिती दिली आहे जसे कि , त्याच उद्देश्य , फायदे , योजनेची वैशिष्ट्ये ती योजना म्हणजे काय, कोणी आणि कधी काढली ती योजना इत्यादी ,मला आशा आहे कि तुम्हांला हि पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत शेअर कराल . धन्यवाद !!

This article has been written by Shubham Pawar from Pune Maharashtra. Shubham Pawar is a famous Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Developer and Owner/founder of Marathi Corner. 5 year experience in blogging and youtube careers.