Gas Cylinder qr code update – घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर वितरणात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, आता प्रत्येक गॅस सिलिंडरवर क्यूआर कोड दिला जाणार आहे. हे सिलिंडर लवकरच देशभरात उपलब्ध होतील.
बऱ्याचदा टाकीतून गॅस चोरीचे प्रकार होतात. त्याची तक्रार करुनही कारवाई होत नाही. असे प्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकारने आधार कार्डप्रमाणे प्रत्येक गॅस सिलिंडरवर क्यूआर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. \”Gas Cylinder qr code update\”
क्यूआर कोडचे फायदे
क्यूआर कोडमुळे ग्राहकांना सिलिंडरच्या लोकेशनची माहिती मिळेल.
सिलिंडरचे वजन, एक्सपायरी डेटसारखी डिटेल्स माहितीही मिळवू शकतो.
गॅस सिलिंडर कुठे भरण्यात आलेला आहे, याची माहिती घेता येईल.
सिलिंडरमधील गॅसची चोरी होत असल्यास त्याचा माग काढणं सोपे होईल. {Gas Cylinder qr code update}
किती वेळा गॅस रिफिल केला, तसेच रिफिलिंग सेंटरमधून घरपोच गॅस मिळण्यास किती वेळ लागला, हे समजेल.
गॅस डिलरचे नाव समजणार असल्याने घरगुती गॅसचा व्यावसायिक कामासाठी वापर करता येणार नाही.