ITR फाईल नक्की दाखल करा हे आहेत फायदे जाणुन घ्या | ITR File Benefits in Marathi

By Shubham Pawar

Published on:

ITR File Benefits In Marathi – आयकर कक्षेत नसाल तरीही भरा आयटीआर. टॅक्सेशन आयटीआर दाखल केल्यामुळे मिळतात अनेक लाभ.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ITR File Benefits In Marathi

प्राप्तिकर विवरणपत्र (आयटीआर) दाखल करण्यासाठी प्राप्तिकर पोर्टल खुले झाले आहे. आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे. देशातील बहुतांश लोकांची मिळकत प्राप्तिकराच्या कक्षेत येत नाही.

त्यामुळे आपल्याला आयटीआर भरण्याची गरज नाही, असे लोकांना वाटते, तथापि, प्राप्तिकर लागत  नसतानाही आयटीआर भरणे हितकारक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना आयटीआर दाखल करणे बंधनकारक नाही. तथापि, त्यांनी आयटीआर दाखल केल्यास काही फायदे त्यांना मिळू शकतात.

काय होतो फायदा?

  • झटपट मिळते बँक कर्ज

आयटीआर दस्तावेजास वित्तीय संस्था सर्वाधिक विश्वसनीय मानतात. कार, वैयक्तिक अथवा गृहकर्जासाठी हा दस्तावेज उपयोगी ठरतो. त्यामुळे वित्तीय संस्था तुम्हाला सहजपणे कर्ज देतील.

  • व्हिसा लवकर मिळतो

बहुतांश देश व्हिसा देण्यासाठी उत्पन्नाचा पुरावा मागतात. त्यासाठी आयटीआर विवरणपत्र उपयुक्त ठरते. हा उत्पन्नाचा अधिकृत पुरावा आहे. त्यामुळे व्हिसा मिळण्यास मदत होते. प्रवाशाची खर्च करण्याची क्षमता आहे, याची खात्री संबंधित देशाला होते.

  • टीडीएस परतावा

तुमचे उत्पन्न प्राप्तिकर कक्षेत नसतानाही काही कारणांनी तुमचे टीडीएस कापले गेले असेल, तर हा पैसा परत मिळविण्यासाठी आयटीआर दाखल करणे आवश्यक आहे.

  • तोटा समायोजित करण्यास मदत

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणायांस आयटीआर दाखल करणे आवश्यक आहे. गुंतवणुकीत तोटा झाल्यास तो पुढील वर्षात हस्तांतरित करण्यास तसेच पुढील वर्षीच्या नफ्यात समायोजित करण्यास त्याची मदत होते. त्यातून प्राप्तिकरात सूट मिळते.

  • व्याजावरही लागतो कर

बचत खाते, मुदत ठेवी आणि आवर्ती ठेवी यावर मिळणाऱ्या व्याजावरही प्राप्तिकर लागतो. अर्थात एकूण उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक झाल्यावरच हा कर लागतो. वार्षिक व्याज 40 हजारांपेक्षा अधिक असल्यास 10 टक्के टीडीएस कापला जातो. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा 50 हजार आहे.

  • कर रिफंडसाठी दावा

कर रिफंडचा दावा करण्यासाठी आयटीआर फाइल करणे आवश्यक आहे. तुम्ही आयटीआर फाइल करता तेव्हा त्याचे मूल्यांकन होते. परतावा दिल्यास तो थेट बँक खात्यात जमा होतो.

  • उत्पन्नाचा पुरावा

आयटीआर दाखल करताना एक प्रमाणपत्र मिळते. जिथे आपण नोकरी करतो तेथून फॉर्म १६ दिला जातो. हा एक उत्पन्नाचा नोंदणीकृत पुरावा असणे क्रेडिट कार्ड, कर्ज किंवा स्वतःचे क्रेडिट सिद्ध करण्यास महत्त्वाचे ठरते.

  • पत्त्याचा पुरावा म्हणून

आयटीआर पावती तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठविली जाते, जी पत्त्याचा पुरावा म्हणून काम करू शकते. याशिवाय, ते तुमच्यासाठी उत्पन्नाचा पुरावा म्हणूनही काम करते.

  • व्यवसाय सुरू करण्यासाठी

तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर आयटीआर भरणे आवश्यक आहे. याशिवाय कोणत्याही विभागासाठी करार करायचा असेल तर आयटीआर दाखवावा लागेल. कंत्राट मिळवण्यासाठी गेल्या ५ वर्षांचा आयटीआर द्यावा लागतो.

  • विमा कंपन्यांकडून होते मागणी

तुम्हाला एक कोटी रुपयांचे विमा संरक्षण (टर्म प्लॅन) घ्यायचे असेल, तर विमा कंपन्या तुम्हाला आयटीआर मागू शकतात. त्या तुमच्या उत्पन्नाचा स्रोत जाणून घेण्यासाठी तपासण्यासाठी आयटीआर मागतात.

 

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

Leave a comment