अतिवृष्टी नुकसान भरपाई 2023 यादी गावानुसार | nuksan bharpai list 2023 maharashtra

nuksan bharpai list 2023 maharashtra राज्यात जून ते ऑक्टोबर,2020 या कालावधीत विविध जिल्हयात अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झाल्याचे निर्दशनास आले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत करण्यासंदर्भात मा.मुख्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 23.10.2020 रोजी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयास दिनांक 29.10.2020 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

यानुसार संदर्भाधीन क्रमांक ३ येथील शासन निर्णयान्वये धोरणात्मक आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. राज्य कार्यकारी समितीच्या दि.03.11.2020 रोजी झालेल्या बैठकीत निधी वितरणास प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार संबंधित विभागीय आयुक्त यांना संदर्भाधीन क्रमांक ३ व ४ येथील शासन निर्णयान्वये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता बाधित व्यक्तींना निधी वितरीत करण्यात आला आहे.

विभागीय आयुक्त, नागपूर यांच्या संदर्भाधीन क्र.५ च्या पत्रान्वये जून ते ऑक्टोबर, 2020 मध्ये अतिवृष्टीमुळे व पुरपरिस्थितीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. (Atirusti Nuksan Bharpai List 2021)

त्यानुसार विभागीय आयुक्त, नागपूर यांना अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता अतिरिक्त निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

nuksan bharpai list 2023 maharashtra

राज्यात जून ते ऑक्टोबर, २०२० या कालावधीत विविध जिल्हयात अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत देण्याबाबत संदर्भाधीन १ ते ३ येथील शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या बाबी व दरानुसार मदत देण्यासाठी संदर्भाधीन क्रमांक ४ ते ९ येथील पत्रान्वये प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार शेतीपिकांच्या नुकसानीसाठी संदर्भाधीन क्रमांक ३ व ४ येथील शासन निर्णयान्वये निधी वितरीत करण्यात आला आहे.

विभागीय आयुक्त, नागपूर यांनी संदर्भाधीन क्र.५ च्या पत्रान्वये मागणी केल्यानुसार अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता रू.४९.९५ लक्ष (रूपये एकोण पन्नास लक्ष पंच्यान्नव हजार फक्त) इतका निधी वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. pik nuksan bharpai list 2023 maharashtra

या आपत्तीमध्ये शेतीपिकांच्या व बहुवार्षिक पिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी खालील दराने मदत देण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत

उपरोक्तप्रमाणे बाधित नागरिकांना शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदतीचे वाटप करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीने दिलेल्या मान्यतेनुसार जिल्हाधिकारी, वर्धा यांना लेखाशीर्ष २२४५ २४५२ अंतर्गत रू.२.९० लक्ष व लेखाशीर्ष २२४५ २३०९ अंतर्गत रू.१.३६ लक्ष व जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना लेखाशीर्ष २२४५२४५२ अंतर्गत रू.४५.६९ लक्ष असे लेखाशीर्ष २२४५२४५२ मध्ये रू.४८.४९ लक्ष व लेखाशीर्ष २२४५ २३०९ मध्ये रू.१.३६ लक्ष अशी एकूण रू.४९.९५ लक्ष (रूपये एकोणपन्नास लक्ष पंच्यान्नव हजार फक्त) इतकी रक्कम मागणी क्रमांक सी-६, प्रधान लेखाशीर्ष २२४५- नैसर्गिक आपत्तीच्या निवारणार्थ सहाय्य अंतर्गत लेखाशीर्षाअंतर्गत, ३१ सहाय्यक अनुदाने या  उदिष्टाखाली पुनर्विनियोजनाव्दारे उपलब्ध झालेल्या तरतूदीमधून वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

अतिवृष्टी नुकसान भरपाई 2023 यादी

या प्रयोजनासाठी होणारा खर्च खालील लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा. सदर निधी बीम्स प्रणालीवर म-११ कार्यासन यांनी तात्काळ वितरीत करावा.

  • प्रधान लेखाशीर्ष २२४५- नैसर्गिक आपत्तीच्या निवारणार्थ सहाय्य, ०२, पूर, चक्रीवादळे इत्यादी, १०१, अनुग्रह सहाय्य (९१) राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकानुसार खर्च, (९१)(०५) नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसानीकरिता शेतकऱ्यांना मदत,
  • ३१ सहाय्यक अनुदाने (२२४५२४५२) प्रधान लेखाशीर्ष २२४५- नैसर्गिक आपत्तीच्या निवारणार्थ सहाय्य, ०२, पूर, चक्रीवादळे इत्यादी

खाली काही जिल्ह्यांच्या लिंक वरून यादी डाउनलोड करा

1 thought on “अतिवृष्टी नुकसान भरपाई 2023 यादी गावानुसार | nuksan bharpai list 2023 maharashtra”

Leave a Comment

close button