Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana Maharashtra: शेती व्यवसाय करतांना होणारे विविध अपघातामुळे शेतकऱ्यांस मृत्यू ओढावल्यास किंवा अपंगत्व आल्यास संबंधित अपघातग्रस्त शेतकऱ्यांस विमाछत्र गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमार्फत प्रदान करण्यात आले असून त्याचा लाभ त्या शेतकऱ्यास व त्यांच्या कुटुंबास देण्यात येतो.
राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व त्याबरोबरच शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही १ वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले व्यक्ती (आई-वडील,शेतकऱ्याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे १० ते ७५ वयोगटातील एकुण २ जणांना विमाछत्र प्रदान करण्यासाठी सुधारित स्वरुपात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
गोपिनाथ मुंडे अपघात विमा योजनेसाठी विमाछत्र प्रदान करण्यासाठी कुटुंबाच्या व्याख्येमध्ये शेतकऱ्याचे आई-वडील, पती/पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यांचा समावेश ग्राह्य धरण्यात आलेला आहे.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना नुकसान भरपाई व पात्रता
सदर योजनेअंतर्गत अपघात ग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांस प्रकरणपरत्वे खालील प्रमाणे लाभ अनुज्ञेय आहे:
अपघाताची बाब – नुकसान भरपाई
- अपघाती मृत्यू – रु.२,००,०००/
- अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय तसेच एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास रु.२,००,०००/
- अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास – रु.१,००,०००/
लाभार्थी पात्रता:-
महाराष्ट्र राज्यातील १० ते ७५ वयोगटातील महसूल नोंदी नुसार विमा पॉलिसी लागू झालेल्या तारखेस खातेदार असलेला शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला शेतकऱ्याच्या कुटुंबातील १० ते ७५ वयोगटातील वर नमूद केलेला कोणताही १ सदस्य.
योजनेचे नाव | गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना |
कोणी सुरु केली | महाराष्ट्र शासन |
लाभार्थी | राज्यातील शेतकरी |
उद्दिष्ट | शेतकऱ्यांना विमा प्रदान करणे |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाईन |
वेबसाईट | krishi.maharashtra.gov.in |
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना कागदपत्रे
दावा अर्जासोबत सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे:-
अ) लाभ घेण्याकरीता दावा दाखल करताना सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे –
विहीत नमुन्यातील पूर्वसुचनेचा अर्ज पूर्वसूचनेसोबत आवश्यक कागदपत्रे
- 7/12 उतारा
- मृत्यू दाखला
- प्रथम माहिती अहवाल
- विजेचा धक्का अपघात, वीज पडून मृत्यू, पाण्यामध्ये बुडून मृत्यू. उंचावरून पडून झालेला मृत्यू, सर्पदंश/विंचू दंश व अन्य कोणतेही अपघात यासाठी प्रथम माहिती अहवाल किंवा पोलीस पाटील अहवाल
- घटनास्थळ पंचनामा
- वयाचा दाखला
सदरचा दावा दुर्घटनेनंतर शक्यतो ४५ दिवस कालावधीत नोंदवण्यात यावा.
- विहीत नमुन्यातील अर्ज अर्जासोबत प्रस्तावासाठी अपघाताच्या प्रकारानुसार आवश्यक सर्व कागदपत्रे सहपत्रित करण्यात यावी.अप्राप्त कागदपत्रांची यादी त्रुटीपत्रकात तालुका कृषि अधिकारी कार्यालयात नोंदवहीत, संगणक प्रणालीमध्ये पडताळणी करून नोंदवण्यात यावी.
- अपघातग्रस्ताच्या वयाच्या पडताळणीकरीता जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शाळेच्या मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र/ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र किंवा आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा वाहन चालविण्याचा परवाना किंवा पारपत्र यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र किंवा उपलब्ध नसल्यास निवडणूक ओळखपत्र (स्वयंसाक्षाकीत केलेले).
- अपघातग्रस्त नोंदणीकृत खातेदाराच्या वयासंबंधी वरीलपैकी कोणताही पुरावा उपलब्ध होऊ न शकल्यास विमा दावेदाराने/कुटुंबातील सदस्याने अपघातग्रस्त खातेदाराच्या वयासंबंधी शपथपत्र दिल्यास असे शपथपत्र ग्राहय धरण्यात येईल.
- खातेदार शेतकरी कुटुंबाची शिधापत्रिका राजपत्रित अधिकारी यांनी साक्षांकित केलेली प्रत.
- शेतकरी म्हणून त्याचे नावाचा समावेश असलेला 7/12 उतारा किंवा ८-अ नमुन्यातील मुळ उतारा.
- मृत्युचा दाखला स्वयंसाक्षांकित केलेली प्रत.
- घटनास्थळ पंचनामा स्वयंसांक्षाकीत केलेली प्रत.
- प्रस्ताव प्राप्त झाल्यावर पडताळणी करतांना तालुका कृषि अधिकारी कार्यालय स्तरावर मुळ कागदपत्रे तपासून सदर प्रमाणपत्रे सांक्षाकीत करावीत. \’Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana Maharashtra 2024\’
आ) प्रस्तावासोबत सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे:-
- ज्या नोंदीवरुन अपघातग्रस्त शेतकऱ्याचे नाव ७/१२ वर आले असेल अशी सबंधीत फेरफार नोंद (गाव नमुना नंबर ६-ड) मुळ उतारा अथवा फेरफार नोंदीबाबत सक्षम प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र
- शेतकऱ्यांचे वारस म्हणून गावकामगार तलाठ्याकडील गांव नमुना नं. ६ क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद. मुळ उतारा अथवा वारसाच्या नोंदीबाबत सक्षम प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र
- विहीत नमुन्यातील कार्यकारी दंडाधिकारी यांचे समोर केलेले प्रतिज्ञापत्र (प्रपत्र-ग)
- या शिवाय अपघाताच्या घटनेच्या स्वरूपानुसार पुराव्यादाखल सादर करावयाच्या प्रपत्र क मधील कागदपत्रे
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana Maharashtra
शासन परिपत्रक दि.१९ सप्टेंबर २०१९ या परिपत्रकान्वये विहित केलेली प्रपत्र/कागदपत्रे वगळता अन्य कोणतीही कागदपत्रे शेतकऱ्यांना वेगळ्याने सादर करण्याची आवश्यकता नाही किंवा या योजनेअंतर्गत लाभासाठी विमा कंपनीकडे स्वतंत्रपणे अर्ज/कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही.
अपवादात्मक परिस्थितीमध्ये, विमा प्रस्ताव सोबत काही कागदपत्रे सादर करावयाची राहिल्यास पर्यायी कागदपत्रे/ चौकशीच्या आधारे प्रस्तावावर निर्णय घेण्यात यावा, यासाठी आवश्यकता वाटल्यास शासनाच्या वतीने आयुक्त (कृषी), विमा सल्लागार कंपनी / कंपन्या व विमा कंपनी/कंपन्या यांनी संयुक्तपणे निर्णय घ्यावा.
विमा दाव्याचे अनुषंगाने पूर्वसुचना अर्ज विहित कागदपत्रांसह ज्या दिनांकास तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात दाखल /प्राप्त होईल व संगणक प्रणालीमध्ये अपलोड होईल त्या दिनांकासच तो विमा कंपनीस प्राप्त झाला आहे असे समजण्यात येईल.
विमा प्रस्ताव विहित कागदपत्रांसह योजनेंतर्गत विमा संरक्षित कालावधीत कधीही प्राप्त झाला तरी तो विचारात घेणे तसेच योजनेच्या अखेरच्या दिवसात झालेल्या अपघातांसाठी योजनेचा चालू वर्षाचा मंजूर कालावधी संपल्यानंतर ९० दिवसांपर्यंत तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे प्राप्त झालेले प्रस्ताव स्विकारणे विमा कंपनीवर बंधनकारक राहील.
शिवाय योजनेचा चालू वर्षाचा मंजूर कालावधी संपल्यानंतर ९० दिवसांपर्यंत संगणक प्रणालीमध्ये नोंद झालेल्या पूर्वसुवना अर्जान्वये तालुका कृषि अधिकारी यांचेकडे प्राप्त होणारे विमा प्रस्तावसुद्धा विमा पॉलिसीचा कालावधी संपल्याच्या दिवसापासुन ३६५ दिवसांपर्यंत स्विकारणे विमा कंपनीवर बंधनकारक राहील, मात्र सदर कालावधीनंतर कोणताही प्रस्ताव स्विकारला जाणार नाही, तसेच यासंदर्भात ग्राहक मंच किंवा इतर निर्णय/आदेश शासनावर बंधनकारक राहणार नाहीत.
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana in Marathi
(अ) अर्जदार
- अपघात झाल्यानंतर त्वरित योजनेंतर्गत पूर्वसुचनापत्र/नोंदणी करीता विहित नमुन्यात – क्लेम फॉर्म भाग १ सोबत. वरील नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे.
- तसेच अपघाताच्या स्वरूपानुसार अपघाताचे पुराव्यासंबंधीच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून परिपूर्ण प्रस्ताव विमा संरक्षित कालावधीत सादर करावा.
- लाभासाठीचा दावा शक्यतो ४५ दिवस कालावधीत नोंदवण्यात यावा.
- अपघाताच्या स्वरूपानुसार अपघाताचे पुराव्यासंबंधीच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन परिपूर्ण प्रस्ताव विमा संरक्षित कालावधीत सादर करावा.
(ब) महसूल यंत्रणा :
तलाठी :-
अपघात ग्रस्त शेतकरी /वारसदार/ संबंधित कृषी पर्यवेक्षक यांना ७/१२ चा उतारा आणि गाव नमुना ६- क व ६-ड अथवा सक्षम प्राधिकृत अधिकाऱ्याचे फेरफार नोंदीबाबत /वारसाच्या नोंदीबाबत प्रमाणपत्र तातडीने उपलब्ध करून द्यावे.
तहसीलदार:
- योजनेसंबंधी माहिती/अर्जाचा नमुना सेतू कार्यालयातून पुरवावा.सदर अर्जाचे नमुने संगणक प्रणालीमध्ये उपलब्ध करण्यात येतील.
- अर्जदारास लागणारे उतारे, वारस नोंद व तलाठी प्रमाणपत्र अर्जदारास तातडीने उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना संबंधितांना निर्गमित कराव्यात.
- प्रत्येक महिन्यात किमान एकदा प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन महसूल विभागाकडील कागदपत्रांच्या अभावी कोणतेही प्रकरण प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana
जिल्हाधिकारी:
- जिल्हा सनियंत्रण समितीचे अध्यक्ष नात्याने जिल्हाधिकारी यांनी योजनेचा प्रत्येक तीन महिन्यात तालुकानिहाय आढावा घ्यावा व अडचणींचे निराकरण करावे.
- महसूल विभागाची कागदपत्रे ७/१२ चा उतारा, गाव नमुना ६- क व ६ -ड / सक्षम प्राधिकृत अधिकाऱ्याचे फेरफार नोंदीबाबत / वारसाच्या नोंदीबाबत प्रमाणपत्र.
- तलाठी प्रमाणपत्र; तलाठी तसेच पोलिस विभाग,आरोग्य विभागाकडून विमा प्रस्तावातील विहित कागदपत्रे मिळण्यास अडचणी असल्यास त्यानुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून प्राधान्यक्रमाने कागदपत्रांची पूर्तता करण्याचे निर्देश द्यावेत.
- योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणेचे दृष्टीने सुधारणा/ सूचना याबाबत आयुक्त (कृषी) यांना अवगत करावे.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना महाराष्ट्र
(क) कृषी विभाग:
कृषी पर्यवेक्षक:
- सदर योजनेचे प्रयोजनार्थ क्षेत्रीय स्तरावरील सर्व कृषी पर्यवेक्षक यांना दावा /प्रस्ताव सादरकर्ता प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.
- तालुक्यातील मंडळ कृषी अधिकारी यांचे अधिनस्त क्षेत्रीय काम करणारे कृषी पर्यवेक्षक यांनी त्यांचे कार्यक्षेत्रातील दुर्घटने संदर्भात पूर्वसूचना प्राप्त होताच संबंधित दुर्घटनाग्रस्त शेतकरी व मृत शेतकऱ्यांचे वारसदार यांचेशी संपर्क साधावा.
- अर्जाच्या विहित नमुन्यात माहिती शेतकऱ्याकडून संकलित करण्यासाठी व संबंधित शासकीय यंत्रणांशी समन्वय ठेवून कागदपत्रे उपलबद्धतेबाबत शेतकरी कुटुंबास मदत करावी.
- अर्ज स्वीकारते वेळी प्रस्तावासोबत ७/१२ चा उतारा, गाव नमुना ६-क.६-ड. प्रतिज्ञापत्र हे मूळ प्रतीत व उर्वरित कागदपत्रे स्वयंसाक्षांकीत केली असल्याची खात्री करावी व नसल्यास पूर्तता करून घेऊन अर्ज स्वीकारावा.
- अपूर्ण अर्जामधील त्रुटि बाबत तशी नोंद घेऊन पोहच पावती तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून संबंधित शेतकरी/वारसदारला देण्यात यावी.
- अपवादात्मक परिस्थितीमध्ये एखादे कागदपत्राअभावी प्रस्ताव परिपूर्ण होत नसल्यास प्रस्ताव दाखल करून घेऊन, या संदर्भात ब्रोकर/विमा कंपनीच्या सल्ल्यांनी पर्यायी कागदपत्रांची पुर्तता करून घेण्यास सहकार्य करावे.
तालुका कृषी अधिकारी
- योजनेची प्रसिद्धी करण्यास मदत करावी.
- योजनेसंबंधी माहिती /अर्जाचा नमुना पुरवावा.
- कृषी पर्यवेक्षक यांनी सादर केलेला अर्ज स्वीकारावा व अर्ज स्वीकारताना प्रस्तावासोबत ७/१२ चा उतारा, गाव नमुना ६- क व ६ -ड मुळ प्रतीत व उर्वरित कागदपत्रे स्वयंसाक्षांकीत केलेली असल्याची खात्री करावी, नसल्यास पूर्तता करून घेऊन अर्ज स्वीकारावा व पोहोच द्यावी.
- कृषी पर्यवेक्षक यांनी सादर केलेल्या अर्जाची छाननी करावी. सदर अर्जामध्ये एकापेक्षा जास्त वेळा त्रुटी काढण्यात येऊ नये.
- कार्यालयास प्राप्त झालेल्या पूर्वसुचना अर्ज व प्रस्तावांची संगणक प्रणालीमध्ये नोंद करणे.
- प्राप्त दावे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचे कार्यालयात सादर करून रीतसर पोहोच घ्यावी.
योजनेचा नियमीतपणे आढावा घेणे व त्रुटीपुर्ततेसाठी पाठपुरावा करणे. \’Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana in Marathi\’
> गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अर्ज DOWNLOAD – CLICK HERE
योजनेचा शासन निर्णय बघण्यासाठी येथे क्लिक करा – CLICK HERE
या योजनेचे आणखी शासन निर्णय बघण्यासाठी येथे क्लिक करा – CLICK HERE