EPS 95 वाढीव पेन्शन योजना असा करा ऑनलाईन अर्ज | EPS 95 higher pension apply online

By Shubham Pawar

Published on:

EPS 95 higher pension apply online – वाढीव पेन्शनसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ ईपीएफओचा निर्णय, 3 मे पर्यंत दिलासा.

EPS 95 higher pension apply online

कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेनुसार वाढीव निवृत्ती वेतनासाठी अर्ज करण्याची मुदत 3 महिन्यांनी वाढविण्यात आली आहे. आधी ही मुदत 3 मार्च 2023 पर्यंत होती, आता ती वाढवून 3 मे 2023 करण्यात आली आहे.

वाढीव निवृत्ती वेतनासाठी अर्ज करण्यास कर्मचान्यांना पुरेसा वेळ मिळावा यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) या निर्णयाची घोषणा केली आहे. ईपीएफओच्या एकीकृत सदस्य पोर्टलवर अलीकडेच सक्रिय करण्यात आलेल्या यूआरएलमध्ये वाढीव निवृत्ती वेतनासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 3 मे असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे.

वाढीव निवृत्ती वेतनासाठी कर्मचारी आणि त्याची कंपनी अशा दोघांना संयुक्तरीत्या अर्ज करावा लागणार आहे. सरकारने मुदतवाढ दिल्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पेन्शन योजनेसाठी 15 हजार रुपये मूळ वेतन गृहित धरूनच योगदान निश्चित होत होते. मूळ वेतन 50 हजार झाले तरीही योगदान 15 हजार रुपयांवरच जमा केले जाते. मात्र, आता ही मर्यादा वाढविण्यात आली आहे. “EPS 95 higher pension apply online”

सर्वोच्च न्यायालयाने दिला होता आदेश

  1.  4 नोव्हेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने वाढीव पेन्शनचा पर्याय निवडण्यासाठी कर्मचाऱ्यांना 4 महिन्यांची मुदत देण्याचे आदेश दिले होते.
  2. ही मुदत 3 मार्च 2023 ला संपणार होती. गेल्या आठवड्यात ईपीएफओने वाढीव पेन्शनसंबंधीचा तपशील जारी केला होता. ‘EPS 95 higher pension apply online’

काय आहे योजना?

  • नोव्हेंबर 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कर्मचारी पेंशन (संशोधन) योजना 2014 कायम ठेवण्याचा निर्णय दिला होता.
  • त्याआधी 22 ऑगस्ट 2014 मध्ये ईपीएसमध्ये सुधारणा करून त्यासाठीची वेतन मर्यादा 6,500 रुपयांवरून वाढवून 15 हजार रुपये केली होती. ईपीएससाठी वेतनातील कंपनीची कपात 8.33 टक्के करण्यासही मान्यता देण्यात आली होती. {EPS 95 higher pension apply online}

ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी खालील व्हिडिओ पहावा 👇👇👇

I am a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Developer and Owner/founder of Marathi Corner. 6 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: मित्रा, कॉपी करायचं नसतं !! शेअर करायचं असतं !!