महाराष्ट्र शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून कामगारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची व जीवन उपयोगी योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कामगारांना त्यांच्या जीवन उपयोगी वस्तू देऊन मदत करणे हा आहे.
essential kit appointment kamgar yojana या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या गरजू कामगारांना दैनंदिन वापरासाठी आवश्यक असलेल्या गृह उपयोगी वस्तूंचा संच (भांडी संच) दिला जातो. ज्यामधे चादर, बेडशीट, ब्लॅंकेट, वॉटर प्युरिफायर, धान्य साठवून कोटी, चटई, चहा पावडर, साखर ठेवण्यासाठी डब्बा इत्यादी विविध गोष्टींचा समावेश असेल.
अत्यावश्यक भांडी संच योजना
इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून गरजू कामगारांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वकांक्षी योजना म्हणजे अत्यावश्यक भांडी संच योजना होय.
कामगारांना जीवन उपयोगी वस्तूंचा संच दिल्यास त्यांचा खर्च कमी होऊन त्यांचे जीवनमान सुधारणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.
पात्रता/निकष (Eligibility)
1. लाभार्थी कामगार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
2. लाभार्थी कामगार बांधकाम क्षेत्रात सध्यास्थितीत कार्यरत असणे आवश्यक.
3. लाभार्थ्याने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे (MahaBOCW) सक्रिय नोंदणी केलेली असावी.
4. कामगाराची वय 18 ते 60 या वयोगटात असणे आवश्यक.
या योजनेत बांधकाम कामगारांना कोणती मदत मिळते ?
या योजनेत बांधकाम कामगारांना खालीलप्रमाणे विविध जीवन उपयोगी वस्तूंचा म्हणजेच भांड्यांचा संच दिला जातो. essential kit appointment kamgar yojana
- चादर
- बेडशीट
- ब्लॅंकेट
- वॉटर प्युरिफायर 18 लिटर
- धान्य साठवून कोटी 25 किलो
- धान्य साठवून कोटी 22 किलो
- चटई
- चहा पावडर डब्बा
- साखर डब्बा
- पत्र्याची पेटी
- प्रेशर कुकर
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया essential kit appointment kamgar yojana
- सर्वप्रथम तुम्हाला इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे.
- त्या ठिकाणी तुम्हाला अत्यावश्यक संच वितरण हा पर्याय दिसेल, त्या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
- त्यानंतर तुम्हाला त्याठिकाणी तुमचा बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाकायचा आहे.
- बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाकून सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP पाठवण्यात येईल, तो OTP त्या ठिकाणी टाका.
- त्यानंतर तुम्हाला सर्वात शेवटी खाली आल्यानंतर कॅम्प/शिबीर हा पर्याय दिसेल, त्यापैकी तुमच्या सोयीनुसार पर्याय निवडा.
- त्यानंतर Appointment Date निवडून घ्या.
- Appointment Date निवडल्यानंतर तुमच्या जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या तारखा दाखवल्या जाते त्यापैकी एक तारीख सिलेक्ट करून सबमिट या पर्यायावर क्लिक करा.
- अशा पद्धतीने तुमचा अर्ज अत्यावश्यक भांडी संच योजनेसाठी नोंदणी करत झालेला असेल, आणि त्याची पावतीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल.
- पावतीवर देण्यात आलेल्या पत्त्यावर तुम्हाला निवडलेल्या तारखेला हजर राहावे लागेल, त्याठिकाणी भांडी संच वाटप केला जाईल.
ऑफलाइन अर्ज प्रक्रिया
- तुम्ही तुमच्या जवळील सहाय्यक कामगार आयुक्त किंवा सरकारी कामगार अधिकाऱ्याच्या जिल्हा/उपजिल्हा कार्यालयात भेट द्या.
- त्या ठिकाणी संबंधित योजनेचा आवश्यक अर्ज भरून त्यासोबत सर्व कागदपत्र जोडून तुमचा अर्ज त्याठिकाणी जमा करा.
बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांसाठी महाराष्ट्र शासनाकडून सुरू करण्यात आलेली ही योजना म्हणजे उत्तम संधी आहे. तुम्ही जर पात्र असाल तर लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज करा आणि जीवनावश्यक अशा उपयोगी वस्तूंचा संच (भांडी संच) मिळवा !