अपंगांना मोफत ई रिक्षा, लगेच करा ऑनलाईन अर्ज | e rickshaw yojana maharashtra 2024

By Shubham Pawar

Updated on:

E Rickshaw Yojana Maharashtra 2024 – नमस्कार मित्रांनो अपंग व दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणा-या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याबाबतची योजना लागू करण्यासंदर्भात दिनांक 10-06-2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मर्या. यांचे स्तरावरुन सुरु आहे. योजना कोणासाठी आहे यासाठी कोण अर्ज करू शकतो तसेच अर्ज कसा करायचा कोण पात्र आहे सर्व माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Apang E Rickshaw Yojana

योजनेचा उद्देश 

 1.  दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे.
 2. दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे.
 3. सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार/कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे.

प्रस्तुत योजनेचा लाभ राज्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्जदार नाव नोंदणी (अर्ज) करण्यासाठी पोर्टल दिनांक 03-12-2023 रोजी प्रक्षेपित करण्यात आले असून दिव्यांग व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागविणेसाठी https://evehicleform.mshfdc.co.in हि लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सदर लिंकद्वारे दिव्यांग व्यक्तींना (e rickshaw yojana maharashtra) ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी दिनांक 08-01-2024 स. 10.00 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तरी सदर योजनेचा लाभ अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा.

योजनेचे नाव ई रिक्षा योजना
सुरू केले महाराष्ट्र सरकार
लाभार्थी दिव्यांग व्यक्ती
वस्तुनिष्ठ दिव्यांगाना मोफत गाडी
रिक्षा प्रकार इलेक्ट्रिक
अर्ज प्रक्रिया ऑनलाइन
वर्ष 2024
अधिकृत संकेतस्थळ https://evehicleform.mshfdc.co.in

अपंगांना मिळणार मोफत ई रिक्षा

योजनेच्या अटी व शर्ती 

 1. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा /Applicant should be domicile of Maharashtra State
 2. अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान ४०% टक्के असावे तसेच जिल्हा शल्य चिकित्सक / सक्षम प्राधिकारी यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्रधारक असावा / Applicant should have at least 40% disability and should have a disability certificate from the District Surgeon/Competent Authority.
 3. अर्जदारा कडे दिव्यांगत्वाचे UDID प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. / Applicant must have UDID card.
 4. अर्जदार दि.०१.०१.२०२४ या अहर्ता दिनांकाच्या दिवशी १८ ते ५५ या वयोगटातील असावा / Age of the Applicant should be between 18 to 55 years as on 01.01.2024.
 5. मतिमंद अर्जदाराच्या बाबतीत त्यांचे कायदेशीर पालक अर्ज करण्यास सक्षम असतील / In the case of applicants with intellectual disabilities, their legal guardians/parents will be eligible to apply for the Scheme.
 6. दिव्यांग अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाख पेक्षा अधिक नसावे / Annual income of the applicant should not exceed INR 2.50 lakhs.
 7. लाभार्थी निवड करताना जास्त अपंगत्व असलेल्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे निवडीचा क्रमहा अतितीव्र दिव्यांगत्व ते कमी दिव्यांगत्व या क्रमाने राहील./ Allocation will be made based on the severity of disability from high to mild.
 8. अतितीव्र दिव्यांगत्व असणाऱ्या दिव्यांग व्यक्तीस वाहन चालविण्याचा परवाना नाकारला असल्यासअशा परिस्थितीत देखील परवाना धारक नसलेल्या अतितीव्र दिव्यांग व्यक्तीच्या बाबतीत सोबत्याच्या (Escort) सहाय्याने फिरता मोबाईल व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले जाईल/If a person having severe disability is denied for driving license, in such situations preference will be given to severely disabled person who does not have a license to do mobile business with the assistance of an escort.
 9. अर्जाच्या वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधीत वाहनाची योग्यती काळजी घेण्याचे बंधपत्र सादर करणे आवश्यक राहील/At the time of submission of the application, the applicant is required to submit a bond/affidavit agreeing to all rules and conditions and taking proper care of his/her vehicle/e-cart.
 10. अर्जाचा वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधित वाहनाची योग्य ती काळजी घेण्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे / At the time of application, the applicant agrees to all the conditions and takes proper care of the concerned vehicle. Affidavit given along with the application.
 11. जिल्हानिहाय लाभार्थ्यांची घोषणा दिव्यांगांच्या संख्येच्या प्रमाणात केली जाईल / The District wise list of the beneficiaries will be published on portal in proportionate to number of persons with disabilities in each district.
 12. अर्जदार हा शासकीय/निमशासकीय/मंडळे/महामंडळे यांचा कर्मचारी नसावा/ The applicant should not be employed by the Government, Semi Government, or any Local body/Corporation.
 13. \”e rickshaw yojana maharashtra \” या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार जर दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचा कर्जदार असेल तरतो थकबाकीदार नसावा/If the applicant has previously availed a loan from Maharashtra State Handicapped Finance & Development corporation, they should have not defaulted on the given loan. e rickshaw yojana maharashtra

दिव्यांग व्यक्तींच्या मदतीसाठी ऑनलाईन अर्ज | Maha Sharad.in Portal Registration 2024

E Rickshaw Yojana Maharashtra 2024

ऑनलाइन अर्ज प्रक्रिये करिता आपण खालील दस्तऐवज तयार ठेवणे आवश्यक आहे.

 • अर्जदाराचा फोटो/Applicant Photo (Only jpeg, jpg.png and gif image with size 15 KB to 100 KB allowed and Photo image Width and Height less than 800px allowed e rickshaw yojana maharashtra )
 • अर्जदाराची सही/Applicant Signature (Only jpeg, jpg,png and gif image with size 3 KB to 30 KB allowed) (Only width:190px,height:50px)
 • जातीचा दाखला/Caste Certificate (Size:10-500 KB, and Format: jpeg, jpg, png and pdf)
 • अधिवास प्रमाणपत्र / Domicile Certificate (Size: 10-500 KB and Format: jpeg, jpg, png and pdf) pdf)
 • निवासी पुरावा / Address Proof (Size:10-500 KB, and Format: jpeg, jpg, png and
 • दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र / Disability Certificate (Size:10-500 KB, and Format: jpeg, jpg, png and pdf)
 • UDID प्रमाणपत्र / UDID Certificate (Size: 10-500 KB, and Format: jpeg, jpg, png and pdf)
 • ओळखपत्र/Identity Proof (Size: 10-500 KB, and Format: jpeg, jpg, png and pdf)
 • बँक पासबुकचे पहिले पान/ First page of Bank Passbook (Size: 10-500 KB, and Format: jpeg, jpg, png and pdf)
 • अर्जदाराचे प्रतिज्ञापत्रक/Applicant\’s Affidavit (Size: 10-500 KB, and Format: jpeg, jpg, png and pdf) 

अपंगांना मोफत रिक्षा 2024

ऑनलाइन अर्ज प्रक्रियेत खालील चरणांचा समावेश आहे.e rickshaw yojana maharashtra 

 •  सूचना वाचणे/Reading the instructions
 • प्रथमच वापरकर्त्याची नोदणी (साइन-अप)/Registration (sign-up) of first-time user ३. ऍप्लिकेशन पोर्टलवर लॉगिन (साइन-इन) करणे/Login (sign-in) to the application portal
 • अर्ज भरणे आणि कागदपत्रे अपलोड करणे/Filling in application form and uploading documents
 • फॉर्मचे पुनरावलोकन करणे, घोषणा तपासणे आणि फॉर्म सबमिट करणे/Reviewing form, checking declaration and submitting the form. ६. अर्ज ऑनलाईन सबमिशनची पोचपावती/Acknowledgement of submission

Divyang Rickshaw Yojana Maharashtra 2024

e rickshaw yojana maharashtra योजनेचे स्वरुप :-

दिव्यांग व्यक्ती लाभार्थ्यांना हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण अनुकुल फिरत्या वाहनावरील दुकानाचे (मोबाईल शॉप ऑन व्हेईकल) करीता 3.75 लाख प्रती लाभार्थी कमाल अनुदान उपलब्ध करणे व त्याकरीता योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी निवडण्यात येणाऱ्या संस्थेने वाहनाची देखभाल व दुरुस्ती करणे, निवड केलेल्या व्यवसायानुरुप दिव्यांग व्यक्तींना व्यवसायाचे प्राथमिक प्रशिक्षण देणे, वाहनाची प्रादेशिक / उपप्रादेशिक परिवहन विभाग (RTO) कडून नोंदणी करणे, दिव्यांग लाभार्थ्यांस व दिव्यांग लाभार्थ्यांस परवाना देण्यास नाकारल्यास त्याच्या वतीने वाहने चालविणाऱ्या सामान्य व्यक्तीला वाहन चालविण्याचा परवाना मिळवून देणे, तसेच वाहन विमा उतरविणे.

तसेच संबंधीत महानगरपालिका/नगरपालिका/नगरपरिषदा / ग्रामपंचायत यांचेकडून फिरता व्यवसाय करण्याचा परवाना मिळवून देणे समन्वय व सनियंत्रण इ. कार्ये पार पाडावी लागतील. संबंधित संस्थेची व्यवसायांवर नियंत्रणाची कार्यप्रणाली सहपत्र-ब मध्ये दर्शविली आहे. सदर योजना महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळामार्फत राबविण्यात येईल.

Apply Now – evehicleform.mshfdc.co.in

ई रिक्षा योजना सुरु कोणी केली?

ई रिक्षा योजना महाराष्ट्र सरकारने सुरु केली.

ई रिक्षा कोणत्या प्रकारची मिळणार आहे?

ई रिक्षा इलेक्ट्रिक मिळणार आहे.

योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?

दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्न किती असावे?

दिव्यांग अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाख पेक्षा अधिक नसावे.

लाभार्थी निवड करताना प्रथम प्राधान्य कोणाला दिले जाईल?

लाभार्थी निवड करताना जास्त अपंगत्व असलेल्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल.

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

Leave a comment